kolhapuri Misal Pav Recipe  sakal
फूड

Misal Pav: या वीकेंडला ट्राय करा झणझणीत कोल्हापूरी मिसळ, जाणून घ्या रेसिपी

तुम्ही मिसळ पाव सकाळच्या स्नॅक्सपासून ते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकता.

सकाळ डिजिटल टीम

मिसळ पाव हे महाराष्ट्रातील खूप लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, जे खाण्यास खूपच मजेदार आणि चविस्ट आहे. ही एक अशी महाराष्ट्रीयन रेसिपी आहे जी कोल्हापुरी मिसळ पाव म्हणून खास प्रचलित आहे. तुम्ही मिसळ पाव (Misal Pav) सकाळच्या स्नॅक्सपासून ते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकता.

मिसळपाव तयार करण्यास थोडा वेळ लागतो परंतु ही डिश खूप चवदार असते. त्यामुळे अनेकजण मिसळपावचे खुप मोठे फॅन असतात. चला तर जाणून घेऊया अस्सल कोल्हापूरी मिसळ कशी बनवायची ते...

मिसळ पाव साठी साहित्य जाणून घेऊया.

पेस्ट तयार करण्यासाठी

  • 2 चमचे तेल

  • 2 टीस्पून आले पेस्ट

  • 1 टीस्पून लसूण पेस्ट

  • 1 चिरलेला कप कांदा

  • 1 कप टोमॅटो, चिरलेला

  • 3/4 कप नारळ, किसलेले

ग्रेव्ही बनवण्यासाठी

  • 3 चमचे तेल

  • तिखट पेस्ट

  • चवीनुसार मीठ

  • 1 टीस्पून लाल मिरची पेस्ट

  • 1 टीस्पून गरम मसाला

  • 1/2 टीस्पून हळद पावडर

  • 1 टीस्पून जिरे-धणे पावडर

  • 1/2 टीस्पून दालचिनी-लवंग पावडर

  • 3 कप पाणी

उसळ बनवण्यासाठी

  • 3 चमचे तेल

  • 1 टीस्पून लसूण पेस्ट

  • 1 टीस्पून आले पेस्ट

  • 1/2 टीस्पून हिंग

  • 1 कप बटाटे (उकडलेले आणि चौकोनी तुकडे)

  • 1½ कप स्प्राउट्स (पाण्यात भिजवलेले)

  • 1/2 टीस्पून हळद पावडर

  • 1 टीस्पून गरम मसाला

  • 1/2 टीस्पून दालचिनी-लवंग पावडर

  • लिंबाचा रस

  • 3 कप पाणी

  • चवीनुसार मीठ

मिसळ पाव सजवण्यासाठी साहित्य

  • कांदा

  • फरसाण (कोरडे मिश्रित)

  • कोथिंबीरीची पाने

  • पाव परसून घावे,

  • लिंबाचे तुकडे

मिसळ पाव रेसिपी कसे बनवायची?

मिसळ पाव (पेस्ट) कशी बनवायची -

  • कढईत तेल गरम करून त्यात आले, लसूण आणि कांद्याची पेस्ट घाला.

  • पेस्ट हलक्या तपकिरी रंगाची होईपर्यंत तळा.

  • त्यात टोमॅटो आणि किसलेले खोबरे घाला. काही मिनिटे तळून घ्या.

  • मिश्रण भाजल्यानंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा.

  • मिश्रण थंड झाल्यावर बारीक करा.

मिसळ पाव (ग्रेव्ही) कशी बनवायची

  • कढईत तेल गरम करा, त्यात पिसलेला पेस्ट घाला आणि दोन मिनिटे तळा.

  • मीठ, गरम मसाला, लाल तिखट, हळद, जिरे-धणे पावडर, लवंग-दालचिनी पावडर घालून चांगले मिक्स करा.

  • यानंतर त्यात पाणी घाला. हे मिश्रण कडे कडून तेल सोडेपर्यंत शिजवा.

  • मिश्रण तळल्यावर ते एका भांड्यात टाकून बाजूला ठेवा.

उसळ कसे बनवायचे

  • कढईत तेल गरम करून त्यात आले पेस्ट, लसूण पेस्ट आणि हिंग घालून चांगले परतून घ्या.

  • रात्रभर भिजवलेल्या उसळ मध्ये बटाटे मिसळा.

  • त्यात मीठ, हळद, गरम मसाला, लवंग-दालचिनी पावडर आणि लिंबाचा रस घाला.

  • पाणी घालून आठ ते दहा मिनिटे शिजवा.

  • मिश्रण शिजल्यानंतर एका भांड्यात टाका आणि बाजूला ठेवा.

मिसळ पाव बनवा

  • एका भांड्यात प्रथम तयार केलेली उसळ टाका.

  • यानंतर तयार ग्रेव्ही घाला आणि चिरलेला कांदा आणि फरसाण यांचे मिश्रण घाला.

  • त्यावर कोथिंबीर घाला आणि पाव आणि लिंबाच्या कापांसह सर्व्ह करा.

  • उसळ बनवण्यासाठी तुम्ही मिक्स उसळ देखील घेऊ शकता. याशिवाय फरसाणाऐवजी चिवडाही वापरता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT