महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपली आहे. राज्यातील २८८ जागांसाठी एकूण ७९९५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महायुती आणि मविआने त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. असे असतानाही अनेक जागांवर बंडखोरांनी बंड पुकारले आहे. महायुतीमध्येही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. यामुळे अधिकृत उमेदवाराची कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच महायुतीत राजकीय तणाव वाढला आहे.
पाचोऱ्यात शिंदे गटाचे किशोर पाटील महायुतीचे उमेदवार आहेत.तिथं भाजपच्या अमोल शिंदेंनी बंडखोरी केली आहे. बुलढाण्यात शिंदेंचे संजय गायकवाड अधिकृत उमेदवार आहेत. इथं भाजपच्या विजयराज शिंदेंची बंडखोरी केली आहे. मेहकरमधुन रायमुलकरांना शिंदेंचं तिकीट देण्यात आले आहे. तिथे भाजपच्या प्रकाश गवईंनी बंड केले आहे. ओवळा माजीवाड्यातून शिंदेंच्या प्रताप सरनाईकांविरोधात भाजपचे उपमहापौर राहिलेल्या हसमुख गेहलोत यांनी बंड केले आहे.
पैठणमध्ये शिंदेंच्या विलास भुमरेंविरोधात भाजपच्या सुनिल शिंदेंनी बंडखोरी केली आहे. जालन्यात शिंदेंच्या अर्जुन खोतकरांविरोधात भाजपच्या भास्कर दानवेंनी बंडखोरी केली आहे. सिल्लोडमधून अब्दुल सत्तारांच्या विरोधात भाजपच्या सुनिल मिरकरांनी बंडखोरी केली. तर सावंतवाडी शिंदेंच्या दिपक केसरकरांविरोधात भाजपच्या विशाल परबांनी बंडाचं शस्त्र उगारलं आहे. घनसावंगीत शिंदे गटाच्या हिमकत उढाणांविरोधात भाजपचे सतिश घाटगेंनी बंडखोरी केली आहे. कर्जतमधून शिंदेंच्या महेंद्र थोरवेंविरोधात भाजपच्या किरण ठाकरेंची बंडखोरी आव्हान बनली आहे.
अहेरीत दादा गटाच्या धर्मराव अत्रामांविरोधात भाजपचे अंबरिश अत्रामांनी बंडखोरी केली आहे. अमळनेरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांविरोधात भाजपच्या शिरिश चौधरींनी बंडखोरी केली आहे. अमरावतीत सुलभा खोडके विरोधात भाजपचे जगदिश गुप्तांकडून बंडखोरी करण्यात आली आहे. वसमतमध्ये राजू नवघरेंविरोधात भाजपचे मिलिंद एंबलांनी बंडखोरी केली आहे. पाथरीत राजेश विटेकरांविरोधात भाजपचे रंगनाथ सोळंकेची बंडखोरी चर्चेचा विषय बनली आहे.
शाहपूरमधून दौलत दरोडांविरोधात रंजना उगाडा यांनी बंडखोरी केली आहे. जुन्नरमध्ये अतुल बेनकेंविरोधात भाजपच्या आशा बुचकेंची बंडखोरी आव्हान ठरली आहे. मावळात सुनिल शेळकेंविरोधात भाजपच्या भेगडे बंधूंनी बंडखोरी केली आहे. उदगीरमध्ये संजय बोनसोडेंविरोधात भाजपच्या दिलीप गायकवाडांनी बंडखोरी केली आहे. कळवणमध्ये नितिन पवारांविरोधात रमेश थोरातांनी बंडखोरी केली आहे.
ऐरोलीत भाजपच्या गणेश नाईकांविरोधात शिंदे गटाच्या विजय चौघुलेंनी बंड केले आहे. बेलापुरात भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात विजय नाहटांनी बंडखोरी केली आहे. कल्याण पुर्वमधून भाजपच्या सुलभा गायकवाडांविरोधात महेश गायकवाडांनी बंडखोरी केली. विक्रमगडमधून भाजपच्या हरिश्चंद्र भोयेंविरोधात प्रकाश निकमांनी बंडखोरी केली आहे. फुलंब्रीत भाजपच्या अनुराधा गायकवा़डांविरोधात रमेश पवारांनी बंडखोरी केली आहे. तर सोलापूर शहर मध्यमध्ये देवेंद्र कोठेंविरोधात मनीष काळजेंची बंडखोरी आव्हान ठरली आहे.
पाथरीत राजेश विटेकरांविरोधात शिंदे गटाच्या सईद खानांनी बंडखोरीचे शस्त्र उगारले आहे. आळंदीतून दिलीप मोहितेंविरोधात अक्षय जाधवांचं बंड चर्चेचा विषय बनला आहे. जुन्नरमध्ये अतुल बेनकेंविरोधात माजी आमदार शरद सोनवणेंनी बंड केले आहे. येवल्यात छगन भुजबळांविरोधात सुहास कांदेंच्या पत्नीने बंड केले आहे.वाईमधून मकरंद पाटलांविरोधात पुरूषोत्तम जाधवांनी बंडखोरी केली आहे. अणुशक्तीनगरमधुन सना मलिकांविरोधात अविनाश राणेंनी बंडखोरी केली आहे. देवळालीत सरोज अहिरेंविरोधात राजश्री अहिररावांनी बंड केले आहे.
दिंडोरीत नरहरी झिरवाळांविरोधात धनराज महालेंनी बंडखोरी केली आहे. बीडमध्ये योगेश क्षिरसागरांविरोधात अनिल जगतापांनी बंडखोरी केली आहे. आष्टीमध्ये भाजप उमेदवार सुरेश धस यांच्या विरोधात दादांचे आमदार बाळासाहेब आजबेंची बंडखोरी आव्हान ठरली आहे. केजमध्ये भाजपच्या माजी आमदार संगिता ठोंबरेंनी भाजपच्या नमिता मुंदडांविरोधात बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. गेवराईमध्ये भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सध्या दादांच्या राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी मिळाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.