Erandel Oil Sakal
फॅमिली डॉक्टर

हितकारी एरंडेल तेल

एरंडेल तेल गेली हजारो वर्षे आयुर्वेद शास्त्रात निरनिराळ्या गोष्टींसाठी वापरले जात आहे. हे तेल वनस्पती तेल असते, जे शरीराच्या बाहेर व आत असे दोन्हीकडे वापरले जाते.

सकाळ वृत्तसेवा

एरंडेल तेल गेली हजारो वर्षे आयुर्वेद शास्त्रात निरनिराळ्या गोष्टींसाठी वापरले जात आहे. हे तेल वनस्पती तेल असते, जे शरीराच्या बाहेर व आत असे दोन्हीकडे वापरले जाते.

- डॉ. मालविका तांबे

एरंडेल तेल गेली हजारो वर्षे आयुर्वेद शास्त्रात निरनिराळ्या गोष्टींसाठी वापरले जात आहे. हे तेल वनस्पती तेल असते, जे शरीराच्या बाहेर व आत असे दोन्हीकडे वापरले जाते. तेलाचा रंग हलका पिवळा असून ते थोडे चिकट व गिळगिळीत असते. याच कारणामुळे मध्यंतरीच्या काळात याचा वापर कमी होत गेला असावा. सध्या मात्र एरंडेल तेल वापराबद्दल जागरूकता वाढते आहे. हे तेल एरंड नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून केलेले असते. बियांमध्ये तेल प्रचुर मात्रेत असते. बियांच्या टरफलात रिसिनिन नावाचे द्रव्य असते, जे त्रासदायक असते. पण तेलाच्या निर्मितीप्रक्रियेत हे द्रव्य तेलात येत नाही. एरंडेल तेलाची मुख्य चव गोड असते, तर अनुरस कषाय व तिक्त असतो. हे तेल गुणाने उष्ण, तीक्ष्ण व सूक्ष्म (शरीराच्या सर्व स्रोतसांमध्ये सामावण्यस सोपे), गुरू व पिच्छिल (चिकट) असते. दोषांचा विचार केला तर यामुळे शरीरातील वात व कफदोषाचे संतुलन व्हायला मदत होते.

  • आयुर्वेदात कुठल्याही रोगाचा इलाज करते वेळी शरीरशुद्धीला म्हणजे संतुलन पंचकर्मासारख्या शास्त्रोक्त पंचकर्माला खूप महत्त्व दिलेले आहे. एरंडेल तेलस्रोतविशोधन (शरीराचे सर्व स्रोतस म्हणजे सगळे ऑर्गन्स मोकळे करणे), अधोदोषहर (शरीराच्या खालच्या भागातले दोष विरेचन द्वारा बाहेर काढणे).

  • पोट साफ होत नसेल, पोटात गुबारा धरणे, मूळव्याध, पोटात दुखणे अशा वेळी १-२ चमचे एरंडेल तेल आल्याच्या चहाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर घेण्याचा उपयोग होताना दिसतो.

  • आम, कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसेराइडस् वाढलेले असल्यास पचनाच्या दृष्टीने व शरीरातील आम कमी होण्याच्या हेतूने एरंडेल घेणे उपयुक्त ठरते. दोन वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लहान मुलांनाही अर्धा चमचा एरंडेल देणे उपयोगी ठरते. दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे पोट दुखत असले, पोटात गॅसेस होत असले, शी साफ होत नसली तर शीच्या जागी एरंडेल लावल्यास बद्धकोष्ठता कमी व्हायला मदत मिळते, तसेच कृमी असल्यासही मदत होते. लहान वयापासूनच नाभीमध्ये एरंडेलाचे २-३ थेंब सोडल्याने गॅसेस कमी होतात व पचन सुधारायला मदत मिळते.

  • एरंडेल त्वचेसाठीही उत्तम सांगितलेले आहे. त्वचा फार कोरडी पडत असली, कुठला त्वचारोग असला, त्वचेवर काळे डाग वगैरे असले तर वैद्यांच्या सल्ल्याने हलक्या हाताने एरंडेल लावण्याचा उपयोग होऊ शकतो.

  • एरंडेल तेल शरीरातील वात कमी करते, तसेच रक्ताभिसरण वाढायला मदत करते. एरंडेल उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे शरीराचे तापमान वाढायला मदत मिळते, शरीरातील शोथ कमी व्हायला म्हणजे सूज कमी व्हायला मदत मिळते, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या हाडांशी व सांध्यांशी संबंधित दोषांमध्ये एरंडेलाचा फायदा होताना दिसतो. आमवात, गाऊट, कंबर दुखणे, गुडघा दुखणे अशा त्रासांमध्ये हलक्या हाताने एरंडेल लावण्याचा फायदा होताना दिसतो.

  • अर्धा चमचा हिरडा चूर्ण व अर्धा चमचा एरंडेल तेल एकत्र करून दिवसातून एकदा काही तरी खाल्ल्यावर घेतल्यास कुठल्याही प्रकारचे दुखणे कमी व्हायला मदत मिळते. हा उपाय १-२ आठवडे केल्यावर साधारण ४-५ आठवडे उपाय बंद करावा. यानंतरही त्रास होतो आहे वाटल्यास पुन्हा हा उपाय १-२ आठवडे करावा. एरंड पत्राच्या स्थानिक स्वेदनाचाही अशा प्रकारच्या त्रासांमध्ये उपयोग होताना दिसतो.

  • आमवात रोगामध्ये सकाळी नाश्त्याच्या वेळी एका चपातीच्या कणकेमध्ये एक चमचा एरंडेल घालून गरम चपाती खाल्ल्याचा फायदा होतो. या चपातीवर तूप घातल्यास गुण अजूनच वाढतो. हा प्रयोग बरेच दिवस करता येतो.

  • सध्याच्या काळात स्क्रीनचा वापर फार वाढल्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा, डोळ्यांची जळजळ वगैरे त्रास वाढत चाललेले आहेत. रोज डोळ्यांमध्ये एक एक थेंब एरंडेल घालण्याचा या त्रासांमध्ये उपयोग होताना दिसतो.

  • लहान मुलांनाही काजळासारखे एरंडेल तेलाचे बोट फिरवणे उत्तम ठरते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असलेले संतुलन सुनयन हे तेल बनवितानाही एरंडेल तेलाचा वापर केला जातो. डोळ्यात कुसळ वगैरे गेले असले किंवा डोळा खुपत असला तर डोळ्यात एरंडेल घालण्याचा फायदा होऊ शकतो.

  • एरंडेल केसांकरताही उत्तम सांगितले आहे. केसांतील कोंडा, केस कोरडे होणे, केस गळणे, केस अकाली पांढरे होणे यांना प्रतिबंध होण्यासाठी आठवड्यातून एकदा डोक्याला एरंडेलाचा मसाज करून एक तासाने फार तीव्र नसलेल्या शांपूने केस धुवावेत.

  • भुवयांचे केस पांढरे होणे, कमी होणे तसेच दाट भुवया असण्याची इच्छा असणाऱ्यांनी भुवयांना एरंडेल लावण्याचा पायदा होतो.

  • एरंडेल वृष्य सांगितलेले आहे म्हणजे हे तेल शरीरात शुक्र वाढवायला मदत करते. तसेच हे शुक्रविशोधनाचेही कार्य करते. त्यामुळे शुक्रसंबधी रोग असल्यास वैद्यांच्या सल्ल्याने एरंडेलाचा वापर करावा.

  • स्त्रियांच्या बाबतीत योनीविशोधन म्हणजे योनीच्या शुद्धीकरता एरंडेलाचा वापर केला जातो. योनीची शिथिलता कमी करण्यासाठी एरंडेलाचा योनीपिचू ठेवण्याचा फायदा होताना दिसतो.

  • वंध्यत्व चिकित्सेकरता किंवा संतुलन पंचकर्म चिकित्सेतही एरंडेलाचा वापर हमखास केला जातो.

  • बाळ अंगावर दूध पीत असण्याच्या काळात कधीतरी दुधाचा प्रवाह अडकतो व त्यामुळे स्तनांवर सूज येताना जाणवते. हा त्रास अंगावर काढल्यास स्तन्याचे प्रमाण कमी होताना दिसते. अशा वेळी एरंडेलात कापूस भिजवून स्तनाग्रावर तसेच सूज आलेल्या ठिकाणी ठेवल्यास दुखणे व सूज कमी व्हायला मदत मिळते व पुन्हा स्तन्याचा प्रवाह व्यवस्थित होऊ लागतो.

  • आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच औषधांत एरंडेलाचा वापर केला जातो. उदा. सिंहनाद गुग्गुळ, आमावातारि रस, कल्याण क्षार, गंधर्व हस्तादी तेल.

  • पूर्वीच्या काळी घरात वर्षासाठी धान्य साठवून ठेवताना त्याला एरंडेल लावण्याची पद्धत होती, जेणेकरून धान्यात किडे-पोरकीडे होण्यास प्रतिबंध होत असे. असे एरंडेल लावलेले धान्य वापरल्यामुले त्याला लावलेले थोडे एरंडेल पोटात गेले तरी त्रास होत नाही.

  • एरंडेल सहसा कुठल्याही वयात त्रास देत नाही, फक्त ज्यांना पातळ मल होण्याची प्रवृत्ती असेल त्यांनी एरंडेल घेण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्यावा. काही लोकांना एरंडेल घेतल्यावर मुरडा येऊन पोटात दुखू शकते किंवा मळमळ होऊ शकते. अशांनीही परत एरंडेल घेण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्यावा.

  • प्रसूतीच्या वेळी एरंडेल घेण्याने प्रसूती सुखपूर्वक होते अशी उदाहरणे आहेत, परंतु पूर्ण गर्भावस्थेत नऊ महिने एरंडेल घेणे टाळणेच योग्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SCROLL FOR NEXT