Kolhapur South Vidhan Sabha Elections 2024 sakal
Maharashtra Assembly Election

Kolhapur South Assembly Elections 2024: निवडणूक लढवण्याची संधी द्या; कार्यकर्ते गृहमंत्री 'अमित शहा' यांच्यासमोर मांडणार भावना

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीची तयारी केली, बूथ रचना बांधली. पण, ऐनवेळी उमेदवारी शिंदे गटाकडे गेली. जनसुराज्यबरोबर युती असल्याने पन्हाळा-शाहूवाडी मिळणार नाही. इचलकरंजीत आवाडे पिता-पुत्रांमुळे भाजप कार्यकर्त्याला संधी नाही.

चंदगड, कागल, राधानगरी येथेही संधी नाही. त्यामुळे आता उपदेश नको तर प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याची संधी द्या, अशी भावना भाजपचे नेते आणि कार्यकर्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडणार आहेत.

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात कमळ चिन्हावरील उमेदवार द्यावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अमित शहा, महाराष्ट्राचे प्रभारी भुपेंद्र बघेल, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्ता मेळाव्यासाठी येणार आहेत. महासैनिक दरबार हॉल येथे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कार्यर्त्यांचा मेळावा होणार आहे. मात्र, आता जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते आणि नेते हे उपदेश ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.

आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी द्या, ही त्यांची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघ हे भाजपच्या प्रमुख क्लस्टरच्या यादीत होते.

या चार जागांची मागणी

कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी यांच्यासह हातकणंगले, कोल्हापूर उत्तर या चार जागांची मागणी भाजप करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. यासाठी अमित शहा यांच्या भाषणानंतर भूपेंद्र बघेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक या बैठकीला असतील.

तत्कालीन केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी सुमारे चार ते पाच वेळा दौराही केला. मात्र, ऐनवेळी जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ हे शिवसेना शिंदे गटाला देण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली. विधानसभा निवडणुकीतही कागल आणि चंदगड मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) आहेत, तर राधानगरी मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहे. पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघ जनसुराज्यकडे निश्चित असून, हातकणंगले मतदारसंघावरही त्यांचा दावा आहे.

कोल्हापूर उत्तर, करवीर आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा सांगितला आहे. म्हणजे जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजी हे दोनच मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार आहेत. त्यातही आवाडे पिता-पुत्र काय भूमिका घेणार यावर इचलकरंजी मतदारसंघाचे भविष्य अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनी काय करायचे? निवडणूक लढवण्याची संधीच मिळणार नसेल तर मेळावे तरी का करायचे, असा कार्यकर्त्यंचा सवाल आहे. त्यामुळे आता उपदेश पुरे झाला आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी द्या, अशी आग्रही भूमिका पक्षातील प्रमुख कार्यकर्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडणार आहेत.

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS W vs SA W: गतविजेता ऑस्ट्रेलिया 15 सामन्यानंतर मोक्याच्या क्षणी हरला; दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला

Hamas Chief Death: हमास प्रमुख याह्या सिनवर इस्राईल लष्कराच्या हल्ल्यात ठार; पंतप्रधान नेत्यानाहूंची घोषणा

Baba Siddiqui Case: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आरोपी शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तरच्या विरोधात लुक आउट सर्कुलर जारी

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT