एजॉल : मिझोराममध्ये विधानसभेच्या ४० जागांसाठीचं मतदानं मंगळवारी संपलं. दुपारी तीन वाजेपर्यंत ६९.८७ टक्के मतदान झालं आहे. दुपारी चार वाजेपर्यंत इथं मतदानाची वेळ होती, त्यामुळं पुढील एक तासांत मतदानाच्या टक्केवारीची आकडा वाढून मतदान ७० टक्क्यांच्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. (Polling for assembly election concludes in Mizoram 70 pc turnout)
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मिझोरामच्या नव्या विधानसभेसाठी सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. दुपारी ३ वाजेपर्यंत ६९.८७ टक्के मतदान पार पडलं. मतदानाच्या डेटानुसार, तुचांगच्या जागेसाठी ७७.१२ टक्के, तैकुमसाठी ८१.३३ टक्के, ईस्ट तुईपुईसाठी ७५.१२ टक्के आणि लावंगतलाई वेस्टच्या जागेसाठी ७६.४४ टक्के मतदान झालं आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, मिझोरामचे मुख्यमंत्री आणि मिझो नॅशनल फ्रन्टचे प्रमुख झोरामथांगा यांनी एजॉल ईस्ट १ या जागेवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. तसेच झोराम पिपल्स मुव्हमेंटचे (झेडपीएम) प्रमुख लालदुहोमा जे माजी आयपीएस अधिकारी आहेत ते पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. (Marathi Tajya Batmya)
सन २०१८च्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रन्टला २६ जागा मिळाल्या होत्या. यावेळी ३७.८ टक्के वोटशेअर होतं. यामुळं काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होतं. यंदाच्या निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रन्ट, काँग्रेस आणि झोराम पिपल्स मुव्हमेंट या तीन्ही पक्षांची राज्याती संपूर्ण ४० जागांवर आपले उमेदवार दिले होते. तर भाजपनं केवळ २३ जागांवरच उमेदवार दिले होते. (Latest Marathi News)
दरम्यान, आजच मिझोरामसह छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात २० जागांसाठी मतदान पार पडलं. यानंतर ३ डिसेंबर रोजी मिझोरामसह, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.