Voter List Updation 
Maharashtra Assembly Election

Voting Registration: विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं 'हे' महत्वाचं आवाहन

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती देण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजूनही मतदार नोंदणी प्रक्रिया सुरु असल्यानं ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी नोंदणी करावी असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं आहे.

मतदारांची एकूण संख्या किती?

राजीव कुमार यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यांपैकी ५४ मतदारसंघ हे राखीव आहेत. यांपैकी २५ मतदारसंघ हे एसटीसाठी तर २९ हे एससीसाठी राखीव आहेत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळं त्यापूर्वी विधानसभा निवडणूक घेणं अपेक्षित आहे.

महाराष्ट्रात एकूण मतदार ९.५९ कोटी इतके आहेत. यामध्ये ४.५९ कोटी पुरुष मतदार तर ४.६४ कोटी स्त्री मतदार आहेत. यामध्ये पहिल्यांदा मतदान करणारे १८ ते १९ वयोगटातील जे मतदार आहेत त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या नवमतदारांची संख्या १९.४८ लाख इतकी आहे"

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ECI Latest Press

मतदारयादी अपडेटशन अद्यापही सुरु

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्तांनी पुढे सांगितलं की, "मतदारांबाबत संपूर्ण डिटेल माहिती दिल्यानंतर आता महिला-पुरुष आणि इतरांचं मतदार म्हणून किती प्रमाण आहे याबाबत माहिती देतो. यामध्ये महाराष्ट्रात महिलांचा सहभाग वाढवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. महिला मतदारांच्या संख्येत २२ पॉईंटनं वाढ झाली आहे. पण पुरुष आणि महिलांची संख्या एकसारखी राहावी, यासाठी प्रयत्नही केले जात आहेत.

पण तरीही जर कोणत्या मुलीचं किंवा महिलेचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक असेल आणि त्यांचं नाव मतदार यादीतून सुटलं असेल किंवा त्यांनी नोंदवलेलं नसेल. तर त्या महिला अद्यापही आपलं नाव नोंदवू शकतात. अद्यापही मतदारयादी अपडेट करायचं काम सुरु आहे. जितके जास्तीत जास्त तरुण आणि महिला यात सहभागी होतील त्यांचं आम्ही स्वागतच करु"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

किंग कोहलीला भेटण्याची ओढ! Virat Kohli साठी १५ वर्षीय मुलाचा तब्बल ७ तास सायकल प्रवास

IPL Retention, मेगा ऑक्शन अन् अन् राईट टू मॅच कार्ड... BCCI ची मोठी घोषणा, बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय

Solapur Crime: राष्ट्रीय खेळाडूने नदीपात्रात उडी घेत जीव दिला; नेमकं काय घडलं?

Nicholas Pooran ने मोडला पाकिस्तानच्या रिझवानचा मोठा विक्रम! २०२४ वर्षात ठरला नंबर वन

Latest Maharashtra News Live Updates : गुजरातमधील बरडियाजवळ द्वारका-जामनगर महामार्गावर बस आणि दोन कार यांच्यात मोठी धडक

SCROLL FOR NEXT