Political-Party esakal
Election News

Assembly Election 2022: प्रादेशिक पक्षांची मोट होणार व्यापक

एवढेच नव्हे तर २०२४ मध्येही मोदींपुढे कोणतेही आव्हान नसेल.

अजय बुवा : सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची उपांत्यफेरी म्हणून चर्चेत असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशसह चार राज्यांमधील विजयाने सत्ताधारी भाजपला अजेय बनविले. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा झालेला उदय आणि भाजपला आव्हान देण्याच्या काँग्रेसच्या क्षमतेवरही उभे राहिलेले प्रश्नचिन्ह, यामुळे आगामी काळात राष्ट्रीय राजकारणात भाजपविरुद्ध प्रादेशिक पक्षांची व्यापक आघाडी असा संघर्ष दिसू शकेल. काँग्रेसचा त्यात समावेश झाला तरीही त्यासाठी अन्य पक्षांच्या अटी-शर्ती काँग्रेसला मान्य कराव्या लागतील.

उत्तर प्रदेशात यंदा भाजपला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे अंदाज वर्तविले जात असताना सहजपणे दुसऱ्यांदा सत्ता मिळण्यात भाजप यशस्वी ठरल्याने मोदी-शहा जोडीचे पक्षांवरील वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे. शिवाय, भाजपच्या काही प्रमाणात घटलेल्या जागांमुळे राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वासाठी भरारी घेण्याच्या योगी आदित्यनाथ यांच्या पंखांना कात्री लावण्यात लावली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये या सर्वोच्च पदांवर आपल्याला हवा तो चेहरा बसविण्यात मोदींना अडचण येणार नाही. एवढेच नव्हे तर २०२४ मध्येही मोदींपुढे कोणतेही आव्हान नसेल.

भाजपच्या अंतर्गत समीकरणावर परिणाम

उत्तर प्रदेशच्या विजयाचा परिणाम भाजपमधील अंतर्गत समीकरणांवर होणार असून पुढील वर्षी होणाऱ्या मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानात वसुंधरा राजे यांच्या ऐवजी पसंतीच्या नेत्यांना नेतृत्वाची संधी मोदींकडून दिली जाऊ शकते. अर्थात, त्यासाठी गुजरातमध्ये चौथ्यांदा भाजपला सत्तेत आणून निर्णायक संदेश देण्याचा मोदी-शहा जोडींचा प्रयत्न राहील. एवढेच नव्हे तर कृषी कायदे मागे घ्यावे लागण्याची ओढवलेली नामुष्की, नागरिकत्व सुधारणा कायद्याची अद्याप शक्य न झालेली अंमलबजावणी यासारखे सलणारे मुद्दे निकाली काढण्याचा समान नागरी कायदा रेटण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वाकडून यापुढील काळात होऊ शकतो. यासाठी कायदे करताना संसदेमध्ये विरोधकांशी संघर्ष पहावयास मिळेल.

काँग्रेस दोन राज्यांपुरतीच

काँग्रेसचे अस्तित्व आता छत्तीसगड आणि राजस्थान या दोन राज्यांपुरता उरले आहे. महाराष्ट्र, झारखंड, तामिळनाडूमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेसाठी शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, द्रमुक या प्रादेशिक पक्षांवर अवलंबून आहे. भाजपच्या विरोधात इतर पक्षांच्या एकजुटीसाठी काँग्रेसकडून आतापर्यंत कितीही दावे करण्यात आले असले तरी त्यामध्ये अंतिम नेतृत्व आपलेच असावे ही उघड इच्छा कांग्रेसची राहिली आहे. त्यामुळे काँग्रेसला वगळून उर्वरित पक्षांची आघाडी व्हावी यासाठी तेलंगण राष्ट्र समिती, आप, सपकडून आग्रह होण्याची चिन्हे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व शिवसेनेने काँग्रेसला वगळून आघाडी नको, अशी घेतलेली भूमिका यामुळे विरोधकांत मतभेदाची शक्यता आहे. अर्थातच, अस्तित्वाच्या या लढाईत भाजपला रोखणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याने काँग्रेसला दुय्यम भूमिका स्वीकारण्यास भाग पाडले जाऊन तडजोड होऊ शकते.

बसपची शक्ती घटली

राष्ट्रीय पक्ष भाजप विरोधात प्रादेशिक पक्षांची आक्रमकता राष्ट्रीय पातळीवर दिसू शकते. मात्र, उत्तर प्रदेशामध्ये मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची ताकदही आटली असल्याने हा पक्ष या विरोधकांच्या मांदियाळीमध्ये सहभागी होईल की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठऱेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT