Tunnel 
Explainers | विश्लेषण

Explainer: उत्तरकाशीच्या बोगद्यात 41 कामगार नेमके कुठे अडकलेत? त्यांना बाहेर काढायला वेळ का लागतोय?

Amit Ujagare (अमित उजागरे)

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातला सिल्क्यारा इथल्या बोगद्याचं काम सुरु असताना वरचा काही भाग खचला आणि बोगद्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्यानं त्यात ४१ कामगार अडकून पडले आहेत. आज या घटनेला १४ दिवस झाले आहेत. ते सर्वजण सुखरुप आहेत. पण अद्याप एकाही कामगाराला बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय टनेल एक्स्पर्ट तसेच मशिनरी आणण्यात आल्या आहेत. तरी देखील या कामगारांना बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. (explainer how uttarkashi silkyara tunnel collapsed where exactly 41 workers trapped why taking time to get them out)

पण बोगद्यात नेमकं घडलंय काय? बोगद्याच्या मुखापासून आतमध्ये किती अंतरावरावर ही दुर्घटना घडली आहे. बोगदा नेमका किती लांबीचा आहे. सध्या बचाव पथकाकडून कुठल्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत, अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर त्याची उत्तरं तुम्हाला या लेखातून मिळतील.

प्रकरण काय आहे?

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातला सिल्क्यारा डंडालगाव इथं बोगद्याचं काम सुरु आहे. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळीच्या दिवशी रविवार होता. यादिवशी नेहमीप्रमाणं शिफ्टमध्ये कामगार बोगद्यात काम करत होते. नाईट शिफ्ट संपल्यानं बरेच कामगार हे बोगद्यातून बाहेर येत होते. यावेळी बरेच कामगार बोगद्यातून बाहेर पडले, ते बाहेर सुखरुप आले.

पण ४१ कामगार अद्याप आतमध्येच होते. त्याचवेळी बोगद्याच्या वरच्या बाजुचा काही भाग खचला. यामुळं बोगद्याचा दोन्ही टोकांमधून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. जो माती-दगडाचा भाग कोसळला तो राडारोडा तब्बल ६० मीटर जाडीचा असल्यानं तिथून बाहेर पडणं किंवा तो हटवणं अशक्य बनलं. तसेच दुसऱ्या बाजुला दोन किमी अंतरावर बोगद्याचं खोदकाम अद्याप झालेलं नाही. त्यामुळं दोन्ही बाजुनं बोगद्याबाहेर पडणं या कामगारांना शक्य नाही.

कामगारांना वाचवण्यासाठी काय प्रयत्न?

सूर्यप्रकाश नाही, ऑक्सिजनचा अभाव आणि अन्नपाण्याशिवाय हे कामगार बोगद्यात अडकून पडल्यानं त्यांचा जीव वाचवणं ही त्याक्षणी प्रशासनासाठी प्राधान्याचं काम होतं. त्यानुसार, प्रशासनानं बोगद्याचं उर्वरित काम तातडीनं थांबवलं आणि या कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले. त्यासाठी सर्वात आधी त्यांनी बोगद्याला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तसेच या पाईपलाईनच्या माध्यमातून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना रात्री कॉम्प्रेसरच्या मदतीनं दबाव तयार करून अन्न-पाणी पोहचवण्यात येत आहे. तसेच दुसरीकडं कोसळलेला मातीचा ढिगारा हटवण्यासाठी अवजड खोदाई यंत्रे वापरली जात आहेत.

दुर्घटनेनंतर पहिल्या २४ तासांत मोठ्या प्रमाणावर ढिगारा काढण्यात आला पण तरीही ३० ते ३५ मीटर ढिगारा काढणं शिल्लक होतं. पण हे काम करताना अवजड मशीनही बिघडल्यानं परदेशी बनावटची मोठी मशिन्स मागवण्यात आली. पण तरीही अनेक अडचणी येत होत्या. त्यासाठी आंतरराष्ट्रीय टनेल एक्स्पर्ट प्रा. आर्नोल्ड डिक्स यांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर या बचाव मोहिमेसाठी इतर काही पर्याय आहेत का? याचा शोध घेतला. यासाठी 'मिशन फ्रॉम टॉप', 'मिशन फ्रॉम फ्रन्ट' आणि 'मिशन फ्रॉम साईड' असे पर्यायही शोधण्यात आले आहेत. सध्या बोगद्याच्या वरच्या भागातून ड्रील करुन ही बचाव मोहिम राबवण्यात येत असल्याचं डिक्स यांनी सांगितलं.

बोगद्याचं स्वरुप कसं?

सिल्क्यारा बोगदा हे 'चारधाम ऑल वेदर रोड' प्रकल्पाचा भाग आहे. यामुळं उत्तरकाशी ते यमुनोत्री धाम यांच्यातील अंतर २६ किलोमीटरनं कमी होणार आहे. या बोगद्याची एकूण लांबी 4.5 किमी आहे. चार किलोमीटरच्या बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र प्रोजेक्टला उशीर झाला आहे. आता या बोगद्याला मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे.

सध्याच्या घडीला या बोगद्याच्या दोन्ही बाजूनं खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. बोगद्याच्या ज्या तोंडाकडून सध्या बचाव कार्य सुरु आहे. तो भाग सिल्क्यारा गावाचा भाग आहे. त्याच्या विरुद्ध दिशेच्या तोंडाला जिथं बारकोट गाव आहे तिथून १.७१ किमी लांबीचा बोगदा खोदण्यात आला आहे. त्यानंतर पुढे ४३३ मीटर भाग हा खोदायचा बाकी आहे. पुढे १.७१ किमी + 433 मीटर म्हणजे २.१४३ किमी अंतराच्या पुढे २.२१० किमी अंतरावर बोगदा विरुद्ध दिशेनं अर्थात सिल्क्याराच्या बाजूपर्यंत पूर्णपणे खोदण्यात आला आहे. एकूणच सिल्क्याराच्या बाजूनं हा बोगदा २.१० किमी पर्यंत खोदण्यात आला आहे. त्याच्या पुढे केवळ ४३३ मीटरचं खोदायचं काम बाकी असून याच्या पुढे बारकोटच्या दिशेनं १.७१ किमी बोगदा खोदण्यात आला आहे.

अर्थात सिल्क्याराच्या बाजूनं पूर्णपणे २.२१० किमी बोगदा मोकळा आहे. पण नेमकं अडकलेले ४१ कामगार सिल्क्याराच्या बाजूनं साधाराण २७० मीटर अंतरावर काम करत असताना त्यांच्यापासून अगदी जवळच बोगद्याचा वरचा भाग कोसळला त्यामुळं मोठ्या प्रमाणावर दगडमातीचा राडारोडा बोगद्यात साचला. हा राडारोडा जमीनी लगत सुमारे ६० मीटर जाडीचा तर बोगद्याच्या छतापर्तंयत उंचीचा आहे. हा भाग कोसळल्यानं या कामगारांचा सिल्क्याराच्या बाजूनं बाहेर पडण्याचा मार्गच बंद झाला.

तब्बल ६० जाडीचा हा भाग कोसळल्यानं तो हटवणं खूपच जिकरीचं काम आहे. अनेक अवजड मशिन्सनं काम सुरु असलं तरी तो हटवणं अवघड होऊन बसलं आहे. याचवेळी विरुद्ध दिशेनं बाहेर पडायचं म्हटलं तरी बारकोटच्या दिशेनं २ किमीवर पुढे ४.३३ मीटर अंतराचा बोगदा खोदण्यात आलेला नाही. पण त्याच्या पुढे १.७१ किमी अंतराचा बोगदा खोदण्यात आला आहे. या परिस्थितीमुळं बोगद्याच्या २ किमी मधोमध हे कामगार असल्यानं अन् दोन्ही बाजूंनी त्यांच्यासाठी बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाल्यानं ते अडकून पडले आहेत.

ख्रिसमसपर्यंत कामगारांना बाहेर काढलं जाईल - तज्ज्ञ

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना आंतरराष्ट्रीय टनेल एक्सपर्ट आर्नोटल्ड डिक्स म्हणाले की, ऑगर मशीन यापुढे काम करण्यात सक्षम नसल्यानं साइटवरील ड्रिलिंग आणि ऑजरिंग ऑपरेशन्स बंद करण्यात आली आहेत. आम्ही इतर अनेक पर्याय शोधत आहोत, या प्रत्येक प्रयत्नावेळी आम्ही अडकलेले सर्वजण सुखरुप घरी कसे येतील याचा विचार करत आहोत.

सध्या ते सर्वजण सुरक्षित आहेत. इथल्या पर्वताच्या कठीण दगड पुन्हा एकदा औगरला दाद देत नाहीएत. म्हणून आम्ही आमच्या कामाचा पुनर्विचार करत आहोत. मला खात्री आहे की हे अडकलेले 41 कामगार ख्रिसमसपर्यंत घरी येतील. अमेरिकन बनावटीची ऑगर मशीन पूर्णपणे बिघडली असून ती आता दुरुस्त करण्यायोग्य नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Health: उपोषणस्थळी भोवळ अन् रक्तदाबाचा त्रास, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

देवेंद्र फडणविसांची मोठी खेळी! शरद पवार गटाचा वरिष्ठ पदाधिकारी भाजपच्या ताफ्यात, रोहितदादांना धक्का

Daughters Day निमित्त अश्विन लेकींना देणार स्पेशल बॉल, पण मुलींनीच दिला नकार; पाहा Video

Pune Rain Update : पुण्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरूवात

विराट कोहली - ऋषभ पंतचा मैदानात दिसला याराना, गॉगल केले अदला-बदली; Video Viral

SCROLL FOR NEXT