अकोले : दिल्लीश्वरापुढे झुकणार नाहीत, असे आमचे नेते शरदचंद्र पवार आहेत. तेव्हा विधानसभा निवडणुकीत लढेंगे और जितेंगे, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमित भांगरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाजारतळावर आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात बहिणी लाडक्या झाल्या. सत्ताधाऱ्यांना बहिणींचे प्रेमच कळले नाही. नात्यात पैसे नसतात, प्रेम असते व जिथे पैसे आले, तेथे प्रेम रहात नसते. लडक्या बहिणींना पैसे दिले. मात्र, सुरक्षा व सन्मान दिला नाही. आपले सरकार आल्यावर महिला-मुलींची छेड काढण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. महिला व मुलींचे संरक्षण करण्याचे काम आपले सरकार करेल. आपले सरकार आले, तर राज्याबाहेर घालवलेल्या कंपन्या पुन्हा खेचून आणू, तसेच उद्योजक, गुंतवणूकदार पहिली पसंती महाराष्ट्राला देतील.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका असून, या तालुक्याने नेहमीच सत्तेच्या विरोधात व प्रतिगामी विचारांच्या विरोधात मतदान केले आहे. भाजप जोपर्यंत देशात आहे, तो पर्यंत राज्यघटनेला धोका आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. यावेळी अमित भांगरे यांचेही भाषण झाले.
यावेळी आमदार सत्यजित तांबे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले, माकपचे डॉ. अजित नवले आदींसह अनेकांनी मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी उमेदवारी देताना पक्षात नवीन तरुणांनाही सोबत घेण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवला होता. पवार साहेबांची करिअरची सुरुवात वयाच्या २७ व्या वर्षात सुरू झाली होती. आज अमित भांगरे यांचेही वय तेवढेच आहे. त्यामुळे अमित भांगरेंना सुद्धा भविष्यात पवार साहेबांसारखे काम करण्याचे भाग्य लाभावे.
अकोले ः महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे.
#Election With Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.