lok sabha election narendra modi and uddhav thackeray meeting in solapur today Sakal
Maharashtra Assembly Election

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्‌ उद्धव ठाकरे यांच्या सोलापुरात प्रचारसभा; मोदींची दुपारी २ वाजता सोलापुरात तर ठाकरेंची बार्शीत ५ वाजता सभा; सभेसाठी ११०० पोलिसांचा बंदोबस्त

सोलापूर जिल्ह्यातील सहा जागांवर भाजपचे उमेदवार आहेत. त्यात सोलापूर शहर मध्य (देवेंद्र कोठे), शहर उत्तर (विजयकुमार देशमुख), दक्षिण सोलापूर (सुभाष देशमुख), अक्कलकोट (सचिन कल्याणशेट्टी), माळशिरस (राम सातपुते) व पंढरपूर- मंगळवेढा (समाधान आवताडे) या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सोलापुरात येत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या (मंगळवारी) दुपारी दोन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होम मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी सोमवारी (ता. ११) शहर पोलिसांनी विमानतळ ते होम मैदान या मार्गावर वाहतुकीचा डेमो घेतला. तत्पूर्वी, या मार्गावरील छोटे छोटे फलक, हातगाडे हटविण्यात आले होते. तसेच विमानतळ ते होम मैदान या मार्गाला जोडणारे छोटे छोटे रस्ते देखील बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आले आहेत. या मार्गावर उद्या (मंगळवारी) सकाळी सातपासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सहा जागांवर भाजपचे उमेदवार आहेत. त्यात सोलापूर शहर मध्य (देवेंद्र कोठे), शहर उत्तर (विजयकुमार देशमुख), दक्षिण सोलापूर (सुभाष देशमुख), अक्कलकोट (सचिन कल्याणशेट्टी), माळशिरस (राम सातपुते) व पंढरपूर- मंगळवेढा (समाधान आवताडे) या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (मंगळवारी) सोलापुरात येत आहेत. ते विमानाने सोलापूर विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर तेथून ते बायरोड सभेच्या ठिकाणी येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर रंगभवन, डफरीन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचकट्टा या चौकातून पुढे वाहनांना सभा संपेर्यंत प्रवेशबंदी असणार आहे. दरम्यान, सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विरोधी पक्षातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे. सोलापूर विमानतळाच्या उद्‌घाटनानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी सोलापूर विमानतळावर उतरत आहेत. त्यांच्या सभेला अंदाजे एक ते दीड लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

तातडीच्या आरोग्य सुविधांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक

पंतप्रधानांच्या सभेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक, विशेष रुग्णवाहिका, आयसीयूची उपलब्धता यासह ५० पेक्षा अधिक डॉक्टर त्या ठिकाणी असणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महापालिका आरोग्य विभागाचे विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. त्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे चार विशेषज्ञ असतील. तसेच महापालिका आरोग्य विभागाने डफरीन हॉस्पिटलमध्ये १० ते १५ आयसीयू बेड, पाच डॉक्टरांचे पथक आणि ५० जणांचा नर्सिंग स्टाफ अशी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सर्व प्रकारच्या संभाव्य घटनांसाठी आवश्यक त्या आरोग्य सुविधा तातडीने पुरविण्याची जबाबदारी या पथकांवर असणार आहे.

वाहनांसाठी ‘येथे’ पार्किंगची सोय

हरिभाई देवकरण प्रशालेचे मैदान, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटचे मैदान, होमगार्ड मैदान, जुनी मिल कंपाउंड मैदान, एक्झिबिशन ग्राउंड अशा चार ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची सोय असणार आहे. दुसरीकडे, पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी साधारणत: अर्धा तास आणि सभा संपण्याच्या अर्धा तास अगोदर होम मैदान ते विमानतळ व विमानतळ ते होम मैदानावरील वाहतूक थांबविली जाणार आहे. यावेळी वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.

विमानतळ ते होम मैदान रस्ता चकाचक

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने २२५ कर्मचाऱ्यांकडून सोमवारी (ता. ११) विमानतळ ते होम मैदान हा रस्ता, दुभाजक, फुटपाथ, वेडीवाकडी वाढलेल्या झाडांच्या फांद्या, लटकणारे केबल, वायरी व छोटे- मोठे फलक हटविले आहेत. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी झाल्यानंतर रात्री या मार्गावरील छोटे- मोठे खड्डेही बुजविण्यात आले.

पोलिसांचा बंदोबस्त

  • एकूण पोलिस

  • ११००

  • अधिकारी

  • १५०

  • बाहेरील बंदोबस्त

  • २५०

उद्धव ठाकरे यांची आज बार्शीत सभा

बार्शी विधानसभा मतदारसंघात तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासाठी प्रचारसभा पार पडली होती. त्यानंतर आता आज (मंगळवारी) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बार्शीतील यशवंतराव चव्हाण सभागृहासमोरील जुना गांधी पुतळाजवळील मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. सभेच्या ठिकाणी १० वरिष्ठ पोलिस अधिकारी व १०० पोलिस कर्मचारी, १०० भारतीय तिबेटियन सीमा पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT