कोणत्या पक्षाला किती जागा?
काँग्रेस- ६४
बीआरएस- ३९
भाजप- ८
एमआयएम- ७
सीपीआय- १
जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. आमच्या चुकांमधून शिकत भविष्यात काम करत राहू, असं मत केटीआर यांनी व्यक्त केलं आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही चांगलं काम करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तेलंगणामध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. याठिकाणी 61 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने आपली सत्ता निश्चित केली आहे.
दरम्यान, भाजपने तेलंगणामध्ये 8 जागांवर विजय मिळवला आहे. बीआरएस पक्षाने आतापर्यंत 33 जागा जिंकल्या असून, एमआयएमच्या खात्यात पाच जागा जमा झाल्या आहेत. सीपीआय एका जागेवर विजयी आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यपालांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या निवडणुकीमध्ये केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठत तेलंगणा राज्यात मोठा विजय मिळवला आहे.
"केसीआर आणि रेवंथ रेड्डी यांच्याकडे मी सामान्य उमेदवाराप्रमाणेच पाहत होतो. लोकांचं समर्थन आणि प्रेम मिळाल्यामुळे माझा विजय झाला. मी आता इथला आमदार झालो आहे", असं मत कामारेड्डी मतदारसंघातील विजयी उमेदवार वेंकट रमण रेड्डी यांनी व्यक्त केलं.
काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार रेवंथ रेड्डी हे कामारेड्डी मतदारसंघातून पराभूत झाले होते. मात्र, कोडंगल मतदारसंघातून त्यांना विजय प्राप्त झाला आहे. त्यांना एकूण 1,07,429 मतं मिळाली आहेत.
सायंकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार तेलंगणामध्ये काँग्रेसने 53 जागांवर विजय मिळवला आहे. बीआरएस 31 जागांवर विजयी झाली आहे. तर, भाजपने 7 जागांवर विजय मिळवला आहे. एमआयएम दोन तर सीपीआय एका जागेवर जिंकले आहेत.
भाजपचे वेंकटरमण रेड्डी यांनी कामारेड्डी मतदारसंघातून ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. याठिकाणी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रबळ दावेदार रेवंथ रेड्डी यांनाही हरवलं आहे.
एकीकडे तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार येण्याची चिन्हं दिसत असताना, कामारेड्डी मतदारसंघात मात्र भाजपने कमाल दाखवली आहे. याठिकाणी भाजपच्या वेंकट रमण रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार रेवंथ रेड्डी या दोघांनाही मागे टाकलं आहे. वेंकट रमण रेड्डी हे याठिकाणी 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
तेलंगणामधील 56 जागांचा निकाल स्पष्ट झाला आहे. यामधील 34 जागांवर काँग्रेस तर 16 जागांवर बीआरएसने विजय मिळवला आहे. MIM ने दोन, तर भाजपने चार जागा जिंकल्या आहेत. सीपीआय एका जागेवर पुढे आहे.
तेलंगणामधील 38 जागांचा निकाल आतापर्यंत समोर आला आहे. यामध्ये बीआरएसने केवळ 11 जागांवर विजय मिळवला आहे.
बीआरएसने आतापर्यंत जिंकलेल्या जागा -
आसिफाबाद
बोआथ
बन्सवाडा
बालकोंडा
नरसापूर
डुब्बक
मेडचाल
कुथबुल्लापूर
माहेश्वरम
सिकंदराबाद
सिकंदराबाद कॅन्ट
Telangana Constituency Result : तेलंगणातील 31 जागांवरील निकाल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेसला 18 जागांवर विजय मिळाला आहे. बीआरएस 10 जागांवर विजयी झाली आहे. एमआयएमने देखील खातं उघडलं असून, चारमिनार आणि बहादूरपुरा या दोन मतदारसंघांमध्ये विजय मिळवला आहे. भाजप एक जागा जिंकली असून, सात जागांवर पुढे आहे.
Telangana Results LIVE : आतापर्यंत एकूण 26 जागांचे निकाल हाती लागले आहेत. यातील 16 जागांवर काँग्रेस विजयी झालं आहे. तर, बीआरएस नऊ आणि भाजप एका जागेवर विजयी झालं आहे.
काँग्रेसने आतापर्यंत जिंकलेल्या जागा -
चेन्नूर
बेल्लमपल्ली
बोधन
जुक्कल
येल्लारेड्डी
निझामाबाद (ग्रामीण)
रामागुंडम
पेड्डापल्ले
मेडक
अंदोले
नारायणपेट
वानापार्थी
नागार्जुना सागर
मिऱ्यालागुडा
हुझुरानगर
थुंगाथुर्थी
Armur Constituency Result : तेलंगणामध्ये भाजपने अखेर खातं उघडलं आहे. अरमूर मतदारसंघात भाजपच्या राकेश रेड्डी यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 72 हजारांहून अधिक मतं मिळाली. सुमारे 30 हजार मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला आहे.
तेलंगणामध्ये आतापर्यंत काँग्रसने दहा जागांवर विजय मिळवला आहे. तर, बीआरएस आतापर्यंत सहा जागांवर विजयी झालं आहे. भाजपची आठ जागांवर आघाडी कायम आहे.
Balkonda Constituency Result : बालकोंडा मतदारसंघामध्ये बीआरएसचे प्रशांत रेड्डी वेमुला यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 70,417 मते मिळाली. त्यांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या सुनिल कुमार यांना 65,884 मतांवर समाधान मानावे लागले.
तेलंगणामधील हुजूरनगर मतदारसंघातून काँग्रेसचे उत्तम कुमार रेड्डी निवडून आले आहेत. तर, चेन्नूर मतदारसंघातून गड्डाम विवेकानंद यांनी विजय मिळवला आहे. दुसरीकडे नरसापूर मतदारसंघातून बीआरएसच्या सुनिता लक्ष्मा रेड्डी यांनी विजय मिळवला आहे.
तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार रेवंथ रेड्डी यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
जुक्कल आणि मेडक या मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे.
तेलंगणामधील पहिला निकाल हाती लागला आहे. कुथबुल्लापूरमध्ये बीआरएसच्या के.पी. विवेकानंद यांनी विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली आहे.
रेवंत रेड्डी हेच तेलंगणाचे मुख्यमंत्री होतील, असं विकिपीडियाने जाहीर केलं आहे. रेड्डी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसने तेलंगणामध्ये मोठा विजय प्राप्त केलाय. कामारेड्डी मतदारसंघातून मुख्यमंत्री केसीआर यांना मात देत रेड्डी आघाडीवर आहेत.
तेलंगणामध्ये काँग्रेसला जे यश मिळालं, ते एका एबीव्हीपीच्या नेत्यामुळे. काँग्रेसने रेवंत रेड्डी यांना पक्षात घेतलं आणि त्यांच्यामुळे काँग्रेस यश मिळालं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
Telangana Election Results : तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय हा सुरुवातीच्या कलांमध्येच निश्चित झाला आहे. काँग्रेस याठिकाणी तब्बल 66 ठिकाणी आघाडीवर आहे. या सगळ्यातच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे तेलंगणाच्या काँग्रेस पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत.
Telangana Result LIVE Update : दुपारी एक वाजेपर्यंत आलेल्या कलांनुसार तेलंगणामध्ये काँग्रेस सध्या 66 जागांवर पुढे आहे. दुसऱ्या क्रमांकावर बीआरएस आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. बीआरएसच्या जागा हळू-हळू कमी होताना दिसत आहेत. सध्या BRS केवळ 39 जागांवर पुढे आहे.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : निवडणूक मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत, आतापर्यंतच्या कलांवर आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी ते म्हणाले; की केसीआर हे महाराष्ट्रात फिरले, सगळीकडे जाहिराती झाल्या, मात्र बीआरएसचं स्वतःच्या राज्याकडेच दुर्लक्ष झालं. अर्थात, या चार राज्यांमधील निकालाचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : गोशामहल मतदारसंघात भाजपचे टी. राजा सिंह यांनी पुन्हा एकदा आघाडी मिळवली आहे. ते तब्बल 5 हजार मतांनी पुढे आहेत.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : तेलंगणामधील CM कॅम्प ऑफिसच्या परिसरात अगदी शांतता दिसून येत आहे. मुख्यमंत्री केसीआर हे कामारेड्डी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तसंच, बीआरएस देखील मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बीआरएसला पराभव पत्करावा लागण्याची चिन्हं दिसत आहेत.
Telangana Result LIVE : गोशामहल मतदारसंघात भाजपचे टी. राजा सिंह पिछाडीवर. पहिल्या पाचही राउंडमध्ये आघाडीवर असणारे सिंह हे सहाव्या राउंडमध्ये पिछाडीवर गेले आहेत. याठिकाणी बीआरएसचे नंदकिशोर व्यास हे आघाडीवर आहेत.
Telangana Constituency wise results LIVE : सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत समोर आलेल्या कलांनुसार कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहे ते पाहूयात. इलेक्शन कमिशनने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अचामपेट मतदारसंघात काँग्रेसचे चिक्कुडू कृष्णा हे आघाडीवर आहेत. तर भारत राष्ट्र समितीचे बालाराजू हे पिछाडीवर आहेत.
आदिलाबाद मतदारसंघात भाजपचे पयाल शंकर हे आघाडीवर आहेत, तर भारत राष्ट्र समितीचे जोगू रामन्ना एक हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
चंद्रयाणगुट्टा मतदारसंघात एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी आघाडीवर आहेत. तर भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर आहेत.
सिर्सिला मतदारसंघातून केसीआर यांचे पुत्र केटीआर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे के.के. महेंद्र रेड्डी हे पिछाडीवर आहेत.
सिद्दिपेट मतदारसंघात बीआरएसचे थन्नेरू हरीश राव हे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे पूजाला हरी कृष्णा पिछाडीवर आहेत.
गजवेल मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री केसीआर आघाडीवर आहेत. याठिकाणी भाजपचे इटाला राजेंद्र हे पिछाडीवर आहेत.
कामारेड्डी मतदारसंघात काँग्रेसचे रेवंथ रेड्डी हे आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे रेड्डी आहेत. तर मुख्यमंत्री केसीआर हे तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : तेलंगणामध्ये भाजप सध्या 10 जागांवर आघाडीवर आहे. तर एमआयएम केवळ 4 जागांवर पुढे आहे. काँग्रेसने आपली 66 जागांवरील आघाडी कायम ठेवली असून, बीआरएस सध्या 39 जागांवर पुढे आहे.
उमेदवारांचा घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने हैदराबादमधील हॉटेलबाहेर बसेस तैनात ठेवल्या आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता या बसेसची गरज भासणार नाही. आम्ही सुमारे 80 जागांवर आरामात विजय मिळवू अशी खात्री काँग्रेसने व्यक्त केली आहे.
कामारेड्डी मतदारसंघात केसीआर यांना मोठा धक्का बसला आहे. केसीआर हे तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. याठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रेवंत रेड्डी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
Telangana Result LIVE Update : तेलंगणामध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला आहे. सध्या काँग्रेस 65 ठिकाणी आघाडीवर आहे. बीआरएस सध्या 45 जागांवर पुढे असून, भाजपने आघाडी घेतलेल्या जागा कमी झाल्या आहेत. एमआयएम सध्या 5 जागांवर पुढे आहे.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : तेलंगणामध्ये काँग्रेस सध्या 60 जागांवर पुढे आहे. "आम्ही लोकांची नस पकडली, आणि त्यामुळेच यंदा मोठा बदल घडून येणार असा विश्वास आम्हाला होता. मी गेल्या वर्षभरापासून म्हणत आहे की विजय आमचाच असेल, आणि तेच होतं आहे" असं मत काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी व्यक्त केलं आहे.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : तेलंगणामध्ये बीआरएस पुन्हा एकदा शर्यतीत आलं आहे. काँग्रेस सध्या 59 जागांवर पुढे आहे, तर बीआरएस त्यापेक्षा केवळ 10 जागांंनी मागे आहे. काँग्रेस बहुमताच्या आकड्यापासून दूर जात असतानाच भाजप आणि एमआयएमच्या जागाही वाढल्या आहेत. त्यामुळे तेलंगणामध्ये हे छोटे पक्ष किंगमेकर ठरू शकतात.
Telangana Result LIVE Update : "तेलंगणातील लोकांना बदल हवा होता. बीआरएसच्या भ्रष्ट सरकारला इथली जनता कंटाळली होती. सध्या काँग्रेस बऱ्याच ठिकाणी आघाडीवर आहे, मात्र तेलंंगणामध्ये भाजप देखील महत्त्वाचा पक्ष ठरणार आहे" असं मत भाजप खासदार के लक्ष्मण यांनी व्यक्त केलं.
तेलंगणामधील मतमोजणीच्या पहिल्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. बीआरएस 46 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप आणि एमआयएम हे प्रत्येकी 5 जागांवर पुढे आहेत.
Telangana Congress Seats : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हे आपल्या मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्यांच्या घराबाहेर आतापासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. या निवडणुकीत आपण विजय मिळवू अशी पूर्ण खात्री काँग्रेसला आहे. पहिल्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे.
Telangana Assembly Election Results LIVE : तेलंगणामध्ये एमआयएम सध्या 7 जागांवर पुढे आहे. अकबरुद्दीन ओवैसी हे आपल्या मतदारसंघातून आघाडीवर आहे.
Telangana Congress Update : हैदराबादमधील ताज कृष्णा हॉटेलबाहेर सध्या लक्झरी बसेस आणल्या आहेत. विजयी उमेदवारांना हलवण्यासाठी या बसेसचा वापर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याच ठिकाणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार देखील दाखल झाले आहेत.
CM KCR Lags Behind : तेलंगणामध्ये धक्कादायक परिस्थिती पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री केसीआर हे दोन्ही मतदारसंघांमध्ये पिछाडीवर आहेत. ते गजवेल आणि कामारेड्डी मतदारसंंघांमध्ये उभे आहेत. सध्या काँग्रेस 65 जागांवर पुढे आहे, तर भाजप 5 जागांवर पुढे आहे. बीआरएस केवळ 40 जागांवर पुढे आहे.
Telangana Congress Seats LIVE : तेलंगणामध्ये काँग्रेसने पहिल्या कलामध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे. विजयाच्या विश्वासामुळे आता घोडेबाजार रोखण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे. यासाठीच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. ते कर्नाटकातील काही आमदारांच्या मदतीने निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : मुख्यमंत्री केसीआर हे गजवेल मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर कामारेड्डीमधून पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे रेवंत रेड्डी हे कामारेड्डी आणि कोदंगल या दोन्ही ठिकाणी आघाडीवर आहेत.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : काँग्रेसने तेलंगणामध्ये 60 जागांवर आघाडी मिळवली आहे. बीआरएस हे केवळ 33 जागांवर पुढे आहे. तर भाजप अजूनही कअवघ्या तीन जागांवर पुढे आहे. एमआयएमने 6 जागांवर मुसंडी मारली आहे.
Telangana Result LIVE Updates : काँग्रेस सध्या 55 जागांवर पुढे आहे, तर बीआरएस केवळ 35 जागांवर पुढे आहे. भाजपने आता 3 जागांवर आघाडी मिळवली आहे. एमआयएम आणि इतर हे अनुक्रमे 2 आणि 3 जागांवर पुढे आहेत.
Telangana Result LIVE Updates : कामारेड्डी मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री केसीआर आघाडीवर आहेत, तर सिरसिल्ला मतदारसंघात त्यांचे पुत्र केटीआर हेदेखील आघाडीवर आहेत.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : तेलंगणामध्ये अखेर भाजप शर्यतीत आलं आहे. राज्यात बीआरएस सध्या 26 जागांवर पुढे आहे. काँग्रेस 30 जागांवर पुढे आहे. तर एमआयएम आणि भाजप हे प्रत्येकी दोन जागांवर आघाडीवर आहेत.
Telangana Election LIVE Updates : तेलंगणामध्ये आता बीआरएसने 25 जागांवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेस सध्या 27 जागांवर पुढे आहे, तर एमआयएम 2 जागांवर पुढे आहे.
Telangana Results Live Updates : तेलंगणामध्ये काँग्रेसने आता 25 जागांवर आघाडी मिळवली आहे. याठिकाणी बीआरएस 20 जागांवर पुढे आहे, तर एमआयएम एका जागेवर पुढे आहे. भाजप अद्याप एकाही जागेवर पुढे नाही.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : तेलंगणामध्ये काँग्रेस आणि बीआरएसमध्ये टक्कर पहायला मिळत आहे. याठिकाणी सध्या बीआरएस 18 तर काँग्रेस 17 जागांवर पुढे आहे. भाजपला अजून एकाही जागेवर आघाडी मिळवता आली नाहीये.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : राज्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये BRS 12 जागांवर पुढे असल्याचं दिसत आहे. तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएमला एका जागेवर आघाडी मिळाली आहे.
Assembly Election 2023 Results LIVE : एक्झिट पोलप्रमाणेच आम्ही सुमारे 70 जागा मिळवू असा विश्वास तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
Assembly Election 2023 Results LIVE : तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : तेलंगणातील वारांगळ येथील मतमोजणी केंद्रांवर पोस्टल बॅलट आणण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे हैदराबाद येथील मतमोजणी केंद्राबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : भारत राष्ट्र समिती, म्हणजेच बीआरएस नेते दसोजू श्रवण कुमार यांनी याही वेळी आपणच सत्तेत येऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की एक्झिट पोल आणि खरे निकाल यात बऱ्याच वेळा फरक दिसतो. बीआरएसला नक्कीच 70 जागा मिळतील, आणि केसीआर तिसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री होतील असंही ते म्हणाले.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बाहेर आतापासूनच काँग्रेसच्या विजयाचा दावा करणारे पोस्टर लागले आहेत. यामध्ये 9 डिसेंबरला काँग्रेस तेलंगणामध्ये आपलं सरकार स्थापन करेल असा दावा करण्यात येतो आहे.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : काँग्रेस नेते मल्लू रवी यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आपला अंदाज व्यक्त केला आहे. आमचे सर्व उमेदवार निकालासाठी तयार आहेत. काँग्रेसला राज्यात 75-95 जागा मिळतील. बीआरएसला 15-20 तर भाजपला 6-7 जागा मिळतील, असं रवी म्हणाले.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही तासांमध्येच याठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Telangana Assembly Election 2023 Results LIVE : तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. यानंतर आज (3 डिसेंबर) मतमोजणी होणार आहे.
विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये (Telangana Exit Poll) असं दिसून येतंय की यावेळी केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला काँग्रेस (Congress) धोबीपछाड देऊ शकेल.
मात्र, बीआरएस (BRS) पक्षाने गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवली आहे. त्यामुळे आता नेमकं कोण कुणावर मात देतं हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.