येत्या काही आठवड्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सध्या सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण व्हायला सुरूवात झाली आहे. आशात लोकांमध्ये विधानसभेच्या मागील काही निवडणुकांवरही चर्चा रंगत आहेत.
महाराष्ट्राच्या आणि विशेषत मुंबईच्या राजकारणातील वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार Abu Azmi यांना ओळखले जाते.
मूळचे उत्तर प्रदेशातील असलेल्या अबू आझमी यांनी आझमगडहून येत मुंबईत (Mumbai) चांगलेच बस्तान बसवले आहे. गेल्या तीन दशकांपासून राजकारणात असलेल्या आझमींनी एक वेळा राज्यसभा आणि मानखूर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून 3 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे.
उत्तर प्रदेशातील आझमगड येथे 8 ऑगस्ट 1955 जन्मलेले आबू आझमी गेल्या 30 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत.
अबू आझमी यांना 5 मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा फरहान हा उद्योगपती असून त्यांच्या विवाह अभिनेत्र आईशा टाकीयसोबत झाला आहे.
1993 मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांना त्यावेळी अटक करण्यात आली होती. पण त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते.
बॉम्ब स्फोटांच्या आरोपांतून मुक्त झाल्यानंतर 1995 मध्ये अबू आझमी यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी समाजवादी पक्षाने त्यांच्या नेतृत्त्वाखाली दोन जागांवर विजय मिळवला होता. यानंतर 2002 मध्ये समाजवादी पक्षाने त्यांना राज्यसभेवर संधी दिली होती.
2002 ते 2008 या काळात राज्यसभा सदस्य असताना आझमी यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली यामध्ये शिवसेनेच्या योगेश पाटील यांनी आझमींना धूळ चारली होती. तर त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या गुरुदास कामत यांनी आझमींचा पराभव केला होता.
पुढे काही महिन्यांतच झालेल्या 2004 च्या महाराष्ट्र विधानसभा निवणुकीत आझमींनी मुंंबईतील मानखूर्द-शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते दोन्ही ठिकाणी विजयी झाले.
याबरोबरच महराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकाच वेळी दोन्ही ठिकाणांहून विजय मिळवणारे ते आतापर्यंतचे एकमेव व्यक्ती आहेत.
दरम्यान 2009 पासून आझमी मुंबईतील मानखूर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून सतत निवडून येत आहेत. सध्या सुरू असलेली ही त्यांची तिसरी टर्म आहे.
Raj Thackeray यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. मनसेच्या स्थापनेनंतर 2009 विधानसभा निवडणूक ही पक्षाची पहिली मोठी निवडणूक होती. यामध्ये दमदार कामगिरी करत मनसेचे 13 आमदार विधानसभेत पोहचले होते.
तेव्हा निवडणूक झाल्यानंतर आमदारांच्या शपथविधी वेळी अबू आझमी यांनी मराठी शपथ घेण्यास विरोध करत हिंदीतून शपथ घेतली. त्यावेळी आझमींनी शपथ घेताना 'मैं' ने सुरुवात केली तसे मनसेचे सर्व आमदार अबू आझमींवर धावून गेले. हा सर्व राडा सुरू असताना पुण्यातील खडकवासलाचे दिवंगत आमदार Ramesh Wanjale यांनी आझमींच्या कानशिलात लगावली होती.
ही एकच घडना नाही तर आझमी यांनी आतापर्यंत केलेल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे राज्याच्या राजकारणात मोठे वाद निर्माण झाले आहेत.
दरम्यान 2023 मध्ये विधानसभेच्या पावसाळ्यात Abu Azmi यांनी वंदे मातरम म्हणायला नकार दिली होता. यानंतर त्यांच्या विरोधात राज्यभरात मोठा संताप निर्माण झाला होता.
"आम्ही असे लोक आहोत ज्यांच्या पूर्वजांनी या देशासाठी प्राण दिले, आम्ही ते आहोत ज्यांनी पाकिस्तानला नव्हे तर भारताला आपला देश मानले. ज्याने हे संपूर्ण जग निर्माण केले त्याच्यापुढे आपले डोके झुकवायला इस्लाम शिकवतो. जर मी माझ्या धर्माप्रमाणे वंदे मातरम म्हणू शकत नाही, तर त्यामुळे माझ्या देशाबद्दलचा आदर आणि देशभक्ती कमी होत नाही आणि त्यावर कोणाचाही आक्षेप नसावा."2023 च्या पावसाळी अधिवेशनातील अबू आझमी यांचे वक्तव्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.