PM Narendra Modi sakal
Maharashtra Assembly Election 2024 News and voting updates

पंतप्रधान मोदींची घोषणा! शेतकऱ्यांसाठी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल; मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत नुरा कुस्ती, महाविकास आघाडी म्हणजे चाके अन्‌ ब्रेक नसलेली गाडी असल्याचीही टीका

स्थिर सरकारच महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेईल. ज्यांना महिला, शेतकरी, युवा, व्यावसायिकांची काळजी आहे अशी महायुतीच स्थिर सरकार देऊ शकते. दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजे चाके अन्‌ ब्रेक नसलेली गाडी असून त्यांच्यात आतापासूनच मुख्यमंत्री पदावरून नुरा कुस्ती सुरू असल्याने ते कधीही स्थिर सरकार देऊ शकणार नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

तात्या लांडगे

सोलापूर : स्थिर सरकारच महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेईल. ज्यांना महिला, शेतकरी, युवा, व्यावसायिकांची काळजी आहे अशी महायुतीच स्थिर सरकार देऊ शकते. दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजे चाके अन्‌ ब्रेक नसलेली गाडी असून त्यांच्यात आतापासूनच मुख्यमंत्री पदावरून नुरा कुस्ती सुरू असल्याने ते कधीही स्थिर सरकार देऊ शकणार नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांचाही समाचार घेतला.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (ता. १२) शहरातील होम मैदानावर सभा झाली. यावेळी महिलांची मोठी गर्दी होती. व्यासपीठावर खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, राम सातपुते, यशवंत माने, देवेंद्र कोठे, मीनल साठे, दिग्विजय बागल आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, महाविकास आघाडीत आताच एकजण आमचा हा मुख्यमंत्री होईल असल्याचे सांगत आहे. त्यावर काँग्रेस तसे काही नसल्याचे स्पष्टीकरण देत आहे. काँग्रेसने ५०-६० वर्षांत सामान्यांना कायम अडचणीत ठेवले आणि त्यावर राजकारण केले. शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय केली नाही. उसाला रास्त भाव दिला नाही, पेट्रोलमध्ये केवळ दोन ते तीन टक्केच इथेनॉल मिसळत होते. पण, आम्ही १५ टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले आणि त्यातून शेतकऱ्यांना ८० हजार कोटी रुपये मिळाले. लाडकी बहीण योजनेमुळे महाविकास आघाडीची झोप उडाली असून योजना बंद करण्यासाठी ते न्यायालयातही गेले. पण, सरकारने महिलांना लाभ दिला आणि महिलांना दिवाळीत खूप खरेदी करता आली.

आता काँग्रेसला एससी- एसटी व ओबीसीमध्ये भांडणे लावून त्यांचे विभाजन करायचे आहे. त्यांचे नेते परदेशात जाऊन आरक्षण संपवणार म्हणत आहेत. त्यांची खूप वर्षांपूर्वीची आरक्षणाबद्दलची भूमिका त्यावेळची वर्तमानपत्रे काढून पहा, त्यांनी नेहमीच आरक्षणाला विरोध केला आहे. त्यांचे हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी महायुतीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. खोट्या आश्वासनाचे ट्रॅक रेकॉर्ड घेऊन ते हरियाणातही आले होते, पण तेथील लोकांनी काँग्रेसला ओळखले आणि सत्तेपासून दूर ठेवले. आता महाराष्ट्र व झारखंडमध्येही त्यांची अशीच अवस्था होणार असल्याचेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...

  • आतापर्यंत झालेल्या सर्वच पंतप्रधानांमध्ये सर्वाधिक वेळा सोलापुरात येणारा मी एकमेव

  • आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला एससी, एसटी व ओबीसींमध्ये फूट पाडून सत्ता मिळवायची आहे

  • महाविकास आघाडी अस्थिर, ते राज्य कसे चालवू शकतात?

  • तीन कोटी महिलांना बचत गटांच्या माध्यमातून लखपती बनविणार

  • पीएम विश्वकर्मा योजनेतून छोट्या व्यावसायिकांना १३ हजार कोटींची मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT