kcr telangana esakal
Election News

Telangana Election : ''तेलंगणात काँग्रेस अन् बीआरएसच्या कामाची तुलना करा'', मुख्यमंत्र्यांचं आवाहन

सकाळ वृत्तसेवा

खानापूरः तेलंगणमध्ये पुन्हा भारत राष्ट्र समितीचीच (बीआरएस) सत्ता येईल असा विश्‍वास व्यक्त करत, ‘‘पुन्हा सत्तेत आल्यास लोककल्याणकारी योजनांना अधिक निधी उपलब्ध करून देऊ,’’ असे आश्‍वासन रविवारी तेलंगणचे मुख्यमंत्री व बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिले. खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.

प्रचारसभेत बोलताना केसीआर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘‘काँग्रेसने ५८ वर्षांपूर्वी तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेच्या भावना न समजून घेता हे संस्थान आंध्र प्रदेशात विलीन केले आणि त्यामुळे तेलंगणातील नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या,’’ असा दावा केसीआर यांनी केला आहे.

काँग्रेस आणि बीआरएस यांच्या कार्यकाळाची तुलना करा आणि कोणी अधिक चांगले काम केले हे ठरवा, असे आवाहनही यावेळी त्यांनी तेलंगणातील जनतेला केले.

राव म्हणाले....

  • तेलंगणासह असलेल्या आंध्र प्रदेशात काँग्रेसच्या काळात निवृत्तिवेतन केवळ २०० रुपये होते, बीआरएस सरकारच्या कार्यकाळात ते दोन हजार रुपये करण्यात आले.

  • तेलंगणात पुन्हा सत्ता आल्यास निवृत्तिवेतन दरमहा पाच हजार रुपये करणार.

  • पुन्हा सत्ता आल्यास रयतू बंधू योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ करणार.

  • काँग्रेसने सत्तेत आल्यास रयतू बंधू योजना बंद करणार असल्याचे सांगितले आहे, असे झाल्यास राज्यात पुन्हा दलालांचा सुळसुळाट होईल

  • बीआरएस सरकारने तीन हजार तांड्यांचे रूपांतर ग्रामपंचायतीमध्ये करून त्यांना पाठबळ दिले.

  • पुन्हा सत्ता मिळाल्यास सर्व शिधापत्रिकाधारकांना चांगल्या प्रतीचा तांदूळ उपलब्ध करून देणार.

पंतप्रधान मोदींची सभा, म्हणाले...

नुकत्याच मतदान झालेल्या छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात इंडिया आघाडीचा पराभव होणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. तेलंगणमधील तूप्रन येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मी या तीनही राज्यांत फिरलो आहे, येथील जनतेने विशेषतः महिला, शेतकरी बांधव यांनी तर काँग्रेसला राज्यातून पूर्णपणे हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.

यावेळी त्यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यावरही टीका केली. ‘‘तेलंगणातील जनतेला असा मुख्यमंत्री हवा आहे का जो जनतेला भेटतच नाही,’’ असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस असो अथवा बीआरएस भ्रष्टाचारी पक्ष, घराणेशाही आणि यांची सत्ता असलेल्या राज्यांत ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था हीच या पक्षांची ओळख आहे, अशा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. काँग्रेस आणि बीआरएस हे एकमेकांची कार्बन कॉपी आहेत असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economist Bibek Debroy Passed Away: अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन; ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष होते

आताच्या दिवाळीत जुनी मजा नाहीच... कुणाला गावी जायची घाई तर कुणाला फटाके उडवायची, कलाकारांनी सांगितल्या आठवणी

Tesla Job: पुण्याच्या इंजिनियरने इलॉन मस्कला पाठवले 300 अर्ज आणि 500 ​​ईमेल; शेअर केला ड्रीम जॉब मिळवण्याचा संघर्ष

Diwali Festival 2024 : नरक चतुर्दशीनिमित्त घरोघर अभ्यंगस्नान; आज लक्ष्मीपूजन

Mumbadevi Assembly Constituency: ''इम्पोर्टेड माल नको, आमचा ओरिजनल माल आहे'' अरविंद सावंतांची जीभ घसरली; शायना एनसींचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT