Jigarthanda Sakal
फूड

खाद्यभ्रमंती : मदुराईचा ‘जिगरथंडा’

‘जिगरथंडा’... नाव ऐकताच कसं थंडगार वाटायला लागतं. एकदम गारेगार. बरोबर दहा वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वार्तांकनासाठी तमिळनाडूमध्ये गेलेलो.

आशिष चांदोरकर

‘जिगरथंडा’... नाव ऐकताच कसं थंडगार वाटायला लागतं. एकदम गारेगार. बरोबर दहा वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वार्तांकनासाठी तमिळनाडूमध्ये गेलेलो. तेव्हा दोन दिवस मदुराईमध्ये मुक्काम होता. तंजावूरहून मदुराईला जाताना बसमध्ये भेटलेला एन. बी. दीपक हा पुढचे दोन दिवस माझा मित्र आणि गाइड बनला... मदुराईचं मिनाक्षी मंदिर, मदुराई शहर, मुरूगनची इडली आणि मुट्टई डोसा (अंडा डोसा) या बरोबरच दीपकनं एका वेगळ्या पदार्थाची ओळख करून दिली आणि तो पदार्थ म्हणजे ‘जिल... जिल... जिगरथंडा...’

दोन दिवसांच्या मुक्कामात दोन्ही दिवस ‘जिगरथंडा’ घेण्याचा मोह आवरला नाही. पहिल्या दिवशी एका छोट्या विक्रेत्याकडील ‘जिगरथंडा’चा आस्वाद घेतला आणि दुसऱ्या दिवशी मिनाक्षी मंदिराच्या जवळच एका रस्त्यावर असलेल्या लोकप्रिय ''फेमस जिगरथंडा’ या ठिकाणी हजेरी लावली... ‘जिगरथंडा’ अनेकांकडे मिळतो पण सर्वाधिक लोकप्रिय ‘फेमस’चाच...

मस्तानीचं भावंड!

‘जिगरथंडा’ म्हणजे आपल्याकडं मिळणारी मस्तानी किंवा फालुदा यांचेच भावंड...काही पदार्थ तेच काही पदार्थ वेगळे. त्यातील Badam Pisin हा पदार्थ एकदम हटके. आपण याला बदामाच्या झाडाचा डिंक किंवा चिक म्हणू शकतो. Badam Pisin चे तीन-चार खडे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे. साधारण एका ग्लाससाठी एक खडा असं प्रमाण. सकाळी त्या तीन ते चार खड्यापासून बाऊलभर जेलीसदृश पदार्थ तयार होतो. ‘जिगरथंडा’मध्ये हा जेलीसदृश पदार्थ अत्यावश्यक असतो. बाकी सर्व पदार्थ आपल्याकडे उपलब्ध असणारेच असतात. आटवलेले ‘फ्लेव्हर्ड मिल्क’, आइस्क्रीम आणि खास सरबत. स्पेशल ‘जिगरथंडा’ असेल, तर दोन चमचे खवा. आधी तो जेलीसदृश पदार्थ, मग सरबत, मग ‘फ्लेव्हर्ड मिल्क’, खवा आणि आइस्क्रीम हे पदार्थ ग्लासमध्ये टाकून चमच्याने मस्त एकजीव करून घ्यायचे. एकजीव झाल्याची खात्री पटल्यावर मग त्यावर सरबत आणि आइस्क्रीमचा ‘स्कूप’ टाकून पेश करायचं...

‘फेमस’मध्ये हे सर्व पदार्थ अर्थातच, ती मंडळी स्वतःच तयार करतात. ‘फेमस’च्या मुख्य ‘आउटलेट’च्या बाहेर तुफान गर्दी असते. अगदी आपल्याकडे पुण्यात उन्हाळ्यात ‘सुजाता मस्तानी''च्या बाहेर असते तशीच. पण आपल्याला ऑर्डर मिळायला उशीर होत नाही. कारण ग्लासेस भरूनच ठेवलेले असतात. आपल्याला हवे असल्यास वरून सरबत आणि आइस्क्रीम टाकून दिले जाते. पहिल्या दोन-चार चमच्यांमध्येच आपल्याला ‘जिगरथंडा’च्या जादूचा अंदाज येतो. Badam Pisin पासून तयार होणारा जेलीसदृश पदार्थ ‘जिगरथंडा’चा आत्मा. थंड गुणधर्माचा आणि चवीला हलका गोड. सर्व मिश्रण नीट एकजीव केलेले असल्याने प्रत्येक चमच्याला त्याचे अस्तित्व जाणवते...

हे कोविडचं संकट टळल्यानंतर तुम्ही कधी मदुराईला गेलात, तर मिनाक्षी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घ्या, मुरुगनकडे इडलीचा आस्वाद घ्या. पण ‘फेमस’च्या ‘जिगरथंडा’चा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT