Rahul Gandhi Narendra Modi esakal
Election News

मोदींचं 'गुजरात' जिंकण्यासाठी काँग्रेस मोठा डाव खेळणार!

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस उद्योगपती नरेश पटेल यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करू शकतं.

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरी करणारा काँग्रेस पक्ष (Congress Party) गुजरातमधील 28 वर्षांचा दुष्काळ संपवून राज्यात सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी काँग्रेसकडून रणनीतीही आखली जात आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि उद्योगपती नरेश पटेल (Naresh Patel) हे गुजरात निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकतात. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुका (Gujarat Assembly Election) काँग्रेस प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या देखरेखीखाली लढवू शकतं, असं कळतंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस उद्योगपती आणि प्रभावशाली पाटीदार नेते नरेश पटेल यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करू शकतं. नरेश पटेल लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय. प्रशांत किशोर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. मात्र, प्रशांत किशोर यांनी हे वृत्त फेटाळून लावलंय. नरेश पटेल हे लेउवा पाटीदार नेते आणि खोडलधाम ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. हा ट्रस्ट खोडलधाम माता मंदिराचं व्यवस्थापन करतो, जी लेउवा पटेलांची कुलदेवी आहे. गुजरातच्या पाटीदारांमध्ये नरेश पटेल यांची खूप क्रेझ आहे. दरम्यान, नरेश पटेल नुकतेच काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला भेटले असून एप्रिलमध्ये राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्यादरम्यान ते अधिकृतपणे पक्षात सामील होऊ शकतात, असंही कळतंय.

नरेश पटेल यांना गुजरातमधील काँग्रेस (Gujarat Congress) निवडणूक प्रचार समितीचं प्रमुख बनवलं जाऊ शकतं आणि निवडणुका जवळ आल्यावर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणूनही प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं. प्रशांत किशोरही लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, ‘लग्नाची वेळ प्रत्येकाला सांगितली जाते, पण मुलगी पाहण्याची वेळ नाही’, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT