Insulin pump sakal
फॅमिली डॉक्टर

मधुमेही रुग्णांचे वरदान ठरलेला इन्सुलिन पंप!

डायबेटीस टाईप १ आणि डायबेटीस टाईप २ चे काही रुग्ण यांना रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन घेण्याची आवश्यकता असते.

डॉ. गजानन र. एकबोटे

डायबेटीस टाईप १ आणि डायबेटीस टाईप २ चे काही रुग्ण यांना रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन घेण्याची आवश्यकता असते. इन्सुलिन घेण्याच्या दोन पद्धती आहेत. सुई किंवा पेनच्या सहाय्याने इन्सुलिन घेणे आणि इन्सुलिन पंप वापरणे. इन्सुलिन पंप हे एक संगणकीकृत लहानसे यंत्र असून त्याद्वारे कातड्याच्या खाली सातत्याने (Continuous) इन्सुलिन दिले जाते.

या इन्सुलिनचा वेग ताशी १ युनिट – २ युनिट एवढा असतो. यास बेसल इन्सुलिन (Besal Insulin) असे म्हणतात. त्याचप्रमाणे जेवढा नाश्ता, दुपारच्या जेवणाच्या वेळेला किंवां रात्रीच्या जेवणाच्या वेळेस इन्सुलिनचा डोस दिल्यास त्यास बोलस इन्सुलिन (Bolus Insulin) असे म्हणतात. इन्सुलिन पंपमध्ये अतिशीघ्र (eg. NOVORAPID INSULIN) वेगाने साखरेचे पातळी कमी करण्यासाठी क्रिया करणारे इन्सुलिन संग्रहित केले जाते.

इन्सुलिन पंप कशा पद्धतीने काम करते ?

या लहानशा उपकरणाच्या आधारे अतिशीघ्र गतीने काम करणारे इन्सुलिन एका नलिकेद्वारे २४ तास शरीरात जात असते. त्यास “बेसल इन्सुलिन” (Basal Insulin) असे म्हणतात. बेसल इन्सुलिनचा डोस हा रक्तातील साखरेच्या प्रमाणानुसार कमी-जास्त करता येतो. त्याचप्रमाणे सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यावेळेस याच इन्सुलिनचा अतिशीघ्र गतीने काम करणाऱ्या इन्सुलिनचा एक डोस एका नलिकेद्वारे पेशंटला दिला जातो. यास 'बोलस इन्सुलिन' (Bolus Insulin) असे म्हणतात.

इन्सुलिन पंप हा भ्रमणध्वनीच्या आकाराचा असतो. तो पेशंटच्या शरीराला एका नलिकेद्वारे जोडला जातो. या नलिकेच्या अग्रभागी एका लहानशी सुई असते. या सुईद्वारे अतिशीघ्र गतीने कार्य करणारे इन्सुलिन दिले जाते. ही सुई पोटावर, कमरेखालचा भाग किंवा मांड्या याठिकाणी शरीराला जोडता येते. इन्सुलिन पंपमध्ये अतिशीघ्र गतीने काम करणारे इन्सुलिन (Rapidly Acting Insulin) वापरता येते. सावकाश गतीने काम करणारे (Long Acting Insulin) इन्सुलिन या पंपमध्ये वापरता येत नाही.

इन्सुलिन पंपचे फायदे -

1) ५ दिवसातून एकदा इन्सुलिन पंपची सुई बदलावी लागते. त्यावेळीसुध्दा पेशंटला कमी वेदना होतात. त्यामुळे दररोज इंजेक्शन घेण्यापेक्षा इन्सुलिन पंपद्वारे इन्सुलिन शरीरात गेल्यास रक्तातील साखर ही योग्य प्रमाणात राहते. त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांवर मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम टळतात. उदा. - डोळे, मूत्रपिंड, हृदय, यकृत इ. इन्सुलिनमुळे मधुमेह अतिशय काटेकोरपणे नियंत्रित करता येतो. त्याचप्रमाणे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास त्याप्रमाणे इन्सुलिनचा डोस कमी-जास्त करता येतो.

2) इन्सुलिन पंप लावल्यामुळे व्यायाम कुठल्या वेळेस आणि किती करावा हे रुग्णाला समजते. त्याचप्रमाणे सकाळी उपाशीपोटी असलेल्या रक्तातील जास्त साखरेचे प्रमाण नियंत्रित करता येते.

3) इन्सुलिन पंप ४ - ५ वर्षे चालतो. त्यानंतर तो बदलावा लागतो.

इन्सुलिन पंपचे तोटे -

1) दर ४-५ दिवसांनी इन्सुलिन पंपची नलिका बदलावी लागते. (Insulin Tubling)

2) रक्तातील साखरेचे प्रमाण दिवसातून ३ वेळा तरी तपासावे लागते. रक्तातील साखरेच्या प्रमाणानुसार इन्सुलिनचा डोस घ्यावा लागतो. त्यामुळे मधुमेहामुळे होणारी हानी (Complications) टाळता येतात.

3) इन्सुलिन पंप महागडा आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या रुग्णांना हा पंप घेणे परवडत नाही. याची किंमत २ लाख रुपये एवढी आहे.

परंतु अनेक विमा कंपन्यांनी इन्सुलिन पंप योग्य तो विम्याचा हफ्ता देऊन रुग्णांना देणेबाबत उपाययोजना केलेली आहे. काही सामाजिक संस्था किंवा औषधाच्या कंपन्या यांनीसुध्दा इन्सुलिन पंप देण्याची व्यवस्था केलेली आहे. इन्सुलिन पंप म्हणजे मधुमेह टाईप १ आणि मधुमेह टाईप २ चे काही रुग्ण यांना उपचार देण्याच्या दृष्टीकोनातून एक वरदान आहे. कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण चांगल्या रीतीने नियंत्रित राहू शकते.

एक इन्सुलिन पंपची किंमत रुपये दोन लाख असून इन्सुलिन पंपला शरीराला जोडणाऱ्या नलिकेची किंमत साधारणपणे ३००-३५० रुपये एवढी असते. प्रत्येक महिन्यात ५ वेळा ही नंलिका बदलावी लागते. त्याचप्रमाणे रुग्णाच्या गरजेनुसार अतिशीघ्र गतीने काम करणारे इन्सुलिन (Novo Rapid Insulin) व त्याचा बोलस (Bolus) डोस घेऊन रक्तातील साखर नियंत्रित करता येते.

हे इन्सुलिन vial मध्ये किंवा ३ मि.लि. एवढी क्षमता असणाऱ्या लहान ट्यूबमध्ये मिळते. पुण्यामध्ये सुमारे किमान १२००-१५०० रुग्ण इन्सुलिन पंप वापरत आहेत. या रुग्णांनी योग्य पद्धतीने इन्सुलिन देणाऱ्या इन्सुलिन पंपमुळे आपले आयुष्यमान वाढविले आहे, हे निश्चित. त्याचप्रमाणे मधुमेहामुळे अवयवांची होणारी हानी (Complications) टाळली जाते.

आता या इन्सुलिन पंपमध्ये सुधारणा झाली असून, त्यामध्ये रक्तातील साखरेच्या प्रमाणानुसार इन्सुलिन दिले जाते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण काटेकोरपणे नियंत्रित होते. या इन्सुलिन पंपची किंमत रु. ४ लाख एवढी आहे. ४-५ वर्षांनी हा पंप बदलावा लागतो. या सर्व इन्सुलिन पंपची निर्मिती अमेरिकेतून होत असली तरी तो भारतात उपलब्ध आहे.

काही दिवसांनी इन्सुलिन पंपची किंमत कमी होईल, हे निश्चित. परंतु इन्सुलिन घेणाऱ्या मधुमेही रुग्णांना हे एक वरदानच आहे. त्याचा वापर केल्याने रुग्णांचे आयुष्य वाढते, त्याचप्रमाणे जीवनाचे राहणीमान सुधारते, याची नोंद तज्ञांनी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT