Nandurbar Vidhan Sabha Election 2024 esakal
Maharashtra Assembly Election

Nandurbar Vidhan Sabha Election 2024 : नवीन चेहरे रिंगणात उतरण्यासाठी सज्ज! नंदुरबार जिल्ह्यात नव्या-जुन्यांकडून तयारीला वेग

Latest Vidhan Sabha Election 2024 News : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक नवतरूण चेहऱ्यांची एन्ट्री होणार आहे. त्यांनी तशी तयारी सुरू केली असून, हे नवे चेहरे संधीच्या प्रतिक्षेत आहेत.

धनराज माळी

Nandurbar Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राजकीय नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्याबरोबरच इच्छुक उमेदवारही आपली फिल्डींग लावून उमेदवारी पदरात पाडण्यासाठी धडपड करीत आहेत.

त्यात कुठे विद्यमान आमदारांनांच पुन्हा संधी तर कुठे उमेदवार बदलण्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक नवतरूण चेहऱ्यांची एन्ट्री होणार आहे. त्यांनी तशी तयारी सुरू केली असून, हे नवे चेहरे संधीच्या प्रतिक्षेत आहेत. (Nandurbar Vidhan Sabha Election 2024 New faces ready)

समाजकारण आणि राजकारण या नाण्यांच्या दोन बाजू आहेत. कोणी समाज कार्यातून राजकारणात एन्ट्री करते, तर कोणी सरळ राजकारणात येतात. काहींना राजकीय वारसा असतो. तर काहींची राजकारणातील पहिली इनिंग असते. तसे म्हटले तर समाजकारण व राजकारण हे वाटते तसे सोपे नाही.

तरीही अनेकांना राजकारणात येण्याची इच्छा असते. त्यामुळे नवीन पिढी ग्रामीण राजकारणापासून मोठ्या प्रमाणात एन्ट्री करू लागले आहेत. ग्रामपंचायत सदस्य, सरपंचापासून तर स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या निवडणुकीतही नवतरूणांचा बोलबोला वाढला आहे.

नंदुरबार जिल्ह्याचा राजकारणाचा विचार केला तर जिल्ह्यात अनेक नेते वयोवृद्ध होऊनही राजकारणातील त्यांचा आकांक्षा सुटत नाही. त्यामुळे तरूणांना संधी मिळत नाही. शेवटी राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातीलच तरूणांना पुढे संधी मिळते. मात्र, जिल्ह्यात असे अनेक तरूण आहेत की त्यांनी समाजसेवा व त्यातून राजकारणाची पायाभरणी केली आहे.

ग्रामपंचायत सदस्यांपासून तर आज जिल्हा परिषदेच्या सदस्य पदापर्यंत पोहोचले आहेत. मात्र, त्यांना पुढे संधी मिळण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. तरीही आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर तरूणाई पुढे सरसावत आहेत. अनेक जणांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

नंदुरबार मतदारसंघाचा विचार केला तर सध्या भाजपचे डॉ. विजयकुमार गावित या मतदारसंघात गेली अनेक वर्ष नेतृत्व करीत आहेत. त्यांनाच पुन्हा उमेदवारी निश्‍चित मानली जाते. तरीही भाजपचे जुने पदाधिकारी डॉ. सुहास नटावदकर यांची कन्या डॉ. समिधा नटावदकर या मतदारसंघात तयारी करीत आहेत.

त्या डॉक्टर असल्याने त्यांनी रेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवा-सुविधा जनतेला पुरवित आहेत. त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत. सध्यातरी त्या कोणत्याही पक्षात नाहीत. त्यांना मात्र वडीलांचा राजकीय वारसा आहे. ती एक ओळख आहे.

तसेच, शहरातील बांधकाम व्यावसायिक किरण तडवी हेही पहिल्यांदाच राजकारणात एन्ट्री करून विधानसभेची उमेदवारीची तयारी जोरात सुरू केली आहे. त्यांनी भाजप, शिंदे शिवसेना, कॉंग्रेस व शेवटी शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेही जाऊन उमेदवारी मिळविण्यासाठी आटोकाठ प्रयत्न करीत आहेत. रोहिदास वळवी, रवींद्र पाडवी यांचीही नावे चर्चेत आहेत. (latest marathi news)

तळोदा-शहाद्यातही जोमाने तयारी

तळोदा-शहादा मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, जि. प. उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. निवडणुकीसाठी ते सज्ज झाले आहेत. त्यात सीमा यांना वडील पदमाकर वळवी यांचा राजकीय वारसा आहे. मात्र, नाईक हे स्वबळावर राजकारणात आहेत.

त्यांना पक्षाची मदत राहील. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे हे तयारीला लागले आहेत. तसेच, मंत्री डॉ. गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार गावित यांनीही राजकारणात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. ते नवखे उमेदवार म्हणता येणार नाहीत. त्यांनी २०१४ ला या मतदारसंघात उमेदवारी केली होती. आता पुन्हा जोमाने तयारीला लागले आहेत.

नव्या चेहऱ्यांना संधी?

अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके व किरसिंग वसावे हे शिंदे शिवसेनेकडून इच्छूक आहेत. तर दुसऱ्या गटाकडून विधान परिषदेचे आमदार आमश्‍या पाडवी यांचे पुत्र तथा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांनीही तयारी सुरू केली आहे.

या मतदारसंघात डॉ. गावित यांची कन्या तथा जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांचेही नाव चर्चेत आहे. नवापूर मतदारसंघात शिरीषकुमार नाईक, भरत गावित, शरद गावित हे तिन्ही जुन्याच उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, शिंदे शिवसेनेला जागा सुटल्यास नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम वळवी हे नवे उमेदवार असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT