Sanjay Jagtap Vs Vijay Shivtare:  Esakal
Maharashtra Assembly Election

Purandar Assembly: पुरंदर हवेली मतदारसंघात पुन्हा जगताप विरुद्ध शिवतारे सामना रंगण्याची शक्यता

Sanjay Jagtap Vs Vijay Shivtare: महायुतीतून शिवसेनेला जागा सोडण्याचा आशावाद असल्याने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

उमेदवारीसाठी महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात चुरस दिसून येत आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार संजय जगताप एकमेव इच्छुक आहेत. उमेदवारीसाठी महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपातूनही तयारी. मात्र, महायुतीतून बंडखोरीची शक्यता कमी आहे. महायुतीतून शिवसेनेला जागा सोडण्याचा आशावाद असल्याने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.

अशी आहे स्थिती
१. काँग्रेस पक्षाला ही जागा सुटेल याची खात्री असल्याने आमदार संजय जगताप यांच्याकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात
२. पक्ष श्रेष्ठींकडून काँग्रेसला जागा सोडण्याचे संकेत तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संभाजी झेंडे यांची जोरदार तयारी.
३. निवडणूक लढविण्यावर संभाजी झेंडे ठाम असल्याने उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवू शकतात.
४. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनेही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे इच्छुक.
५. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाची शिफारस
६. भाजपच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, कात्रज दूध संघाचे माजी संचालक गंगाराम जगदाळे, माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती बाबा जाधवराव, पंडित मोडक इच्छुक.

निवडणूक मुद्दे
महायुतीकडून गुंजवणीचे पाणी, विमानतळ, आंतरराष्ट्रीय बाजार, आमदारांची अकार्यक्षमता आदी मुद्दे प्रभावीपणे मांडले जातील.
महाविकास आघाडीकडून महायुती सत्तेत आल्यापासून निधीतून डावलणे. गुंजवणीच्या पाण्यासाठी असहकार. सासवड ,जेजुरी नगरपालिका ‘अमृत २’मधून डावलणे. नियोजन समितीत निधीतून डावलणे. रखडलेल्या नोकरभरतीमुळे नागरिक सुविधांपासून वंचित. बारामतीला नदी सुधार योजनेला कोट्यवधीचा निधी, पण पुरंदरमध्ये कऱ्हा नदीवरील बंधारे दुरुस्तीसाठी, कऱ्हा नदीलगतच्या धोकादायक गावांच्या संरक्षक भिंतीसाठी निधी नाही.

पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघ अशी झाली लढत : २०१९
विजयी उमेदवार : पक्ष : मिळालेली मते (मताधिक्य)
संजय जगताप : कॉंग्रेस : १३०७१० (३१४०४)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT