Palak Paneer Paratha  sakal
फूड

Palak Paneer Paratha : जर तुम्हाला नाश्त्यासाठी काही स्पेशल बनवायचे असेल तर ट्राय करा पालक-पनीर पराठे

Breakfast Recipe : पालक-पनीर पराठा बनवायला थोडी मेहनत घ्यावी लागेल, पण, हा पराठा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतीयांना पनीरचे विविध अन्नपदार्थ खायला खूप आवडतात. काही लोक ते कच्चे देखील खातात. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी पालक पनीर पराठा रेसिपी घेऊन आलो आहोत. पालक पनीरमध्ये भरपूर मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. पालक-पनीर पराठा बनवायला थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण, हा पराठा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मुले आनंदाने हा पराठा खातील. चला तर मग जाणून घेऊया पालक पनीर पराठा कसा बनवायचा.

पालक पनीर पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

200 ग्रॅम पालक

200 ग्रॅम पनीर

1 कप मैदा

पुदीना

कोथिंबीर

4-5 लसूण पाकळ्या

हिरवी मिरची ३-४

मेथी दाणे

तूप किंवा बटर

1 कांदा बारीक चिरून

आले, हिरवी मिरची बारीक चिरून

जिरे पावडर

धणे पावडर

चवीनुसार मीठ

पालक-पनीर पराठे बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम पालक नीट धुवून घ्या. कढईत पाणी गरम करून त्यात पालक टाका.

पालक शिजल्यावर बाहेर काढून थंड करा.

मिक्सर जारमध्ये उकडलेल्या पालकाच्या पानांसोबत कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने मिक्स करा.

त्यात लसूण आणि हिरवी मिरची घालून चांगली पेस्ट बनवा.

गव्हाचे किंवा मैद्याचे पीठ घेऊन त्यात एक चमचा तूप किंवा बटर टाका.

पालक पेस्ट घालून पीठ घट्ट मळून घ्या.

पनीर फिलिंग बनवण्यासाठी पनीर मॅश करा.

त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची टाका.

तसेच मीठ, जिरे आणि धनेपूड घालून मिक्स करा.

हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून ठेवायचे आणि पालकाच्या पीठाचे गोळे करुन त्याची छोटी पोळी लाटायची.

त्यामध्ये पनीरचे मिश्रण भरुन चारही बाजुने चौकोनी घडी घालायची आणि चौकोनी आकाराचे पराठे लाटायचे.

गॅसवर तवा गरम करुन त्यावर हे पराठे तेल घालून दोन्ही बाजुने भाजून घ्यायचे.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT