मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या योजना कशा बंद होतील? याची संधी महाविकास आघाडी पाहत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर घणाघात केला. यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेसवरच मोदींनी आपला टीकेचा फोकस ठेवला. काँग्रेस पक्ष कसा भ्रष्ट पक्ष आहे आणि या पक्षाला रोखणं का गरजेचं आहे? हे यावेळी मोदी सांगत होतं. मुंबई अॅक्वा लाईन मेट्रो उद्घाटन अन् ठाण्यातील विकासकामांचं मोदींच्या हस्ते भूमीपूजन पार पडलं. या कार्यक्रमात मोदी बोलत होते.
"ठाण्याशी बाळासाहेब ठाकरेंना विशेष ओढ होती त्याचबरोबर ठाणे शहर हे आनंद दिघेंचं शहर आहे. देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं आणि ठाण्याचं नात होतं. त्यामुळं ठाण्याच्या विकासावर आम्ही लक्ष्य केंद्रीत केलं आहे. आमचा संकल्प हा विकसित भारत करणं हा आहे. पण आम्हाला विकास करण्यासाठी डबल मेहनत करावी लागत आहे.
कारण एकीकडं विकास करायचा आणि दुसरीकडं काँग्रेसच्या खड्ड्यांना भरायचं कामही आम्हाला करावा लागतं आहे. मुंबई ठप्प होण्याची काँग्रेसच्या काळात सुरु झाली. पण आमच्या सरकारमुळं ही स्थिती आता बदलली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात ३०० किमी मेट्रो लाईनचं जाळं आता निर्माण होत आहे," असं मोदी यावेळी म्हणाले.
आज एकीकडं महायुती सरकार आहे जी महाराष्ट्राला विकासाचं लक्ष मानते. तर दुसरीकडं काँग्रेस आणि महाआघाडीवाले लोक त्यांना जेव्हाही संधी मिळते ते सर्व कामं ठप्प करुन टाकतात. मेट्रो ३ चं काम फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरु झालं त्यावेळी ६० टक्के काम झालं होतं. पण नंतर मविआच्या काळात ही कामं थांबवण्यात आली.
मविआमुळं जनतेच्या पैशांचा चुराडा झाला. मविआनं लोकांची काम रोखली होती आता तुम्हाला त्यांना रोखायचं आहे. विकासाच्या या दुश्मनांना तुम्हाला लांबंच ठेवायचं आहे. गेल्या एक आठवड्यात काँग्रेसच्या नेत्यांची अनेक प्रकरणात नावं आली आहेत. नव्या घोटाळ्यांतून पैसे जमवणं हेच काँग्रेसचं काम आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस सरकारनं नवा टॅक्स लावला आहे. त्याला टॉयलेट टॅक्स म्हणतात. काँग्रेस लूट आणि खोटेपणाचं पॅकेज आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
महायुती सरकारनं महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली, यात महिलांना १,५०० रुपये महिना आणि ३ एलपीजी सिलेंडर मोफत मिळत आहेत. मविआ याचीच वाट पाहतेय की यांना संधी मिळाल्यास ते सर्वात आधी शिंदे यांच्यावर राग काढतील आणि त्यानी आणलेल्या योजनांना टाळं लावून टाकतील. हा पैसा बहिणींच्या हातात नको तर त्यांच्या दलालांच्या खिशात जावेत असं मविआला वाटतं आहे, अशा घणाघाती शब्दांत मोदींनी मविआ आणि प्रामुख्यानं काँग्रेसवर निशाणा साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.