Ratnagiri Assembly Elections esakal
Maharashtra Assembly Election

Ratnagiri Elections : महायुतीत नाराजी, तर महाविकास आघाडीत आलबेल; अंतर्गत धुसफुशीचे आव्हान, भाजपमध्ये खदखद

राजेश कळंबटे

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेचा उमेदवार अजूनही निश्चित नाही. भाजपचे माजी आमदार बाळ माने-ठाकरे सेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला (BJP) एकही जागा मिळणार नसल्याच्या चर्चेमुळे महायुतीत नाराजीनाट्य सुरू असून, पाचही विधानसभा मतदारसंघांत खदखद आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) परिस्थिती आलबेल असल्याचेच दिसते. युतीअंतर्गत सुरू असलेल्या गोंधळावर पडदा टाकण्याचे आव्हान वरिष्ठांपुढे आहे.

विधानसभा निवडणूक #ElectionWithSakal जाहीर झाल्यामुळे महायुती-महाविकास आघाडीतील जागा वाटपाला वेग येणार आहे. गेल्या काही दिवसांत महायुतीत (Mahayuti) कलगीतुरा रंगला आहे. कोकणात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत व्हावी, अशी तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला जागा मिळणे अशक्य आहे. पारंपरिक गुहागर मतदारसंघावरही पाणी सोडावे लागण्याचे संकेत नेत्यांनी दिले आहेत. यावरून शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.

त्याचे लोण जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत पोचले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवार उभा करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. लोकसभेपासूनच दापोलीतील भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात आघाडी उघडलेली आहे. त्याच्यामध्ये अजूनही समेट झालेला नाही. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. रत्नागिरीत माजी आमदार बाळ माने यांनी उघडपणे तर भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात पाऊल टाकले आहे. तसेच वक्फ बोर्डाच्या कार्यालयावरून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न स्थानिक नेतृत्वाकडून सुरू आहे.

राजापूर-लांजा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे की भाजपकडे यावरून अजूनही निर्णय झालेला नाही. यामध्ये खासदार नारायण राणेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही पक्षांतील धुसफूस भविष्यात कायम राहिली तर त्याचे पडसाद निवडणुकीत परिणामकारक ठरतील. महायुतीत चिपळूणबाबत एकमत झाले असले तरीही विद्यमान आमदार शेखर निकम यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पाचही मतदारसंघांत महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगले आहे.

महायुतीमध्ये गोंधळ सुरू असतानाच महाविकास आघाडीतील वातावरण आलबेल आहे. चिपळूण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे तर दापोली-खेड-मंडणगड, गुहागर, रत्नागिरी, राजापूर-लांजा मतदारसंघ ठाकरे सेनेला दिले जाणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. काँग्रेसकडून राजापूर-लांजा मतदारसंघासाठी चाचपणी सुरू असली तरीही विद्यमान आमदार ठाकरे सेनेचा असल्याने तिथे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता कमीच आहे. या जागेवरून काँग्रेस-ठाकरे शिवसेनेत द्विधा मनःस्थिती किंवा वाद नाहीत.

रत्नागिरीत ठाकरे सेनेत उमेदवारीचा तिढा

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेचा उमेदवार अजूनही निश्चित नाही. भाजपचे माजी आमदार बाळ माने-ठाकरे सेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या गोष्टीला ठाकरे सेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे ठाकरे सेनेत उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

Justice Idol: कायदा आता आंधळा नाही! न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन्..., सरन्यायाधिशांचा मोठा निर्णय

Shyam Manav: श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजप सीईसीची बैठक

SCROLL FOR NEXT