Mizoram Result ZPM eSakal
Election News

Mizoram Result : अवघ्या पाच वर्षांपूर्वी तयार झालेल्या पक्षाने रचला इतिहास; मिझोरममध्ये ZPM ने मिळवली सत्ता

ZPM Mizoram Seats : 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये झेडपीएम पक्षाला निवडणूक आयोगाडून परवानगी मिळाली नव्हती.

Sudesh

Mizoram Assembly Elections 2023 : मिझोरम विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. विविध एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजाप्रमाणेच झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) पक्षाने राज्यात सत्ता मिळवली आहे. लालदुहोमा यांच्या नेतृत्त्वाखाली झेडपीएम पक्षाने 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. सत्ताधारी MNF पक्षाला केवळ 10 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. सर्व 40 जागा लढवलेल्या काँग्रेसला तर अवघ्या एका ठिकाणी यश मिळालं आहे. भाजपला दोन ठिकाणी विजय प्राप्त झाला आहे.

2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये झेडपीएम पक्षाला निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे पक्षाचे प्रमुख असणारे लालदुहोमा देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. अशा नवख्या पक्षाने थेट सत्तेला गवसणी कशी घातली, हे आपण पाहणार आहोत.

नवा पक्ष, जुने चेहरे

झेडपीएम (ZPM) हा पक्ष नवीन असला, तरी त्यातील उमेदवार हे जनतेसाठी नवीन नाहीत. पक्षाचे प्रमुख असलेले लालदुहोमा हे तर इंदिरा गांधींच्या काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. ते केवळ मिझोरमच नाही, तर काँग्रेसला आणि जोरमथंगा यांना आणि जवळपास सर्वच पक्षांना ओळखून आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये जोरमथंगा सरकारविरोधात अगदी ग्राउंड लेव्हलला जाऊन प्रचार केला आहे.

लालदुहोमा यांनी झोरम नॅशनलिस्टिक पार्टी नावाने स्वतःचा पक्ष सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी आणखी पाच लहान पक्षांना एकत्र घेत, झेडपीएम नावाने युती केली. याच युतीचं पुढे राजकीय पक्षात रुपांतर झालं.

'दिल्ली कंट्रोल्ड' सरकार

ईशान्य भारतातील निवडणुकांबाबत बोलताना राजकीय तज्ज्ञ सांगतात, की तेथील राज्यांमधील जनता ही स्थानिक पक्षांना अधिक प्राधान्य देते. इथल्या लोकांना केंद्रातील पक्षासोबत असणारा स्थानिक पक्ष आवडतो, मात्र केंद्राचं नियंत्रण असणारी सरकार त्यांना राज्यात नकोय. हीच गोष्ट लालदुहोमा यांनी अचूक पकडली.

निवडणुकीपूर्वी आपल्या प्रचारामध्ये जोरमथंगा सरकारवर टीका करताना त्यांनी या मुद्द्याला लक्ष्य केलं. जोरमथंगा सरकार ही 'दिल्ली कंट्रोल्ड' सरकार असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं. यासोबतच आपण भाजपला घाबरत नसल्याचंही त्यांनी ठासून सांगितलं होतं.

मतदानाच्या चार दिवस पूर्वीच लालदुहोमा यांनी आपण काँग्रेस किंवा भाजपसोबत युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आम्ही स्वतंत्र स्थानिक पक्ष आहे, आणि पुढेही स्वतंत्रच राहणार आहोत असं म्हणत त्यांनी मिझोरमच्या जनतेला साद दिली होती. केंद्रातील सरकारसोबत आम्ही सौदार्हाचे संबंध ठेऊ. एखाद्या गोष्टीचं समर्थन करायचं की विरोध हे मुद्द्यांनुसार ठरवण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

राजकीय रणनीती

लालदुहोमा हे गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. आपल्या संपूर्ण अनुभवाचा वापर त्यांनी या निवडणुकीत केला. एकीकडे पक्षाचे उमेदवार ग्राउंड लेव्हलला काम करत असतानाच, दुसरीकडे लालदुहोमा मतांचं विकेंद्रीकरण होणार नाही याची खबरदारी घेत होते. यासाठी त्यांनीच हमार पीपल्स कन्व्हेंशन (HPC) या स्थानिक पक्षासोबत देखील युती केली.

लोकप्रिय चेहरे पक्षाशी कसे जोडले जातील यावर लालदुहोमा यांनी भर दिला. भारतीय फुटबॉल टीमचे माजी खेळाडू जेजे लालपेखलुआ, मिझोरम काँग्रेसचे माजी नेते, सूबे सरकारमध्ये मंत्री राहिलेले के.एस. थंगा यांच्यासोबत कित्येक मोठ्या चेहऱ्यांना लालदुहोमा यांनी आपल्यासोबत घेतलं. या सर्व गोष्टींमुळे झेडपीएमने एकहाती सत्ता मिळवल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT