Rohit Pawar Sakal
Assembly Election

श्रीगोंद्यात पुन्हा ‘पवार पॅटर्न’

आमदार रोहित पवारांवर जबाबदारी, दोन्ही काँग्रेसचा समन्वय घडविण्याचे आव्हान

संजय आ. काटे

श्रीगोंदे : श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार करण्यासाठी पक्षाने कर्जत-जामखेडचे अॅक्टिव्ह आमदार रोहित पवार यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. श्रीगोंद्यात सगळे अलबेल असतानाही गेल्या विधानसभेला राष्ट्रवादी पराभूत झाली. त्यामुळे आता श्रीगोंद्यात ''राष्ट्रवादी पुन्हा'' हा जल्लोष करण्यासाठी रोहितदादांना पाठविण्याचा निर्णय झाला आहे. येथे राष्ट्रवादीत एकी करतानाच सहकारी पक्ष काँग्रेसला विश्वासात घेवून २०१४ ची पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा एकदा पवार कुटूंबाची ताकद मिळणार आहे.

विजयाची क्षमता असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आमदार होवू शकला नाही, अशा ठिकाणी अॅक्टिव्ह असणाऱ्या युवा आमदारांनी लक्ष घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंथन झाले. त्यातूनच कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे श्रीगोंद्यासह, भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, व पंढरपूर अशा पाच विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभेला राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीगोंद्यात माजी मंत्री व ज्येष्ठ भाजपा आमदार बबनराव पाचपुते यांचे कडवे आव्हान आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी खुद्द शरद पवार यांनीच श्रीगोंद्यात लक्ष घालत ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप, तुकाराम दरेकर, घनशाम शेलार यांच्यासह इतर पाचपुते विरोधकांची मोट बांधून राहूल जगताप यांच्या रुपाने युवा आमदार दिला होता.

शरद पवार यांनी तालुक्यावर लक्ष केंद्रीत केल्यावर काय होते याची झलक दाखविलीच होती. आता ही जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्या खांद्यावर दिल्याचे दिसते. रोहित पवार हे एक परिपक्व आणि जिद्दी राजकारणी म्हणून ओळखले जातात. जेथे जातील तेथे त्यांची वेगळी छाप सोडतात. श्रीगोंदे हा त्यांचा शेजारचा मतदारसंघ असून येथील राजकारण त्यांना परिचयाचे आहे. २०१४ ला बापू-तात्या हे दूरदृष्टीचे नेते होते. त्यातच साहेबांनी लक्ष घातल्याने सगळ्यांनीच त्यांचा शब्द हेच प्रमाण मानल्याने जगतापांचा विजय व पाचपुतेंचा पराभव झाला. या वेळी मात्र राजकारण बरेच फिरले. गेल्या वेळी राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. जगताप, नागवडे यांना उमेदवारी घ्या म्हणून पक्ष मागे लागला. मात्र त्यांनी हात वर केले. त्यामुळे घनशाम शेलार यांच्याकडे ती उमेदवारी आली. त्यांचा निसटता झालेला पराभव पक्ष नेतृत्वाच्या जिव्हारी लागला. आणि त्यातूनच आता रोहित पवार यांना श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी ''नीट'' करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जाते.

विकासाच्या प्रश्‍नी पवारांनी लक्ष घालावे

श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे संघटन तगडे असले तरी काँग्रेसला नागवडे कुटुंबाच्या रुपाने ताकत मिळाली आहे. त्यांना मानणारे कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत नसल्याचे सद्यस्थिती आहे. स्वबळाचा नारा दिला जात असल्याने रोहित पवार या दोन्ही काँग्रेसचा समन्वय कसा घडवितात त्याकडे लक्ष आहे. तालुक्यातील विकासाच्या प्रलंबित प्रश्‍नांतही पवार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT