Guhagar Assembly Elections 2024 sakal
Maharashtra Assembly Election

Guhagar Assembly Elections 2024: भास्कर जाधव- साड्या वाटणारे कोरोना, वादळात होते कुठे ?

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण: निवडणूक आल्यामुळे भाजपची मंडळी आज गावागावात जाऊन महिलांना साड्या वाटप करत आहेत; परंतु, कोरोनाच्या संकटकाळात त्याचबरोबर निसर्ग, तौक्ते यासारख्या चक्रीवादळाच्या काळात ही मंडळी होती कुठे,

असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी पुणेकरांच्या मेळाव्यात काढले.

पुणे येथे वास्तव्यास असलेल्या गुहागर मतदार संघातील रहिवाशांचा मेळावा पुण्यातील चांदणी लॉन्स येथे झाला. मेळाव्याला गुहागर, खेड आणि चिपळूण तालुक्यातील हजारोंच्या संख्येने पुणेकर उपस्थित होते. कोरोनाच्या काळात लोकांना औषधे, धान्य पुरवण्यापासून मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांना गावात घेतलं पाहिजे यासाठी प्रबोधन करण्यापर्यंतचे काम आम्ही केले.

वेगवेगळ्या चक्रीवादळांच्या काळात नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम केले. त्या वेळी सध्या साडीवाटप करणारी भाजपची मंडळी घरात बसलेली होती, अशी घणाघाती टीका आमदार जाधव यांनी केली.

तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केलेल्या विकासकामांना स्थगिती दिली. मेळाव्याला शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरपुडे, महानगरपालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, गुहागर संपर्कप्रमुख प्रकाश महाडिक, महिला संघटिका सविता मते आदी उपस्थित होते.

लाडकी बहीणपासून ५ कोटी महिला वंचित...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा केवळ गवगवा आहे. राज्यात ६ कोटी ५३ लाख महिलांपैकी केवळ १ कोटी १३ लाख महिलांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित ५ कोटी ४० लाख महिला या योजनेपासून वंचित आहेत, असेही आमदार जाधव यांनी सांगितले.

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

Kolhapur South Assembly Elections 2024: निवडणूक लढवण्याची संधी द्या; कार्यकर्ते गृहमंत्री 'अमित शहा' यांच्यासमोर मांडणार भावना

Kagal Assembly Elections 2024: मुख्यमंत्र्यांसमोर मंडलिक गटाची पोस्टरबाजी ‘चेहरा नवा, विरेंद्र हवा’ चा फलक झळकवला !

Zeeshan Siddiqui Post: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया समोर, भावनिक पोस्ट लिहित म्हणाले...

SCROLL FOR NEXT