priyanka gandhi s reaction after congress performance in the Assembly elections results 2020  Sakal
Election News

'लोकशाहीत जनतेचे मत सर्वोच्च..'; पराभवानंतर प्रियांका गांधींची प्रतिक्रीया

सकाळ डिजिटल टीम

Election Results 2022 : आज उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर देशातील या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष (आप) आणि अन्य राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) सरकार बहुमताने सत्तेवर येत आहे. यादरम्यान कॉंग्रेस पक्षाला पंजाब येथे सत्ता गमवावी लागली आहे. उत्तर प्रदेशसह या पाचही राज्यात काँग्रेसला (Congress) म्हणावं असं यश प्राप्त झालं नाही.

या निवडणूकीतील पराभवानंतर पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये जनतेचे मत हो सर्वोच्च आहे. आमचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी कठोर परिश्रम घेतले, संघटना तयार केली, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. पण, आम्ही केलेली मेहनत ही मतांमध्ये बदलू शकलो नाही. काँग्रेस पक्ष सकारात्मक एजेंडा स्विकारुन उत्तर प्रदेशची उत्तम आणि जनतेच्या भल्यासाठी संघर्षशील विरोधीपक्षाचे कर्तव्य पुर्ण जबाबदारीनिशी पुर्ण करत राहील असे त्या म्हणाल्या आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. मतमोजणी सुरू असली तरी काही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. तर काही ठिकाणचे निकाल येणे अजून बाकी आहेत.

यूपीसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. एकीकडे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या झंझावातात बादल कुटुंब तसेच मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचाही दोन्ही जागांवरून पराभव झाला. एकूणच या निवडणुकीत दोन विद्यमान आणि पाच माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे.

दरम्यान एकट्या प्रियंका गांधींच्या (Priyanka Gandhi) जोडीला संपूर्ण काँग्रेसनं उभं राहायला पाहिजे होतं. पण, सोनिया गांधी (Sonia Gandhi) प्रचाराला गेल्या नाहीत. पाच राज्यात निवडणुका होत्या. त्यामुळं काँग्रेसनं यात झोकून द्यायला हवं होतं. पण, तसं काहीच झालं नाही, याचा फटका पक्षाला बसलाय. असे मत कॉग्रेसचे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हंटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT