Election News

Rajasthan Election : सचिन पायलट यांच्याविषयी पंतप्रधानांची पुन्हा सहानुभूती; म्हणाले, एक गुर्जरांचा मुलगा...

संतोष कानडे

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस आणि गहलोत सरकावर पंतप्रधानांनी ताशेरे ओढत राजेश पाटलट यांचा उल्लेख करुन सचिन पायलट यांचं कौतुक केलं.

गांधी कुटुंबावर निशाणा साधताना पीएम मोदींनी राजेश पायलट आणि सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने अन्याय केल्याचा ठपका ठेवला आहेत. त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी यासंदर्भात भाष्य केलं. ते म्हणाले की, काल मी काँग्रेसच्या शाही परिवारावर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे तीर निशाण्यावर लागला आणि अर्ध्या तासात संपूर्ण काँग्रेस हादरली.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, कानाकोपऱ्यातून काँग्रेसवाले चावचाव करत बाहेर पडले. त्यांना माहितंय, मोदींनी अशी गोळी चालवीय की काँग्रेसचं जगणं अवघड होऊन जाईल. राजेश पायलट यांच्याविषयी काँग्रेस विधानं करीत आहे आणि पत्रकार परिषदा घेत आहे. काँग्रेस पूर्ण ताकदीने खोटं बोलत आहे की, काँग्रेसने कधीच पायलट यांचा अपमान केला नाही. परंतु खऱ्या प्रश्नांची उत्तरं ते देत नाहीयेत.

मोदी म्हणाले, सचिन पायलट यांचा अपमान आम्ही केला नाही, असं काँग्रेस सांगत असली तरी मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं ते देत नाहीत. त्यांना माझ्या प्रश्नांची त्यांना उत्तरं द्यावीच लागतील. गुर्जरांचा जेवढा अपमान काँग्रेसने केला आहे तो पहिल्या पिढीनेसुद्धा बघितला आणि आणि आजची पिढीसुद्धा बघत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Baba: वाराणसीतल्या मंदिरांमधून साई बाबांच्या मूर्ती हटवल्या अन् गंगेत केल्या विसर्जित; सनातन रक्षक दलाचं कृत्य

Shivneri Bus: शिवनेरी बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'; हवाई सेवेच्या धर्तीवर भरत गोगावलेंची पहिलीच मोठी घोषणा

Sharad Pawar: सर्वात मोठी खेळी! शरद पवारांच्या पक्षात हा मोठा पक्ष होणार विलिन; हजारो कार्यकर्त्यांचा या दिवशी प्रवेश

Latest Maharashtra News Live Updates: राज ठाकरे ऑक्टोबरमध्ये संभाजीनगर, नाशिक अन् पुणे दौऱ्यावर

''या क्षणाला आम्हालाही खात्री नाही''; MS Dhoniच्या आयपीएल २०२५ खेळण्याबाबत CSK चं मोठं विधान; त्याला Uncapped...

SCROLL FOR NEXT