Telangana Election esakal
Election News

Telangana Election : केसीआर यांनी हैदराबादमधून कोट्यवधी रुपये लुटल्याचा आरोप; राहुल गांधी थेटच बोलले

संतोष कानडे

Telangana Assembly Election 2023 : ‘‘काँग्रेसने तेलंगणातील जनतेसाठी काय केले हे विचारण्याआधी राव यांनी, त्यांच्या सरकारने तेलंगणासाठी काय केले, हे सांगावे,’’ असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. तेलंगणातील आंदोले येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारफेरी दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांशी राहुल यांनी संवाद साधला.

यावेळी राहुल म्हणाले, ‘‘केसीआर यांचे सरकार देशातील सर्वांत भ्रष्ट सरकार असून त्यांनी सर्व महत्त्वाची खाती त्यांच्या कुटुंबीयांकडेच ठेवली आहेत.’’

तेलंगणमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या हमींबद्दल मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्येच मान्यता देण्यात येईल असे आश्‍वासनही राहुल यांना यावेळी दिले.

‘‘सध्या डोरला सरकार आणि प्रजाला सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे,’’ असा दावा राहुल यांनी केला.

‘‘केसीआर विचारत आहेत की काँग्रेसने तेलंगणासाठी काय केले, परंतु मूळ सवाल हा आहे की राव यांच्या सरकारने तेलंगणासाठी काय केले? खरे तर काँग्रेसने ज्या हैदराबादचा विकास आयटी हब म्हणून केला होता त्या शहरातून राव यांनी कोट्यवधी रुपये लुटले,’’ असा आरोप राहुल यांनी केला.

''बीआरएस आणि काँग्रेसमध्ये संगनमत’'

‘‘भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि काँग्रेस यांच्यामध्ये संगनमत झाले असून तेलंगणात केसीआर यांना मुख्यमंत्री करायचे आणि त्याबदल्यात केंद्रात राहुल गांधी यांना ‘बीआरएस’कडून पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्यात येणार आहे,’’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मकथल येथील प्रचारसभेत केला.

शहा म्हणाले, ‘‘काँग्रेसचे आमदार हे चिनी मालासारखे आहेत, त्यांचा भरवसा धरू नका. तुम्ही बीआरएस विरुद्ध त्यांना मतदान केलेत तरी ते बीआरएसमध्ये जातील.’’ तेलंगणात सत्ता मिळाल्यास मागास वर्गातील व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याच्या भाजपच्या आश्‍वासनाचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: पुण्यात भयंकर प्रकार, भरदिवसा बंदूक नाचवत तरुणांचा राडा; पाहा व्हिडिओ

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

IND vs NZ: जसप्रीत बुमराहला मुंबई कसोटीतून का बाहेर केलं? BCCI ने सांगितलं खरं कारण

तब्बल ५ वर्षांनी स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घेणार निरोप; अभिनेत्यानेच पोस्ट करत सांगितलं, म्हणाला- आता लवकरच...

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT