Ashadhi Ekadashi recipes How To Make Upvasacha Meduvada  
फूड

Upwasacha Medu Vada: आषाढी एकादशीनिमित्त घरी बनवा कुरकुरीत अन् खमंग उपवासाचे मेदुवडे

सकाळ डिजिटल टीम

आषाढी एकादशीमुळं संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. या दिवशी बहुतांश जण उपवास धरतात. त्यामुळं या दिवशी प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं उपवासाचे पदार्थ बनवले जातात. खिचडी, बटाट्याचा चिवडा, साबुदाणा वडा, भगर, खीर असे अनेक पदार्थ बनवले जातात. पण हे पदार्थ तुम्हाला खाऊन कंटाळ आला असेल तर तुम्ही उपवासाचे मेदुवडे ट्राय करु शकता. (Ashadhi Ekadashi recipes How To Make Upvasacha Meduvada )

उपवासाचे मेदुवडे म्हटल्यावर तुमच्या भुवया उंचावल्या असतील. कारण मेदुवडा हा दाक्षिणात्य पदार्थ आहे अन् तो उडीद डाळीचा असतो. मग उपवासाचा कसा? तर जाणून घेऊया या उपवासाच्या मेदुवड्यासंदर्भात

खमंग उपवासाचे मेदुवडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप भगर / वरई

1 कप पाणी

सेंधव मीठ चवीनुसार

1 कप ताक

2 चमचे दाण्याचा कूट

2 चमचे किसलेलं सुकं खोबरं

बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

2 चमचे साबूदाण्याचे पीठ (साबूदाणे मिक्सरमध्ये वाटून)

1 उकडलेला बटाटा

1 चमचा शेंगदाणा तेल

कृती

उपवासाचे मेदूवडे बनविण्यासाठी 1 कप भगर स्वच्छ दोन तीन पाण्याने चांगली धुवून घ्या. त्यानंतर एक कढई घ्या, ज्यामध्ये 1 कप पाणी टाकून चवीनुसार सेंधव मीठ यात टाका. नंतर यामध्ये ताक टाकून मिश्रण ढवळून घ्या.

आता या मिश्रणामध्ये भिजत ठेवलेले वरई तांदूळ टाकून द्या, आणि मंद आचेवर वरईचा भात शिजवा. वरई चांगली शिजल्यावर थोडी थंड होऊ द्या, त्यानंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, किसलेलं सुकं खोबरं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे साबूदाण्याचे पीठ घाला.

साबूदाण्याचे पीठ बाजारात मिळत नसेल तर तुम्ही घरातया घरात सुका साबुदाणा मिक्सरमध्ये वाटून बारीक करून घ्या. आणि त्यानंतर एक मोठा उकडलेला बटाटा किसून टाका. हे सर्व मिश्रण पसरट ताटलीवर चांगले मळून घ्या, पीठ हाताला चिकटत असले तर शेंगदाण्याचे तेल वरुण टाका, आणि चंगळे मळून घ्या. पीठ चांगले एकजीव व्हावे यासाठी तुम्ही पाण्याचा हात त्याला लावू शकता, पण पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवा, कारण जास्त पाणी घेतले तर वड्यांना आकार देता येणार नाहु .

यानंतर बारीक आकाराचे गोळे बनवा आणि त्याला मधोमध होल करा. असे केल्याने वडे मेदूवडयाप्रमाणे दिसून येईल. हे वडे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता. जर तुम्ही उपवसाला वरील दिलेल्या साहित्यांपैकी कोणता पदार्थ खात नसाल तर काही हरकत नाही. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही असे वडे बनवून खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT