Maharashtra Assembly Election

Nilesh Rane: राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार? महायुतीत नेमकं काय सुरुए?

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : यंदा विधानसभेसाठी राज्यात बरीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार आहे. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे निलेश राणे यंदा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं कळतंय. पण त्यांना शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवावी लागू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राणे कुटुंबीय सध्या भाजपत आहेत. नारायण राणे हे भाजपचे माजी मंत्री अन् आता खासदार आहेत. तर राणेंचे कनिष्ठ पुत्र नितेश राणे हे भाजपचे आमदार आहेत. पण आता त्यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरु इच्छित आहेत. पण निलेश राणे यांना शिवसेनेच्या तिकिटावर की भाजपच्या तिकीटावर लढवायचं याचा निर्णय लवकरच होणार आहे, अशी माहिती साम टीव्हीच्या सुत्रांनी दिली आहे. निलेश राणे कुडाळ-मालवण मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत.

दरम्यान, भाजप नेते नारायण राणे यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना तातडीनं वर्षा निवासस्थानी भेटण्यासाठी बोलवले आहे. त्यामुळं निलेश राणेंसाठीच काही घडामोडी घडत असल्याची कुजबुजही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंना भेटायला आलेले आदिवासी आमदार वेटींगवर; दुपारी 3 वाजताचा दिला होता वेळ

Video: मैदानातील लाईट्स गेले, २ तास खेळ थांबला अन् मग David Miller च्या वादळानं TKR चा हरवत रॉयल्सला पोहचवलं क्वालिफायर्समध्ये

Nashik Crime : मंत्री भुजबळ यांना धमकी; संशयिताला आष्टीतून अटक! शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची कामगिरी

Solapur: शिंदे सेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी घेतली खासदार सुप्रिया सुळे यांची भेट; चर्चेला उधान

Latest Marathi News Live Updates : खुनी आणि बलात्कार करणाऱ्याला किती वेळा पॅरोलवर सोडता येईल? - संजय राऊत

SCROLL FOR NEXT