Election News

Rajasthan Election : २०० जागा लढण्याचा दावा करणाऱ्या 'आप'ला मिळाले नाहीत उमेदवार; राजस्थानमध्ये ९ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात

संतोष कानडे

Rajasthan Election 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेच्या २०० जागांवर १८७५ उमेदवार नशिब आजमावत आहेत. तर ३ हजार ४३२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. निवडणूक आयोगाच्या पडताळणीनंतर ३९६ अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. तर ४९० उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत.

राजस्थानध्ये २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून १ हजार ८७५ उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहेत. तर ३ डसेंबर रोजी मतमोजणी होईल.

राजस्थानच्या २०० विधानसभा मतदारसंघापैकी काँग्रेसने १९९ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर भापजपने २०० पैकी २०० जागांवर उमेदावर उभे केलेले आहेत. बहुजन समाजवादी पार्टी अर्थात बसपाचे १८५ उमेदवार मैदानात आहेत. तर २०० जागांवर निवडणूक लढवण्याचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाला उमेदवार मिळालेले नाहीत. त्यांना २०० पैकी ५८ जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत.

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे ७८, भारतीय आदिवासी पक्षाने ५८ आणि आझाद समाज पक्षाने ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. आरएलपीचे उमेदवार डॉ. सुभाष गर्ग भारतपूरमधून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने आरएलपीसोबत युती करुन या जागेवर उमेदवार उभा केला नाही.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये १९ विधानसभा मतदारसंघ आहेत. या १९ जागांवर १९९ उमेदवार नशिब आजमावत आहेत. यासोबतच अलवर जिल्ह्यातल्या ११ जागांवर ११३ उमेदवार रिंगणात आहेत. तर सगळ्यात कमी जागा असलेल्या जैसलमेर आणि प्रतापगड जिल्ह्यात अनुक्रमे १५ आणि १४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जास्त जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होताना दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT