Virender Sehwag esakal
Election News

किस्से निवडणुकीचे! विरेंद्र सेहवागची फलंदाजी अन् काँग्रेस उमेदवार आऊट

Sandip Kapde

निवडणुकीचा हंगाम म्हटलं की रंजक किस्से आलेच. नुकत्याच झालेल्या हरियाना विधानसभा निवडणुकीत असाच एक मजेदार किस्सा घडला, ज्यामध्ये क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने राजकारणाच्या मैदानात उतरून फलंदाजी केली, पण काँग्रेसचा उमेदवार रन-आऊट झाला!

सेहवाग म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर क्रिकेटचे मैदान येते, त्याची धडाकेबाज फलंदाजी आठवते. पण यावेळी सेहवागने हरियानात राजकीय मैदानावर आपली कला दाखवली. हा किस्सा आहे तोशाम मतदारसंघातील, जिथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये तीव्र संघर्ष सुरू होता.

तोशाम मतदारसंघात भाजपाकडून श्रुती चौधरी आणि काँग्रेसकडून अनिरुद्ध चौधरी आमने-सामने होते. विशेष म्हणजे, हे दोघेही एकाच कुटुंबातील, म्हणजेच माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांची तिसरी पिढी. भाजपाच्या श्रुती चौधरी या बंसीलाल यांच्या नात असून काँग्रेसच्या अनिरुद्ध चौधरी हे त्यांचे नातू आहेत. यामुळे हा सामना अधिकच रंजक झाला.

विरेंद्र सेहवागने या निवडणुकीत काँग्रेसच्या अनिरुद्ध चौधरीसाठी प्रचार केला. त्याने अनिरुद्धला आपला भाऊ म्हणून संबोधून मतदारांना त्याच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र, या प्रचारानंतरही मतदारांनी अनिरुद्ध चौधरीला ‘रन आऊट’ केले! अनिरुद्धचा 14,257 मतांनी पराभव झाला, तर श्रुती चौधरी 76,414 मतांनी विजयी ठरली.

निवडणुकीत या प्रकारे सेहवागच्या राजकीय फलंदाजीने मोठा परिणाम साधला नाही, आणि शेवटी काँग्रेसचा उमेदवार आऊट झाला!

#Electionwithsakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Ranking: हार्दिक पांड्याला 'बढती'; अर्शदीप सिंगची टॉप १० मध्ये एन्ट्री अन् वॉशिंग्टनलाही फायदा

National Award 2024 : वाळवी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला सिनेमाच्या टीमची अनुपस्थिती ; निर्माती म्हणाली...

Latest Maharashtra News Live Updates : घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग

PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानी बॉलरचा ‘पोपट’ झाला! चेंडू स्टम्पला लागला, Harry Brook तरीही नाबाद राहिला, Video

यिनच्या वतीने पुण्यातील विविध महाविद्यालयात वाहतूक व रस्ते सुरक्षा जनजागृती उपक्रमाचे आयोजन.

SCROLL FOR NEXT