Amit Shah  eSakal
Election News

Rajasthan Election 2023: "मोदींनी भारताचा तिरंगा चंद्रावर फडकवला अन्"; अमित शहांचा राजस्थानात जोरदार प्रचार

महिलांना आता ४५० रुपयांत गॅस देणार असल्याची घोषणाही यावेळी अमित शहांनी केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थानात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. इथल्या पाली इथं गृहमंत्री अमित शहा यांची आज सभा पार पडली. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामकाजाची माहिती देताना राज्यात भाजपचं सरकार आल्यावर जनतेसाठी आश्वासनांची खैरात केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी भारताचा तिरंगा चंद्रावर फडकवला असं सांगत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. (Rajasthan Assembly Election 2023 PM Modi made Indias flag reach on moon along with Chandrayaan says Amit Shah)

शहा म्हणाले, "राजस्थानात २५ पैकी २५ जागा देऊन इथल्या जनतेनं मोदीजींना पंतप्रधान बनवलं. त्यानंतर मोदींनी भारताचा तिरंगा चांद्रयानाच्या मार्फत चंद्रावर पोहोचवण्याचं काम केलं. G20 चं आयोजन करुन भारताच्या कुटनीतीचा झेंडा आकाशात फडवला. नवीन संसद भवन बनवलं, कर्तव्यपथ बनवला तसेच अकराव्या स्थानी असलेली भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी आणून देशाला समृद्ध करण्याचं काम केलं"

दरम्यान, राज्यात भाजपाचं सरकार आल्यास पीएम किसान सन्मान निधी जो सध्या ६,००० रुपये आहे तो १२००० हजार रुपये करणार असल्याचं यावेळी शहांनी सांगितलं. तसेच सर्व शेतकऱ्यांचा संपूर्ण गहू २७०० रुपये प्रति क्विंटल खरेदी केला जाईल, राजस्थानातील शेतकऱ्यांची बाजरी देखील किमान आधारभूत किंमतीत खरेदी करण्याचं काम भाजपाचं सरकार करेल. तसेच इथल्या माता-भगिनींनी आता जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण गॅसच्या किंमती किती वाढायच्यात तितक्या वाढू द्या पण त्यांना भाजप आता गॅस सिलेंडर ४५० रुपयांत देईल. मोदींनी अनेक विकासाची कामं केली आहेत.

राजस्थानसाठी १० वर्षात १५ लाख कोटी रुपये दिले तर काँग्रेसनं केवळ २ लाख कोटी रुपये दिले होते. त्याशिवाय ८० लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी दिला. त्याचबरोबर ४७ गरिबांना घरात नळ आणून पाणी दिलं, अशी आश्वासनांची खैरात अन् उपक्रमांची माहिती यावेळी अमित शहा यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT