Adhik Maas 2023 esakal
फूड

Adhik Maas 2023 : जावईबापूंसाठी अधिकमासाचा खास बेत करायचाय? हे घ्या स्पेशल ऑप्शन्स

अधिकमासात जावई भोजनाचा विशेष मान असतो. अशावेळी काय वेगळं करणार हा मोठा प्रश्न असतो.

धनश्री भावसार-बगाडे

Adhik Maas Javai Bhojan Special Menue In Marathi :

अधिकमास हा हिंदू कॅलेंडरनुसार दर अडिच वर्षानंतर येणारा १३ वा महिना आहे. याकाळात केले जाणारे पुण्यकर्माचे फळही अधिक असते असे मानले जाते. त्यामुळे याकाळात मुलीला आणि जावयाला लक्ष्मी नारायण रुपात पाहिले जाते. त्यामुळे त्यांना विशेष मान देत वाण लावून भोजन घातले जाते.

अधिकमासात जावई भोजनाचा विशेष बेत आखला जातो. त्यातही जर नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा पहिलाच अधिकमास असेल तर त्याला अजून विशेष समजले जाते. यासाठी काय बेत करावा हा अनेकांना प्रश्न असतो. तुमचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काही ऑप्शन्स सुचवत आहोत. बघा जमतंय का...

पारंपरिक बेत

महाराष्ट्रात कोणतेही शुभ कार्य, विशेष दिवस किंवा बऱ्याचशा सणावारांना आपण पारंपरिक बेत करतो, तो म्हणजे पुरण पोळीचा. पुरण पोळी ही महाराष्ट्रीयन लोकांची ओळख तर आहेच शिवाय याला एक प्रतिष्ठेचा भागही समजला जातो. त्यामुळे जर कोणाला विशेष मान द्यायचा असेल तर आजही मराठी घरांमध्ये आवर्जून पुरण पोळी केली जाते.

पण पुरण पोळीचा घाट फार, असं म्हणून काही वेळा कंटाळा येतो. तर यासाठी तयारी आधीपासून करून ठेवावी. गोड, तिखट, चमचमीत, तळण असं परीपुर्ण बेत यात साधला जातो.

तिखटाचा बेत

अधिकमास हा अत्यंत पवित्र महिना समजला जात असल्याने या काळात शाकाहारी जेवण केले जाते. त्यामुळे जर जावई नॉनव्हेज प्रेमी असेल किंवा त्यांना तिखटाचा बेत आवडत असेल तर काही शाकाहारी झणझणीत पदार्थ आहेत, ज्याचा बेत जावयाला खूश करेल.

मिसळीचा झणझणीत बेत. यात झणझणी मटकीची भाजी करावी. सोबत पाव नको असेल तर चपाती भाकरी आवडीनुसार करू शकतात. शेव भाजी, गोळ्याची भाजी, पाटवड्याची भाजी, भरली वांगी सोबत आवडीनुसार पुरी, चपाती करू शकतात. यासोबत मसाले भात, व्हेज पुलाव करू शकतात. शिवाय जे गोड आवडत असेल ते ठेवावे.

पोळी भाजी खाऊन कंटाळा आलाय?

प्रत्येक सणावाराला तेच ते पारंपरिक, पोळीभाजीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी हटके करावेसे वाटत असेल तर मेरा भारत महान म्हणावे. म्हणजे दाक्षिणात्य, उत्तर प्रदेशीय खाद्य पदार्थ यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

  • यात तुम्ही पावभाजी, मसाले भात आणि सोबत रसमलाई किंवा गुलाबजाम असा बेत करू शकतात.

  • किंवा वडा सांबर, उत्तपा, डोसा असा साऊथ इंडियन बेत करू शकतात. हा बेत लहानमुलांचाही फार आवडता असतो.

  • किंवा अगदी चायनीय, काँटीनेटल, इटालियन पदार्थांचाही बेत करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Hitendra Thakur: तावडे पैसे देताना कुणाला घावले? २५ फोन, ५ कोटी अन् सर्व प्रकरण बाहेर काढणारे हितेंद्र ठाकूर कोण?

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Nanded South Assembly constituency : नांदेड-दक्षिण मतदारसंघात विजयश्री कोणाला घालणार माळ, नवीन चेहऱ्याचा ट्रेंड कायम राहणार का?

Flipkart Mobiles Bonanza Sale : महागड्या मोबाईलवर मिळतोय बंपर डिस्काउंट; सुरू झाला फ्लिपकार्टचा Bonanza सेल, ऑफर्स पाहा

Satara Assembly Election 2024 : तुमच्यामुळेच संस्था अडचणीत; पसरणीत अरुणादेवी पिसाळ यांची टीका

SCROLL FOR NEXT