Avoid steroids for skin infections  
फॅमिली डॉक्टर

त्वचासंसर्गासाठी स्टेरॉइड्स टाळा! 

डॉ. प्रदीप महाजन

एक्झेमा, डर्मेटायटिस, सोरायसिस आणि अशा अनेक त्वचाविकारांवरील उपचारात स्टेरॉइड्सचा वापर करावा लागतो. मात्र त्याचे दुष्परिणामही त्या रुग्णाला सहन करावे लागतात. आता या उपचारात स्टेरॉइड्स टाळता येऊ लागली आहेत. या विकारांवरील उपचारांमध्ये नावीन्यपूर्ण अशी पेशींवर आधारित पद्धती विकसित झाली आहे. 
 

त्वचाविकार असलेल्या व्यक्तींवरील उपचार दीर्घकाळ (काही वेळा तर काही वर्षे) सुरू असतात. एवढे करूनही त्यांचा आजार बरा होईलच असे नाही. तुम्ही अशा व्यक्तींना याबद्दल विचारणा केली, तर परिणामकारक उपचारांसाठी त्यांनी कुठे कुठे आणि किती खेपा घातल्या, याच्या कथा ते तुम्हाला सांगतील. काही त्वचाविकारांसाठी स्टेरॉइड औषधांचा वापर हे काळजीचे कारण आहे. कारण आपल्याला माहीत आहे की, स्टेरॉइड्सचे शरीराच्या यंत्रणेवर दीर्घकालीन परिणाम होतात. 
अशा परिस्थितीत, सर्व वयोगटांतील व्यक्तींना होणाऱ्या असंख्य त्वचाविकारांवर उपचार कसे करावे, यासाठी सर्वप्रथम आपल्याला विविध प्रकारच्या त्वचाविकारांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांसमोर वारंवार येणाऱ्या त्वचाविकारांची माहिती अशी- 
जीवाणू, विषाणू, परजीवी, अॅलर्जिक प्रतिक्रिया आणि ऑटोइम्युन आजार यामुळे त्वचाविकार संभवतात. पौगंडावस्थेतील मुलांमध्ये पुरळ (अॅक्ने) हा सर्वसामान्यपणे आढळणारा त्वचाविकार आहे. या वयोगटात संप्रेरकांमध्ये (हॉर्मोन्समध्ये) होणारे बदल आणि जीवनशैली व जीवाणूंच्या वाढीस पोषक ठरणारा आहार हे घटक पुरळ येण्यासाठी कारणीभूत ठरतात. पुरळ विविध प्रकारचे असू शकतात– पू असलेल्या पुळ्या, पुटकुळ्या, पुटी इत्यादी. तेलकट त्वचा आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत हेळसांड केली तर परिस्थिती गंभीर होते. हा त्वचाविकार असलेल्या व्यक्ती काही महिन्यांपासून ते काही वर्षांपर्यंत यावरील उपचार घेत राहतात. यात जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे मलम (अँटिबॅक्टेरिअल क्रीम/लोशन); तसेच औषधांचा समावेश असतो. सक्रिय पुरळ बसल्यानंतर त्यामुळे राहणारे व्रण व त्वचेतील असमतोलपणा पुढील अनेक वर्षे राहतो. काहीवेळा त्यासाठी सौंदर्यात्मक (कॉस्मेटिक) उपचारही करावे लागतात. 
सामान्यपणे आढळणारा अजून एक त्वचाविकार म्हणजे डरमॅटायटिस. यात त्वचा चुरचुरते. खाजरी, कोरडी त्वचा किंवा सुजलेल्या लालसर झालेल्या त्वचेवर चट्टे उठणे ही या त्वचाविकाराची लक्षणे आहेत. यात त्वचेवर पाणीदार फोड येतात, त्वचा कठीण होते आणि भेगा पडतात. अटॉपिक डरमॅटायटिस (एक्झेमा) हा एक दीर्घकालीन आजार असून, यात वारंवार त्वचा चुरचुरते. एक्झेमासाठी अँटिबायोटिक, कॉर्टिकोस्टेरॉइड्स देण्यात येतात. त्याचप्रमाणे सोरायसिसमध्ये त्वचा लाल, शुष्क आणि त्वचेवर खवले येतात. कोरड्या, थंड हवामानात या आजाराची लक्षणे अधिक गंभीर स्वरूप धारण करतात. म्हणून या विकार असलेल्या रुग्णांना हिवाळ्यात अधिक त्रास होतो. 
आपल्याला गजकर्ण आणि इतर बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन्स) माहीत आहेतच. हे विकार संसर्गजन्य असतात आणि या विकारांमुळे त्वचेला भेगा पडतात. हा विकार शरीराच्या कोणत्याही अवयवाला होऊ शकते. विशेषत: खाका, पायाच्या बोटांमध्ये (सतत मोजे व बूट असल्यामुळे), मांडीच्या सांध्यावर, जांघांमध्ये आणि टाळूवर याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. खाज सुटणे आणि जळजळणे ही या विकाराची सामान्य लक्षणे आहेत. बुरशीविरोधी मलमे, औषधे आणि स्वच्छता हे या विकारावरील उपचार आहेत. 
त्वचाविकारांवरील पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये केवळ दृश्य लक्षणे व संकेत यावर उपचार करण्यात येतात. अँटिबायोटिक्स आणि अँटिफंगल औषधे संबंधित जंतूंना नष्ट करतात किंवा त्यांना आळा घालतात; पण हे विकार पुन्हा उद्भवू नयेत, यासाठी ही औषधे कायमचे उपचार करत नाहीत. त्याचप्रमाणे ज्या त्वचाविकारांमध्ये ऑटोइम्युन किंवा वाढीव इम्युन रिस्पॉन्स घटक समाविष्ट आहे, अशा परिस्थितीत कॉर्टिकॉस्टेरॉइड्स मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतात. आपल्याला माहीत आहे की, प्रतिकार यंत्रणेला स्टेरॉइड्स दाबून टाकतात; त्वचाविकार थोड्या कालावधीत बरे होत असले तरी ही औषधे थांबवल्यावर ते पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे यांचा दीर्घकालीन वापर केल्यास त्यांचा उलट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नैसर्गिक आणि परिणामकारक उपचारपद्धती ही काळाची गरज आहे. त्यामुळे पेशी आणि वृद्धी घटक (ग्रोथ फॅक्टर) आधारित उपचारांवर लक्ष देण्याची हीच वेळ आहे! 
पेशीवर आधारित उपचारपद्धती ‘रिजनरेटिव्ह मेडिसीन’चे जग ढवळून काढत आहे. आपल्या शरीरात अस्तित्वात असलेल्या यंत्रणेचा वापर करून उपचार करणे, आजाराच्या मुळाला लक्ष्य करणे आणि त्यायोगे शाश्वत परिणाम साध्य करणे हे या उपचारपद्धतीचे उद्दिष्ट आहे. विविध प्रकारच्या त्वचाविकारांवर परिणामकारक उपचार करण्यासाठी वृद्धी घटकांवर किंवा पेशीवर आधारित प्रथिनांचा आजारानुसार किंवा जेथे आजार झाला आहे, त्या ठिकाणी वापर केला जाऊन परिणामकारक निष्कर्ष साधले जातात. या प्रकारच्या उपचारपद्धतीने कोणत्या त्वचाविकारांवर उपचार केले जाऊ शकतात, याची काही उदाहरणे पाहू. 

पुरळ आणि त्वचेला उजळपणा : उपचारपूर्व आणि उपचारपश्चात स्थिती 
लायपोडरमॅटोस्क्लेरॉसिस : बाह्यत्वचेखाली असलेल्या चरबीच्या स्तराचा दाह झाल्यामुळे होणारा त्वचेचा आणि जोडलेल्या ऊतीचा आजार. वाढलेले वजन, हालचाल नसणे यामुळे होणारा बहुधा वृद्ध महिलांमध्ये आढळणारा हा आजार आहे. त्वचेला सूज, वेदना आणि त्वचेवर पोपडे निर्माण होणे ही या आजाराची लक्षणे आहे. जसजसा हा आजार वाढत जातो तसतसे त्वचेला अल्सरही होऊ शकतो. 
लिचेन्प्लेनस : प्रतिकारक यंत्रणेच्या नियमनामध्ये समस्या निर्माण झाली की हा त्वचाविकार उद्भवतो. यात त्वचा जांभळी होते, खाजरी होते, चट्टे उमटतात आणि ही प्रक्रिया काही आठवडे सुरू असते. त्वचेला सूज आणि त्वचा चुरचुरणे हे परिणामही होऊ शकतात. 
याशिवाय अनेक त्वचाविकारांच्या बाबतीत पेशीतील प्रथिने आणि वृद्धी घटकावर आधारित उपचारपद्धतींचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या उपचारपद्धतीत शरीराच्या दुरुस्ती यंत्रणेचा वापर करण्यात येतो, हा मुख्य फायदा आहे. त्यामुळे या उपचारपद्धतीचे दुष्परिणाम (साईडइफेक्ट्स) नाहीत. या पद्धतीत साध्य करण्यात आलेले परिणाम हे रुग्णाच्या आरोग्याच्या एकूण परिस्थितीनुसार दीर्घकालीन असतात. 
त्यामुळे पारंपरिक, दीर्घकाळ चालणाऱ्या उपचारांच्या पुढे जाण्याबद्दल विचार केला पाहिजे आणि त्वचाविकारांवर उपचार करून शाश्वत परिणाम साधण्याबद्दल चर्चा करणे आवश्यक आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT