Acidity Sakal
फॅमिली डॉक्टर

ॲसिडिटी, गॅसेस...

ॲसिडिटी, गॅसेस हे शब्द आजकाल बोलीभाषेत सरमिसळून गेलेले आढळतात. याचे कारण हा त्रास असणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे.

श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

ॲसिडिटी, गॅसेससाठी उत्तम उपाय म्हणजे लंघन, लंघनाचा अर्थ काही न खाणे असा आयुर्वेदाला अभिप्रेत नाही तर भूक लागलेली नसताना जबरदस्तीने खाणे टाळणे, भूक लागली तरी हलके अन्नच घेणे व रात्री फक्त द्रवाहार घेणे या सर्वांचा अंतर्भाव लंघनात होतो.

ॲसिडिटी, गॅसेस हे शब्द आजकाल बोलीभाषेत सरमिसळून गेलेले आढळतात. याचे कारण हा त्रास असणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे. दुसऱ्या कोणत्याही आजारासाठी व्यक्ती दाखवायला आलेली असली तरी तिला ‘ॲसिडिटी, गॅसेस जाणवतात का’ असा प्रश्र्न विचारला तर उत्तर सहसा ‘हो’ असेच येते. आयुर्वेदाप्रमाणे विचार केला तर या दोन्ही तक्रारींचे मूळ ‘मंदाग्नी’मध्ये म्हणजे अन्नपचन करणाऱ्या अग्नीची कार्यक्षमता कमी होण्यामध्ये आहे. वेळेवर (म्हणजे दुपारी १२च्या तर संध्याकाळी साडेआठच्या आसपास) न जेवणे, भुकेपेक्षा अतिप्रमाणात किंवा कमी प्रमाणात खाणे, पाणी-चहा किंवा इतर शीतपेये अति प्रमाणात पिणे, रात्री जागरण करून दिवसा झोपणे, सतत थोडे थोडे खात राहणे, तेलकट पदार्थ, मैदा, पनीर, चीज वगैरे गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश असणे, कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम न करणे वगैरे कारणे यामागे असतात. सध्या कोविड-१९च्या लाटेनंतरही अनेकांना पचनाच्या तक्रारी जणवतात, त्यातॲसिडिटी, गॅसेसचा त्रास होण्याचे प्रमाणही बरेच आहे. निदानपरिवर्तन म्हणजे त्रास होण्यामागचे जे कारण असेल ते शोधून काढून टाळणे ही यशस्वी उपचारांची पहिली पायरी असते. त्यामुळे तर जीवनशैलीमध्ये सुधारणा करणे, थोडा वेळ चालण्यासाठी, योगासनांसाठी काढणे गरजेचे होय. बरोबरीनेखालील उपाय सहजासहजी करता येतील.

ॲसिडिटी, गॅसेससाठी उत्तम उपाय म्हणजे लंघन, लंघनाचा अर्थ काही न खाणे असा आयुर्वेदाला अभिप्रेत नाही तर भूक लागलेली नसताना जबरदस्तीने खाणे टाळणे, भूक लागली तरी हलके अन्नच घेणे व रात्री फक्त द्रवाहार (धान्य वा भाज्यांपासून बनविलेले सूप) घेणे या सर्वांचा अंतर्भाव लंघनात होतो. प्रकृती ध्यानात घेऊन योग्य प्रकारे योजलेल्या लंघनामुळे अग्नी प्रदीप्त होतो, पर्यायाने गॅसेसची प्रवृत्ती नाहीशी होते. पोटावर हलक्या प्रमाणात शेक करण्याने वात सरून जाण्यास मदत मिळते. पोटावर रोझ ब्युटी सिद्ध तेलासारखे तेल लावून ओव्याच्या पुरचुंडीने किंवा रुईच्या वातशामक पानांनी पोट शेकण्याचाही चांगला फायदा होताना दिसतो. लिंबापासून बनविलेली ‘लिंबोटी’ ही सुद्धा पचन सुधारून वायू सरून जाण्यास मदत करते. लिंबाला एका बाजूने मध्यभागी चिरावे, त्यात हळद, सैंधव, ओवा,हिंग, जिरेपूड हे पदार्थ भरावे, लिंबू दोऱ्याने बांधावे व लोखंडाच्या पळीत किंवा कढईत ठेवून दोन्ही बाजूंनी गरम करावे. लिंबाचा रस बाहेर येऊ लागला की पळीतून बाहेर काढून पिळून घ्यावे. हा रस थोडा थोडा घेण्याने लगेच बरे वाटते.

घशात व छातीत जळजळ होत असेल तर ५-६ काळ्या मनुका तुपावर हलक्या परतून घ्याव्यात. त्यावर चवीनुसार सैंधव, बारीक केलेली थोडी खडीसाखर भुरभुरवून नीट चघळून खाण्याने बरे वाटते. रात्री अपरात्री ॲसिडिटी झाली, पोटात गॅस झाला तर कारण नसताना ताण येतो, काय करावे हे सुचत नाही, अस्वस्थपणा इतका असतो की झोप येणे दूरची गोष्ट असते. अशा वेळी आले-लिंबू-मधाचे चाटण थोडे थोडे चाटण्याचा आणि बरोबरीने पोटाला तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीने शेक करण्याचा लगेच गुण येतो. अर्ध्या लिंबाचा साधारण २-३ चमचे रस, आल्याचा रस एक चमचा आणि २-३ चमचे शुद्ध मध हे सर्व एकत्र करून एकजीव मिश्रण तयार करता येते. ॲसिडिटी, गॅसेस होऊ नयेत, पर्यायाने अग्नीची कार्यक्षमता उत्तम राहावी यासाठी संतुलन अन्नयोग गोळ्या उत्तम होत. जेवणानंतर २-२ गोळ्या घेतल्या की क्रमाक्रमाने पचन सुधारते, भूक नीट लागते, मलशुद्धी वेळेवर होते, अन्न नीट पचल्याने नीट अंगी लागते. विशेषतः बाहेरचे जेवण झाले किंवा घरातल्या घरात काही विशेष बेत बनवला व तो आवडल्यामुळे चार घास जास्ती जेवण झाले तर अन्नयोग गोळ्या निश्र्चित घ्याव्यात. बरोबरीने रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा सॅनकूल चूर्णासारखे अनुलोम करून वायूला बाहेर जाण्यास मदत करणारे चूर्ण घेतले तर बघता बघता ॲसिडिटी, गॅसेस , पोट साफ न होणे अशा अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या तक्रारी साफ बऱ्या होतात असा अनुभव आहे. या सर्व उपायांचा आणि सुरुवातीला सांगितलेल्या कारणांपासून दूर राहण्याचा उपयोग होईलच. बरोबरीने पथ्यकर गोष्टींचे सेवन करणे आणि अपथ्यकर पदार्थांपासून दूर राहणे उत्तम.

पथ्य : भाजून घेतलेला जुना तांदूळ, ज्वारी, नाचणी, वरई, मूग. तूर, राजगिरा, वेलीवर येणाऱ्या फळभाज्या, साळीच्या लाह्या, आवळा, डाळिंब, पपई, द्राक्षे, धणे, जिरे, बडीशेप, ओवा, वेलची, आले, लिंबू, कढीपत्ता, घरी बनविलेले साजूक तूप, कोकम, उकळून सामान्य तापमानाला थंड केलेले पाणी.

अपथ्य : नवी धान्ये, कोबी-फ्लॉवर, वाटाणा, चवळी वगैरे कडधान्ये, चमचमीत तेलकट पदार्थ, पनीर, चीज, मैद्याचे पदार्थ, बेकरीतील पदार्थ, विरुद्ध अन्न, मद्यपान, चहा कॉफीचे अतिसेवन, तंबाखू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT