महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरीचे सूर पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत बंडखोरांना शांत करण्यासाठी दोन्ही आघाडीच्या नेत्यांना बरेच प्रयत्न करावे लागतील. बंडखोरी आता मविआसमोर आव्हान बनले आहेत.
कसब्यात काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांविरोधात काँग्रेसच्याच कमल व्यवहारेंनी बंडखोरी केली आहे. पारोळा-एरंडोल मतदारसंघात शरद पवार गटाच्या सतिष पाटलांविरोधात ठाकरे गटाच्या हर्षल मानेंनी बंडखोरीचे शस्त्र उगारले आहे. पारोळ्यात सतिष पाटलांविरोधात ठाकरे गटाच्याच नानाभाऊ महाजन यांनी बंडखोरी केली आहे. परळीत शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांविरोधात पवार गटाचेच राजभाऊ फड यांचं बंड चर्चेत आले आहे. बीडमध्ये शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागरांविरोधात पवार गटाच्याच ज्योती मेटेंनी बंडखोरी केली आहे.
तर दुसरीकडे भायखळ्यात ठाकरे गटाच्या मनोज जामसुतकरांविरोधात काँग्रेसच्या मधु चव्हाणांनी बंडखोरी केली आहे. राजापूरमध्ये ठाकरे गटाच्या राजन साळवींविरोधात काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी बंडखोरी केली आहे. जिंतूरमध्ये शरद पवार गटाच्या विजय भांबळेंविरोधात काँग्रेसच्या सुरेश नागरेंनी बंडखोरी केली आहे. राजापूरमध्ये ठाकरे गटाच्या राजन साळवींविरोधात ठाकरे गटाच्याच उदय बनेंनी बंडखोरी आव्हान बनली आहे. श्रीगोंद्यात ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडेंविरोधात शरद पवार गटाच्या राहुल जगतापांनी बंडखोरी केली आहे.
सांगोल्यात ठाकरे गटाने दीपक साळुंखेंना तिकीट दिल्यानंतर मविआतील शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी बंडखोरी केली आहे. दक्षिण सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाने अमर पाटलांना तिकीट दिले आहे. इथं काँग्रेसच्या दिलीप मानेंनी बंड केलं आहे. पंढरपुरात आधी काँग्रेसनं भगीरथ भालकेंना तिकीट दिलं आहे. त्यानंतर शरद पवार गटाच्या यादीत पंढरपुरातच अनिल सावंतांचं नाव जाहीर झाले आहे. परांड्यात ठाकरे गटाने रणजीत पाटलांना तिकीट दिले आहे. इथंच शरद पवार गटाने राहुल मोटेंनाही उमेदवारी जाहीर केली आहे.
कुर्ल्यात ठाकरे गटानं प्रविणा मोरजकरांना तिकीट दिले आहे. पण शरद पवार गटाकडून मिलिंद कांबळेंनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. तर पुण्यात पर्वती मतदारसंघात मविआत बंडखोरी झाली आहे. काँग्रेसचे आबा बागुल यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्या विरोधात बंड केले आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. काँग्रेसचे मनीष आनंद यांनी काँग्रेसचेच दत्ता बहिरट या अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज भरला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.