Bhaubij 2022 Esakal
फूड

Bhaubeej Food Recipe : भाऊबीज- पाडव्याच्या निमित्ताने करा बासुंदी, मासलेभात आणि कोथिंबीर वडीचा स्पेशल बेत

दिवाळी म्हटल्यावर घरात नातेवाईकांची लगबग

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी म्हटल्यावर घरात नातेवाईकांची लगबग सुरू होते त्यात भाऊबीजेला तर सगळ्यांच्या घरी पाहुणे आलेले असतीलच. शिवाय भरपूर दिवसांनी भेट झालेली असल्याने गप्पाही मारायच्या असतीलच.. अशावेळी कमी वेळात काय स्वयंपाक करावा हा प्रश्न आहेच. दुपारच्या जेवणाला झटपट तयार होणारे हे असे सोपे पदार्थ. गरमागरम मसालेभात केला की तुम्हाला पुरी किंवा पोळ्या बनवण्याची गरजच नाही.

मसालेभात

साहित्य

२ ते अडीच वाटी तांदूळ, २ ग्लास पाणी, १ वाटी मटार, २ चिरलेले बटाटे, १ चिरलेला कांदा, १ फूलकोबी, आले लसणाची पेस्ट, कडीपत्ता, २ ते ३ हिरव्या मिरच्या, लाल तिखट, धणे जिरे पूड, काळा मसाला, हळद, मीठ, तमालपत्र, फोडणीसाठी तेल.

कृती

- सगळ्यात आधी तांदुळ स्वच्छ धुवून घ्या आणि तांदळाच्या दीडपट पाणी उकळून घ्या.

- बाकीचे सर्व भाज्या चिरून घ्या.

- कुकरमध्ये फोडणीसाठी तेल गरम करा, तेल गरम झालं की त्यात जिर, मोहरी, कांदा, कडीपत्ता आणि तमालपत्र परतून घ्या.

- मटार, बटाटे, कापलेल्या बाकीच्या भाज्या घाला. नंतर त्यात चवीनुसार तिखट, मीठ, हळद, जिरपुड, धणेपूड घालुन भाज्या मिक्स करा.

- तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे यात गाजर, सिमला मिरची, टोमॅटो घालू शकता.

- नंतर तांदूळ घालून एकजीव करा व गरम पाणी घाला आणि परत मिक्स करा. एक उकळी येऊ द्या व झाकण ठेवून एक वाफ काढा.

- कुकरचं झाकण बंद करून ३ ते ४ शिट्ट्या होऊ द्या. कुकुर थंड झाल्यानतंर झाकण उघडा तयार आहे मसाले भात...

बासुंदी

बासुंदी एक स्वादिष्ट डिश आहे. आपण ती फक्त ३० मिनिटांत तयार करू शकतो. बासुंदी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त दूध, वेलची, साखर आणि केशर लागणार. आपण त्यात सुकामेवा घालू शकता.

बासुंदीचे साहित्य

दूध ८ कप, वेलची पूड २ टीस्पून, केशर १/२ टीस्पून, काजू-बदाम १०-१२, साखर २ वाट्या.

टिप: एक लिटर दुधाला १ वाटी साखरेचा अंदाज असावा.

कृती

- दूध घट्ट होईपर्यंत उकळा, दूध सतत ढवळत रहा आणि एकदा दूध उकळत असल्याचे दिसले की लगेच गॅस कमी करा. नंतर दूध ढवळत राहा, दूध ओतू जाऊ नये म्हणून एक स्वच्छ बशी तुम्ही पातील्याच्या तळाशी ठेवू शकतात.

- दूध घट्ट झालं की त्यात नंतर साखर घालून चांगली मिक्स करा. गॅस वरून दूध काढून एका सर्व्हिंग बाउल मध्ये टाका.

- नंतर केशर, काजू-बदाम आणि थोडी वेलची पावडर मिक्स करा. हे मिश्रण एक किंवा दोन मिनिटे नीट ढवळून घ्या आता आपली बासुंदी सर्व्ह करायला तयार आहे.

खमंग कोथिंबीर वडी

साहित्य : १ कोथिंबीर जुडी, २०० ग्रॅम चण्याचं पीठ, १०० ग्रॅम तांदळाचं पीठ, २५ ग्रॅम पांढरे तीळ, दोन छोटे चमचे लाल तिखट, एक चमचा हळद, एक चमचा जिरं, ५ ते १० लसणाच्या पाकळ्या, एक चमचा तेल, स्वादानुसार मीठ.

कृती :

- कोथिंबीर बारीक चिरून घ्या. चिरलेली कोथिंबीर चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एका परातीत घ्या.

- त्यात चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, सफेद तीळ, लाल तिखट, हळद, ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, स्वादानुसार मीठ आणि एक चमचा तेल टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून, घट्ट मळून घ्या.

- गोळा तयार झाल्यानंतर त्याचे रोल तयार करा. नंतर कोथिंबीर वडीचे रोल कुकरच्या भांड्यात ठेवून, कुकरच्या ८ ते १० शिट्या करून गॅस बंद करा.

- कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून वडीचे रोल बाहेर काढावेत. सुमारे ५ मिनिटांनी वडीचा रोल पोळपाटावर घेऊन, सुरीने वड्या पाडून घ्या. नंतर गॅसवर पॅन गरम करायला ठेवून त्यावर एक पळी तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर त्यावर कोथिंबीर वड्या त्यावर सुमारे २ मिनिटं मध्यम आचेवर खरपूस शॅलो फ्राय करून घ्या नंतर गॅस बंद करा.

- गरमागरम कोथिंबीर वडी तयार. कोथिंबीर वडी टोमॅटो सॉसबरोबरही छान लागते.

टीप : कोथिंबीर वडीसाठी पीठ मळत असताना त्यात एक चमचाभर गरम तेल टाकल्यामुळे, रोल तयार करताना हाताला पीठ चिकटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT