Maharashtra Vidhan sabha election sakal
Maharashtra Assembly Election 2024 News and voting updates

Maharashtra Assembly election 2024 : बंडाचा झेंडा फडकावलेले ऊमेदवार नाॅट रिचेबल, महायुतीच्या ऊमेदवारांची धाकधूक वाढली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये नाराज उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बंडाळी उफाळली आहे, ज्यामुळे अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. पालघर जिल्ह्यातील निवडणुकांच्या ताणतणावामुळे पक्षीय गतीकडे लक्ष वेधले आहे.

भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील बोईसर, पालघर आणि विक्रमगड या मतदार संघात निष्ठावंतांना डावलल्याने तसेच वरिष्ठांनी शब्द फिरवल्याने महायुती मध्ये बंडाळी झाली आहे. येथे महायुतीतील नाराज पदाधिकार्यांनी बंडाचा झेंडा फडकावत, बंडखोरी करून ऊमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुती ला बंडाचे ग्रहण लागले आहे.

बंडाळी शमविण्यासाठी व मोडीत काढण्यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरू असताना, तिनही विधानसभा क्षेत्राचे बंडखोर ऊमेदवार नाॅट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्टी ची डोकेदुखी तर अधिकृत ऊमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी, ऊमेदवारांची घोषणा करताच दोन्ही ठिकाणी बंडाळी उफाळून आली आहे. त्याला अपवाद जिल्हा देखील ठरलेला नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बोईसर, पालघर आणि विक्रमगड या मतदार संघात ऊमेदवारी डावलल्यामुळे येथे महायुतीत बंडाळी झाली आहे. राज्यात बंडखोरी शमविण्यासाठी युती आणि आघाडी च्या नेत्यांनी, गाठीभेटी घेण्याचे सत्र सुरू केले आहे. ऊमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिल्याने अधिकृत ऊमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

बोईसर मध्ये महायुती ने माजी आमदार विलास तरे यांना ऊमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी ऊपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी बंड करत, येथुन अपक्ष ऊमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पालघर मध्ये माजी आमदार अमीत घोडा यांना डावलून येथे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीतांना ऊमेदवारी दिली आहे. त्यामुळे अमित घोडा यांनी बंडखोरी करत आपला ऊमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विक्रमगड ची जागा भाजप ने आपल्याकडे राखत जेष्ठ कार्यकर्ते हरिश्च॔द्र भोये यांना ऊमेदवारी दिली आहे. शिंदे गटाने या जागेसाठी मोठा आग्रह धरला होता.

विक्रमगड साठी शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावान प्रकाश निकम प्रबळ दावेदार होते. त्यांना लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत ऊमेदवारी नाकारल्याने, अखेर त्यांनी बंडाचा झेंडा फडकावत विक्रमगड मधुन अपक्ष ऊमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीत पालघर च्या ग्रामीण भागातील मतदार संघात बंडखोरी झाल्याने महायुती ची डोकेदुखी वाढली आहे. येथील बंड शमविण्यासाठी युतीचे वरिष्ठ नेते प्रयत्न करत आहेत. मात्र, हे तिनही बंडखोर ऊमेदवार नाॅट रिचेबल झाले आहेत.

दरम्यान, जगदीश धोडी, अमित घोडा यांचे फोन बंद लागत असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नाही. तसेच प्रकाश निकम आणि त्यांच्या खाजगी सचिवाचा ही फोन नंबर बंद दाखवत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचाही त्यांच्याशी संपर्क झालेला नसल्याचे, कार्यकर्ते सांगत आहेत. त्यांच्या निवासस्थानी देखील ते आढळून आलेले नाहीत. त्यामुळे हे तिनही ऊमेदवार, आपल्या बंडखोरी आणि ऊमेदवारीवर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या बंडखोरी ने आणि नाॅट रिचेबल झाल्याने, महायुतीत खळबळ उडाली आहे. तर महायुती चे अधिकृत ऊमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे शेवटच्या क्षणी तिकीट कापल्याने ते नैराश्यात गेले आणि त्यानंतर चार दिवस गायब झालेले आमदार वनगा अखेर तीन दिवसांनी वनगा घरी परतले. घरी येताच वनगा यांचा सूर मुख्यमंत्र्यांविरोधातील बदलला आणि त्यांनी पक्ष सोबत कायम राहणार असल्याचे जाहीर करून नाराजी नाट्यावर पडदा टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT