Gangapur Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Assembly Election

Assembly Elections 2024: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ ताब्यात घेणार; आमदार बंब यांचा इशारा !

Gangapur Vidhan Sabha elections 2024: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ कायदेशीर ताब्यात घेणार असल्याचा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला.

सकाळ वृत्तसेवा

लासूर स्टेशन: जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या शिक्षकांविरोधात मी आवाज उठवला ‘त्या’ शिक्षकांना यांनी वैयक्तिक राजकारणासाठी पाठीशी घातले. मला विद्यार्थी घडवायचा आहे.

त्या उलट यांना पैसे कमवण्यासाठी शिक्षण संस्था वाचवायच्या आहेत. परंतु, लक्षात ठेवा माझ्या मतदारसंघात येऊन गोरगरीब जनतेला कोणी भूलथापा देऊन फसवेपणा करत असेल तर ते मी कदापि खपवून घेणार नाही.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ कायदेशीर ताब्यात घेणार असल्याचा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला. आरापूर (ता. गंगापूर) शिवारात शनिवारी गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील पाच महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन व नऊ हजार कामगारांना संसारभांडी वाटप करण्यात आली. त्याप्रसंगी आ. बंब बोलत होते.

आमदार चव्हाण यांचे नाव न घेता आमदार बंब पुढे म्हणाले, तुम्ही १७ वर्षांपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहात, त्या काळात तुम्ही केलेल्या कामाचा हिशेब जनतेसमोर मांडा. संस्थेत कामाला लागण्यासाठी शिक्षकांकडून ५०-७० लाख रुपये घेऊन ठेवले. परंतु, त्यांना अद्याप नोकरी दिली नाही. परंतु, यापुढे असे होणार नाही.

कुवतीप्रमाणे मोफत नोकऱ्या मिळतील. येत्या मार्च महिन्यापर्यंत कायदेशीररित्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ मी ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ. बंब यांनी दिला. दरम्यान, यावेळी नऊ हजार कामगार कल्याण संसारभांड्यांचे वाटप लाभधारकांना करण्यात आले.

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT