Shev Pav Recipe esakal
फूड

Shev Pav Recipe: भेळ पुरी, पाणी पुरीच हे हटके फ्यूजन एकदा ट्राय करूनच बघा

सकाळ डिजिटल टीम

Shev Pav Recipe : चाट खायला कोणाला आवडत नाही? त्यात रोजच्या नाश्त्याचा कंटाळाही आला असेलच. कितीही वेगळं करायच म्हटल तरी शेवटी नाश्ता म्हटलं की तेच तेच पदार्थ येतात, पण तुम्ही काहीतरी वेगळं करू शकतात. शेव पाव हा असाच एक पदार्थ आहे.

यात असलेले घटक तुम्हाला फ्यूजन खात असल्याची भन्नाट फिलिंग देतात. भेळ पुरी, पाणी पुरी, सँडविच, बटाटे वडा या सगळ्यांना एकत्र करून हा पदार्थ बनवला असल्यासारखं तुम्हाला वाटेल. बघूयात शेव पावची रेसिपी

साहित्य

१ मोठा उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा

पाव

१ बारीक चिरलेली हिरवी मिरची

१/२ टीस्पून जिरे पावडर

१/2 टीस्पून तिखट

१/४ कप कांदा चिरलेला कांदा

१ /४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर

१ टीस्पून लिंबाचा रस

१/२ टीस्पून चाट मसाला

चिंचेची चटणी

शेव

पुदिन्याची चटणी

बटर

कृती :

- बटाटा उकडवा आणि सोलून मॅश करा.

- आता त्यात हिरवी मिरची, चाट मसाला, जिरेपूड, लिंबाचा रस, कोथिंबीर, कांदा आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करा.

- आता पाव घ्या, आणि त्याला यातून बटर लावून घ्या

- त्या पावाच्या खालच्या बाजूला थोडी चिंचेची चटणी लावा, मग बटाट्याच स्टफिंग भरा आणि लाल शेव टाका.

- वरच्या बाजूला पुदिन्याची चटणी लावून घ्या.

- तवा गरम करायला ठेवा, तवा तापला की तो पाव तव्यावर व्यवस्थित भाजून घ्या.

- सॉस सोबत सर्व्ह करा, शेवपाव तयार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local News: मुंबईकरांची गणेश विसर्जन मिरवणूक दणक्यात! अनंत चतुर्थीला 22 जादा लोकल; जाणून घ्या वेळापत्रक

Ganesh Visarjan 2024 LIVE : दुपारी ४ वाजता होणार दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

On This Day: हातात आलेली नोकरी सोडून क्रिकेटची निवड करणारा इंजिनियर R Ashwin; जाणून घ्या त्याचे खास रेकॉर्ड

Corn Dosa Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कुरकुरीत कॉर्न डोसा, जाणून घ्या रेसिपी

Ganesh Visarjan 2024: गणेश विसर्जन मिरवणुकीत साध्या वेशातील पोलिस तैनात, गृह खात्याने का घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT