Breakfast Recipe  esakal
फूड

Breakfast Recipe : सकाळचा नाश्ता असो वा मुलांचा पौष्टिक डब्बा, मुगाचा डोसा आहे परफेक्ट ऑप्शन, जाणून घ्या रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

Breakfast Recipe :

आजवर तुम्ही तांदळापासून बनलेले अनेक पदार्थ नाश्त्याला खाल्ले असतील. तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून आंबवून त्याचे इडली,डोसा असे दाक्षिणात्य पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला डोश्यांची एक वेगळी रेसिपी सांगणार आहोत.

तुम्ही मूग डाळीचा वापर वरण आणि भाजीत केला असेल. पण आज मुगाच्या डाळीपासून डोसे कसे करायचे हे पाहुयात.

मूग डाळ पचायला हलकी असते. त्यामुळे रुग्णाला देखील त्याचे पदार्थ दिले जातात. उलट तांदूळ अन् उदिडपासून बनलेले पदार्थ जड असतात. त्यामुळे हे मुगाचे डोसे घरातील सर्वांनाच नक्की आवडतील

साहित्य -

२ फुलपात्रं मुगाची डाळ, ४ हिरव्या मिरच्या व १ मूठ कोथिंबीर थोडे मीठ घालून एकत्रित बारीक वाटून घेणे, २ चहाचे चमचे खसखस व १ वाटीभर नारळाचा चव वाटणे, चवीनुसार मीठ व तेल.

कृती

मुगाची डाळ स्वच्छ निवडून आदल्या दिवशी रात्री भिजत घालावी. दुसऱ्या दिवशी मुगाची डाळ बारीक वाटून सरसरीत पीठ करावे व चवीपुरते मीठ घालावे. डाळ वाटायला डाळ भिजवलेले पाणी वापरावे.

एक तासाने डोशाकरता मिठाचे पाणी घालून तवा तयार करून १ डावभर पीठ तव्यावर घालून वाटीने डोसा तवाभर पातळ पसरावा. (४) तव्याच्या बाजूने डोसा सुटून आला की पाव चमचा तेल सोडावे व वाटलेली मिरची, कोथिंबीर, खसखस, खोबरे आतून चटणीप्रमाणे लावून डोसा गुंडाळी करून काढावा.

वरील पिठात ८ डोसे होतात. डोशाच्या चटणीबरोबर खावयास द्यावा.

महत्त्वाची गोष्ट

डाळ बारीक वाटावी म्हणजे डोसा पातळ होतो. कुरकुरीत व्हायला हवा असेल तर वाटलेल्या डाळीत १ टे. स्पून बारीक रवा घालावा. मुगाची डाळ वाटल्यावर जास्त वेळ आंबवायला ठेवायची नाही. लगेच डोसे केले तरी चालतात.

मुगाच्या डाळीचे असल्याने पचायला सोपे. तांदूळ, उडदाची डाळ खायची नसल्यास पथ्यकारी म्हणून देता येतात. आत लावलेल्या मसाल्याने सांबार किंवा भाजीची जरुरी पडत नाही. डाळीच्या पाण्यातच डाळ वाटल्याने डोसे खूप हलके होतात.

(संबंधित रेसिपी सौ.जयश्री देशपांडे यांच्या हमखास पाककृती या पुस्तकातून घेतली आहे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मी बिनशर्त पाठिंबा देण्याचं कारण...; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Bigg Boss Marathi Varsha Usgaonkar: वर्षा उसगावकर 'बिग बॉस'च्या घराबाहेर; टॉप 6 सदस्य झाले निश्चित

Marathi Language: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने नेमकं काय फायदा होणार? अभिजात भाषेचे निकष काय असतात? जाणून घ्या

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंगळवारी सोलापुरात! वचनपूर्ती सोहळ्यासाठी ४० हजार महिला लाभार्थी आणण्याचे अधिकाऱ्यांना टार्गेट; तलाठ्यांकडे ‘ही’ जबाबदारी

Marathi language: मराठी भाषा ही भारताचा अभिमान! अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मोदींकडून गौरवोद्गार, वाचा नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT