Besan Bread Toast  sakal
फूड

Besan Bread Toast Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी बेसन ब्रेड टोस्ट, जाणून घ्या रेसिपी...

सकाळ डिजिटल टीम

नाश्त्यामध्ये बेसन ब्रेड टोस्ट खायला सर्वांनाच आवडते. जवळपास प्रत्येक घरात सकाळी नाश्ता काय करायचा असा प्रश्न पडतो. बऱ्याच वेळा असे होते की नाश्ता बनवायला फारसा वेळ नसतो पण प्रत्येकासाठी स्वादिष्ट नाश्ता बनवण्याचं टेन्शन असतं. जर तुम्हाला कधी अशा परिस्थितीचा सामना करावा लागला तर काळजी करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत बेसन ब्रेड टोस्ट तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

बेसन ब्रेड टोस्टचे वैशिष्ट्य म्हणजे ते चवीला स्वादिष्ट असले तरी ते कमी वेळात तयार होतात. मग ते मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता. ब्रेकफास्ट व्यतिरिक्त, दिवसा किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक म्हणून बेसन ब्रेड टोस्टचा देखील आनंद घेता येतो.

बेसन टोस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ब्रेडचे स्लाइस - 5

बेसन - 1 कप

चिरलेला टोमॅटो - 1/2 कप

चिरलेली सिमला मिरची - 1/2 कप

चिरलेला कांदा - 1/2 कप

किसलेले कच्चे बटाटे - 1/2 कप

चाट मसाला - 1/4 टीस्पून

लाल मिरची पावडर - 1 टीस्पून

गरम मसाला - 1/4 टीस्पून

बेकिंग सोडा - 1 चिमूटभर

तेल

मीठ - चवीनुसार

बेसन टोस्ट कसा बनवायचा

बेसन ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी प्रथम एक भांडे घ्या आणि त्यात बेसन टाका. यानंतर बेसनामध्ये लाल तिखट, गरम मसाला, बेकिंग सोडा, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा. आता थोडं थोडं पाणी घालून बेसनाचं जाडसर पीठ तयार करा. आता यामध्ये चिरलेला कांदा, किसलेले कच्चे बटाटे, चिरलेली सिमला मिरची आणि चिरलेला टोमॅटो टाका आणि सर्वकाही चांगले मिसळा आणि मिश्रण तयार करा.

आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर ब्रेडचे स्लाइस घ्या, बेसनच्या पिठात नीट बुडवून घ्या आणि तळण्यासाठी पॅनमध्ये टाका. आता ब्रेडला 1 ते 2 मिनिटे दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत तळून घ्या. ब्रेड कुरकुरीत तळून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. त्याचप्रमाणे सर्व ब्रेड स्लाइस तळून घ्या. नाश्त्यासाठी तुमची स्वादिष्ट बेसन ब्रेड टोस्ट रेसिपी तयार आहे. टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

Latest Maharashtra News Updates: आमदार सतेज पाटील यांनी धरला ठेका

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

Today Navratri Colour: नवरात्रीचा चौथा रंग केशरी, 'या' मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून घ्या आउटफिट आयडिया, दिसाल सुंदर

SCROLL FOR NEXT