best non veg restaurants in kolhapur Esakal
फूड

कोल्हापूरला जाताय मग या हॉटेलमध्ये Chicken Mutton थाळीवर नक्की ताव मारा  

Best Non Veg Restaurants in Kolhapur: कोल्हापूरातही मासांहारासाठी अनेक हॉटेल्स आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला काही खास हॉटेल्स काही तिथली स्पेशॅलिटी काय हे सांगणार आहोत.

Kirti Wadkar

Best Non Veg Restaurants in Kolhapur: कोल्हापूर म्हंटलं की डोळ्यासमोर येतो तो तांबडा पांढरा रस्सा. कोल्हापूर हे जसं कोल्हापूरी चप्पलांसाठी Kolhapuri Chappls प्रसिद्ध आहे. तसचं झणझणीत आणि चविष्ट जेवणासाठी देखील कोल्हापूर महाराष्ट्रातच Maharashtra नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे.

यातही खास करून मासांहार म्हणजे कोल्हापूरी स्टाइलचं चिकन मटण जगात भारी आहे. मांसाहारी खवय्यांसाठी कोल्हापूर म्हणजे खायची चंगळ.  Best Hotels in Kolhapur to serve Mutton Chicken Non Veg Food

अलिकडे मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये देखील खास कोल्हापूरी जेवणाची Kolhapuri Food हॉटेल्स सुरू झाली आहे. मात्र कोल्हापूरात जावून तिथली चव चाखण्याचा आनंद निराळाच आहे.

त्यामुळेच जर तुम्ही कोल्हापूरला जात असाल तर तिथल्या तांबड्या पांढऱ्या रश्श्यावर ताव मारण्यासोबतच इतर मांसाहारी पदार्थांची Non Veg मज्जा ही नक्की लूटा. 

कोल्हापूरातही मासांहारासाठी अनेक हॉटेल्स आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला काही खास हॉटेल्स काही तिथली स्पेशॅलिटी काय हे सांगणार आहोत. 

देहाती- कोल्हापूरातील कावळा नाका इथं असलेलं हॉटेल देहाती हे देखील चिकन आणि मटण थाळीसाठी प्रसिद्ध आहे. इथला मटन मसाला आणि मटण फ्राय अस्सल खवय्यांनी एकदा तरू ट्राय करावा.

लाल दिसत असलं तरी प्रमाणात तिखट आणि अत्यंत चविष्ट असं इथलं चिकन आणि मटन खावून तुमचं मन नक्कीच भरेल. शिवाय सोबत भात भाकरी आणि दह्यातील कांदा दिला जातो. 

पारख- कोल्हापूरातील पारख हे एक अत्यंत जुनं आणि लोकप्रिय हॉटेल आहे. इथला पांढरा आणि तांबडा रस्सा वरपल्याशिवाय जाऊ नका.हे तुम्हाला केवळ वेगवेगळ्या थाळी मिळतील.  इथली मटण थाळी, चिकन थाळी प्रसिद्ध आहे . त्याचसोबत अंडा थाळी आणि व्हेज थाळी देखील इथं उत्तम चवीच्या मिळतात.  

इथल्या चिकन मटण थाळीमध्ये तुम्हाला तांबडा-पांढरा रस्सा तसचं मसाला मटन किंवा चिकन तसचं ड्राय मटन सोबतच भात भाकरी किंवा चपाती असे पदार्थ मिळतात.

प्रत्येक थाळीमध्ये वेगवेगळ्या चण्यांची चव देखील तुम्ही चाखू शकता. इथल्या मांसाहारी थाळीवर ताव मारल्यावर तुमचं मन तृप्त झाल्यावाचून राहणार नाही. 

हे देखिल वाचा-

चावडी- तुम्हाला अस्सल गावरान चवीचं चिकन किंवा मटण खायचं असेल तर कोल्हापूरातील हॉटेल चावडीला नक्की भेट द्या. इथं तुम्हाला चुलीवर शिजवलेल्या जेवणाचा आनंद लुटता येईल. इथली स्पेशलिटी म्हणजे खर्डा चिकन, धनगरी मटण- तांबडा-पांढरा रस्सा 

हॉटेल कृष्णा- अगदी सामान्य दिसणारं हॉटेल मात्र चवी एकमद हटके असं हॉटेल कृष्णा मासांहारी लोकांच्या आवडीचं ठिकाण आहे.

गेल्या चार पिढ्यांपासून या हॉटेलने जेवणाची चव कायम राखत खवय्यांची पसंती मिळवली आहे. लोणी मटण ही इथली खासियत आहे. इथं देखील तुम्हाला थाळीमध्ये अंडा करी मिळते. तसचं इथ खर्डा मटण, फ्राय मटण आणि चिकन मसाला अशा थाळ्या मिळतात. 

मालन घरगुती खानावळ- कोल्हापुरात मासांहारासाठी काही मोठे हॉटेल्स प्रसिद्ध असले तरी अनेक ठिकाणी तुम्हाला अस्सल कोल्हापूरी चवीचं जेवण देणाऱ्या काही उत्कृष्ट खानावळी किंवा छोटेखानी हॉटेल पाहायला मिळतील.

यापैकीच एक म्हणजे मालन घरगुती खानावळ. अगदी कमी दरात पोटभर आणि मन तृप्त होईल असं चिकन मटण खायचं असेल तर या खानावळीला नक्की भेट द्या. 

मालन मटण थाळी, चिकन थाळी, रक्ती मुंडी तसचं मटन आणि चिकन फ्राय ही इथली खासियत आहे. तसचं तांबडा-पांढपा रस्सा हे सर्वच पदार्थ अगदी घरगुती चवीप्रमाणे इथे वाढले जातात. छत्रपती शिवाजी पेठेमध्ये ही खानावळ आहे. 

हॉटेल निलेश- शनिवार पेठेत असलेलं हॉटेल निलेश हे देखील अस्सल कोल्हापुरी मांसाहारी जेवणासाठी लोकप्रिय आहे. हॉटेल निलेश हे मटन थाळी बिर्याणीसोबत इतर काही खास पदार्थांसाठी ही प्रसिद्ध आहे.

हॉटेल निलेशची आणखी खासियत म्हणजे मटन लोणचं, मटन नळी आणि खर्डा चिकन हे पदार्थ आहेत. परिट गल्लीत असलेल्या हॉटेल निलेशला एकदा तरी भेट द्या इथला तांबडा पांढरा रस्सा भुरका मारून प्या आणि मटन नळीवर तावा मारा.      

हॉटेल शेतकरी- फुलेवाडी इथं असलेलं हॉटेल शेतकरी हे मटण थाळीसाठी प्रसिद्ध आहे. इथं चुलीवरील अस्सल गावरान मटन आणि चिकन चाखण्याची मजा लुटका येईल. केवळ २४० रुपयांमध्ये इथे अनलिमिटेड मटण थाळी दिली जाते.  

तेव्हा कोल्हापूर दौऱ्यावर तुम्ही जाणार असाल तर या हॉटेल्सना नक्की भेट द्या आणि इथल्या चिकन मटण थाळींसोबतच तांबडा पांढऱ्या रस्स्यावर तावा मारा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT