Calcium Foods news esakal
फूड

Calcium Foods : कॅल्शिअम कमी झालयं पण डेअरी प्रोडक्ट नकोत; हे पदार्थ आहेत कॅल्शियमयुक्त

कॅल्शियम शरीरासाठी अत्यंत आवश्यक

सकाळ डिजिटल टीम

कॅल्शियम शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे, विशेषत: हाडे, स्नायू आणि दातांच्या मजबुतीसाठी, शरीराच्या स्नायूंच्या आकुंचनासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि रक्तदाब वाढवण्यासाठी आणि मज्जातंतूंच्या संक्रमणासाठी देखील आवश्यक आहे.

दैनंदीन कामे करताना थकवा जाणवतो. अनेकवेळी हाडे दुखतात. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. सकस आहार सोडून फास्टफूड खाल्ल्याचे हे परिणाम आहेत. तसेच, चॉकलेट, केक, कोल्डड्रिंक्समुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते. मात्र, हे कॅल्शिअम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते. त्यासाठी औषधाची गरज नाही.

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. ज्याच्या नियमित सेवनाने शरीरातील हाडे मजबूत होतात. पण आजकाल दूध पिणे परवडतही नाही आणि आवडतही नाही. पण, असे अनेक पदार्थ आहेत ज्यामध्ये दुधापेक्षा कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते.

कॅल्शियमच्या पुरवठ्यासाठी बहुतेक लोक डेअरी पदार्थांवर अवलंबून असतात. तर कॅल्शियम अनेक प्रकारच्या पदार्थांमधून सहज मिळू शकते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी दुधाव्यतिरिक्त काही हेल्दी पर्याय घेऊन आलो आहोत. ज्यामुळे कॅल्शियमचे प्रमाण वाढेल.

बदाम

इतर ड्रायफ्रूट्सपेक्षा बदाममध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते. कॅल्शियमसोबत त्यात बदामामध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन ई सारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो. तुम्हाला भूक लागल्यावर सतत काहीतरी खाण्यापेक्षा बदाम चघळत बसणे फायद्याचे ठरेल.

अंजीर

अंजीर बाजारात ताजे आणि सुकलेले अशा दोन्ही स्वरूपात मिळते. अंजीरमध्ये भरपूर कॅल्शियम असते. अंजीरमध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. तुम्ही दररोज 4 अंजीरचे सेवन केले तर तुमच्या शरीराला 135 मिलीग्राम कॅल्शियम मिळते.

टोफू

कॅल्शियमच्या सर्वोत्तम स्त्रोतांमध्ये टोफूला महत्त्वाचे स्थान आहे. ते कॅल्शियमने समृद्ध असून त्यात आयसोफ्लाव्होन सारखे फायटोएस्ट्रोजेन देखील आढळतात. याच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका आणि मधुमेह यांसारख्या आजारांपासून मुक्ती मिळते.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये भरपूर कॅल्शियम असते. ब्रोकोली हे ‘सुपरफूड’ आहे. व्हिटॅमिन सी, के आणि फोलेट असलेले हे सर्व सेल वाढ आणि पुनरुत्पादन नियंत्रित करण्यास मदत करतात. ही हिरवी भाजी अँटिऑक्सिडंट्स, फायबरयुक्त गुणधर्मांनी समृद्ध आहे.

संत्री

संत्रा हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. हि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हे शरीरातील पेशींना नुकसान होण्यापासून प्रतिबंधित करते. एक ग्लास संत्र्याच्या रसामध्ये 300 मिलीग्राम कॅल्शियम आढळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT