Holi Special Malpua Recipe esakal
फूड

Holi 2024 : होळी सेलीब्रेशन करा जरा हटके; बनवा खास ऋग्वेदात उल्लेख असलेला चविष्ट पदार्थ!

Holi Special Malpua Recipe : हा एक पारंपारिक स्वादिष्ट पदार्थ आहे जो होळीच्या वेळी देशाच्या अनेक भागांमध्ये तयार केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

Holi Special Malpua Recipe : मालपुआ राजस्थानी मिठाईंपैकी अन् भारतातील सर्वात जुन्या मिठाईंपैकी एक आहे, गंमत म्हणजे याचा उल्लेख ऋग्वेदात अपुपस म्हणून देखील आढळतो, हा एक पारंपारिक स्वादिष्ट पदार्थ आहे जो होळीच्या वेळी बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालपर्यंत देशाच्या अनेक भागांमध्ये तयार केला जातो.

मग आज होळीच्या निमित्ताने काहीना काही गोड बनवावं लागेलच मग नेहमीचे पारंपरिक पदार्थांऐवजी ट्राय करा ही चविष्ट रेसिपी...

साहित्य :

- १.४ कप खवा

- १ कप दूध

- १ कप मैदा

- ३ चमचे बडीशेपची बी

- २ कप साखर

- १ कप पाणी

- २ चमचे तूप

- आवश्यकतेनुसार बदाम

- आवश्यकतेनुसार हिरवी वेलची

कृती :

१. एका बाऊलमध्ये एक चतुर्थांश खवा आणि १ मोठा कप दूध घेऊन चांगलं फेटून घ्या. एकदा का खवा दुधात चांगला मिक्स झाला की त्यात मैदा घालून पुन्हा सर्व सामग्री चांगली एकजीव करुन घ्या.

२. आता त्या मिश्रणात ३ चमचे बडीशेप घालून बॅटर तुम्हाला हव्या असलेल्या म्हणजेच जाड किंवा पातळ मालपुवाच्या हिशोबाने तयार करुन घ्या.

३. एका पॅनमध्ये पाणी गरम करुन त्यात २ कप साखर घालून ६ ते ७ मिनिटे पाणी उकळवून घ्या. पाण्याला उकळी फुटू लागताच व साखर पाण्यात विरघळल्यानंतर त्यामध्ये चिमुटभर वेलची पूड घाला.

४. एका वेगळ्या पॅनमध्ये साजूक तूप घेऊन गरम करा. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये छोट्या छोट्या गोळ्यांच्या आकारात बॅटर घाला. मंद ते मध्यम आचेवर मालपुवे तळून घ्या जेणे करुन ते करपणार नाहीत आणि आतून-बाहेरुन चांगले शिजतील. गोल्डन-ब्राऊन रंगाचे होईपर्यंत मालपुवे चांगले तळून घ्या.

५. आता साजूक तुपात तळलेले मालपुवे साखरेच्या पाकात घालून गरमा गरम सर्व्ह करा. तुम्हाला गोड जास्त आवडत असल्यास तुम्ही हे मालपुवा ३० मिनिटे साखरेच्या पाकात ठेवू शकता.

६. वेलचीपूड आणि बदामाच्या कापांनी मालपुवा गार्निशिंग करुन घ्या. तयार झाले आहेत आपले स्वादिष्ट आणि गोड गोड मालपुवा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT