Sayaji Shinde _ NCP 
Maharashtra Assembly Election

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

सकाळ ऑनलाईन

मुंबई : मराठी, हिंदी तसंच साऊथमधील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण या राजकारणातील प्रवेशानंतर त्यांनीच राजकारणावर भाष्य केलेलं एक रिल व्हायरल झालं आहे. त्यावरुन सोशल मीडियात अनेक मिम्सही पाहायला मिळत आहेत.

काय आहे रिल?

सयाजी शिंदे यांनी बनवलेलं हे रिल असून यामध्ये तेच स्वतः राजकारणावर भाष्य करताना दिसत आहेत. एका नदीवरील पुलावर उभे असताना सयाजी शिंदे यांनी हे रिल शूट केलं आहे. यामध्ये ते म्हणतात, विचारधारा....विचारधारा...विचारतोयस! सत्तेला धरा, हीच विचारधारा. ये भावड्या सत्याला नाही सत्तेला...असं त्यांनी म्हटलं आहे.

या रिलद्वारे सयाजी शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अजित पवार सध्या महायुतीच्या सरकारमध्ये अर्थात सत्तेत आहेत. म्हणजेच सयाजी शिंदे यांनी रिलमध्ये म्हटल्याप्रमाणं त्यांनी आपल्याबाबत खरं करुन दाखवलंय, अशा प्रतिक्रिया युजर देत आहेत.

तसंच त्यांच्या राजकारणातील प्रवेशावर इतर मिम्सही व्हायरल झाले आहेत. सरपंचपद टिकवायचंय नाहीतर....महाविकास आघाडीतच आलो असतो....असं मिम एका युजरनं पोस्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

Air India Flight: हवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाचा लँडिंग गिअर अडकला! 140 प्रवाशांसह दोन तासांनी सुरक्षित लँडिंग

SCROLL FOR NEXT