Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Assembly Election 2024 News and voting updates

Loha Assembly Elections 2024: ठाकरे गटाच्या इच्छुकांमध्ये चार ‘स्वामीं’चा बोलबाला !

Vidhan Sabha elections 2024: आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तुल्यबळ उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

अविनाश काळे

उमरगा: उमरगा-लोहारा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तुल्यबळ उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, सर्व बाजूंनी ‘हत्ती एवढं बळ’ असणाऱ्या उमेदवाराची चाचपणी अंतिम टप्प्यात आली आहे.

दरम्यान, सर्व राजकीय गणित बदलण्याचा प्रयत्न या निवडणुकीत होण्याची शक्यता दिसत आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात माला जंगम समाजाच्या उमेदवाराची वर्णी लागण्याच्या हालचाली सुरू आहेत.

यांच्या नावावर सध्या मंथन सुरू...

उमरगा विधानसभा मतदारसंघात तीनही टर्ममध्ये बौद्ध समाजातील उमेदवाराला संधी देण्यात आली होती. काँग्रेसच्या पारंपरिक मतांच्या बळावर तीनही उमेदवारांना मिळालेली मते लक्षणीय होती. पण, विजय मिळवता आला नाही. आता काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत आहे. पण, उमेदवारीचा प्रबळ दावा ठाकरे गटाचा आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले दिलीप भालेराव यांचे उमेदवारीसाठी पडद्यामागच्या हालचाली सुरू आहेत.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाकडून डॉ. संजय कांबळे, डॉ. बी.पी. गायकवाड, माजी खासदार शिवाजी कांबळे, विलास व्हटकर, अशोकराजे सरवदे, अजयकुमार देडे, सदाशिव भातागळीकर, रमेश धनशेट्टी यांचा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहे.

महावितरणचे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता वीरपक्ष स्वामी, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक (पिंटू) स्वामी या दोन नावांची शिफारस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यावर एका नावाची शिफारस करण्याची सूचना आल्याने जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रवीण स्वामी यांचा बायोडेटा मागवून घेण्यात आला आहे. तसेच, सातलिंग स्वामी यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

Deolali Assembly Constituency : देवळालीच्या वाढीव टक्क्याचा लाभार्थीचा फैसला शनिवारी

SCROLL FOR NEXT