Evening Snacks  Sakal
फूड

Evening Snacks : संध्याकाळी खाण्यासाठी सर्वोत्तम स्नॅक्स कोणते?

संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर जोरदार भूक लागलेली असते.

सकाळ डिजिटल टीम

Evening Snacks : संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर जोरदार भूक लागलेली असते. या भुकेमुळे अनेकजण जे समोर येईल ते खातात आणि त्यावेळची भूक शमवतात. स्नॅक्स हे तुमच्या दैनंदिन पोषणाला पूरक ठरणारे एक प्रभावी मॉडेल आहे. आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या जेवणापूर्वी म्हणजेच संध्याकाळच्यावेळी सर्वोत्तम आणि सर्वात वाईट स्नॅक्स कोणते याबद्दल सांगणार आहोत.

हे आहेत संध्याकाळचे सर्वोत्तम स्नॅक्स

1. नट

नट्स हे खाण्यासाठी चविष्ट असतात. याच्या सेवनाचे आरोग्यासाठी अनेक फायदेदेखील आहेत. संशोधनात असेही दिसून आले आहे की, यात हाय कॅलरी आणि फॅट असूनही, याचे अचूक सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

2. फळांसह दहीचे सेवन

फळे आणि साधे दही मिळून एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता बनतो. फळे हे अँटिऑक्सिडंट्स, फायबर इत्यादींचे सर्वोत्तम स्रोत आहेत. तर, ग्रीक योगार्टमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. विविध प्रकारचे पोषक आणि त्यांच्या गोड आणि तिखट स्वादांसाठी तुम्ही दह्यासोबत विविध फळांचे सेवन करू शकता.

3. डार्क चॉकलेटमध्ये बुडवलेले बदाम

बदाम आणि डार्क चॉकलेट हे दोन्ही हेल्दी फॅटचे उत्कृष्ट स्रोत आहेत. याच्या एकत्रितपणे खाण्याने स्वादिष्ट आणि हृदयाला निरोगी असणारा नाश्ता बनवता येऊ शकतो.

4. पीनट बटरसह सफरचंद

सफरचंद हे असे एकच फळ आहे ज्यामध्ये भरपूर फायबर असते. पीनट बटरमध्ये हेल्दी फॅट, वनस्पती-आधारित प्रथिने आणि फायबरदेखील असतात. सफरचंद पीनट बटरमध्ये मिसळून तुम्ही कुरकुरीत आणि मलईदार स्नॅकचा आनंद घेऊ शकता. याच्या चव वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडी दालचिनीदेखील घालू शकता.

संध्याकाळचे सर्वात वाईट स्नॅक्स

1. मिल्क चॉकलेट

तुम्ही वजन आणि आहाराचे व्यवस्थापन करत असाल तर, संध्याकाळच्यावेळी डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेटचे सेवन करू नका. मिल्क चॉकलेटमध्ये साखर, दूध आणि अनेकदा प्रिझर्वेटिव्ह असतात. त्यामुळे संध्याकाळच्यावेळी मिल्क चॉकलेटेचे सेवन टाळणे शहाणपणाचे आहे.

2. चिप्स

बटाटा चिप्स किंवा तळलेले चिप्स हा सर्वत्र आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. मात्र, यामध्ये सोडियम आणि इतर घटक असतात. जे आरोग्यासाठी लाभदायक नसतात. संध्याकाळच्यावेळी स्नॅक्स म्हणून याच्या सेवनाने शरिराला लाभ होण्याऐवजी नुकसानच होते. त्यामुळे संध्याकाळच्यावेळी भूक लागल्यास स्नॅक्समध्ये चिप्स खाणे टाळा.

3. तळलेले पदार्थ

संध्याकाळच्या स्नॅक्स खाताना शक्य तळलेले पदार्थ शक्यतो खाणे टाळा. कारण यामध्ये फॅट, मीठ आणि इतर अनेक घटक असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकते. संध्याकाळच्यावेळी पकोडे, समोसे आणि इतर फ्रेंडली स्नॅक्स खाणे जरी चवदार वाटत असले तरी, शक्य तेवढे हे पदार्थ खाणे टाळा

तुम्ही कधी खाता यापेक्षा तुम्ही काय खाता आणि किती खाता याला महत्त्व असते. त्यामुळे संध्याकाळच्यावेळी शरिराची तात्पूर्ती भूक मिटेल अशाच हेल्दी पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. कोणत्याही पदार्थांचे सेवन करण्यापूर्वी एकदा अवश्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT