मऊसूद चपात्यांसाठी Esakal
फूड

Cooking Hacks असं भिजवा कणीक, जास्त वेळ ताजं राहिल पीठ, चपात्या होतील मऊ

आज आम्ही तुम्हाला चपातीसाठी कणीक कशी भिजवावी, ते कशी स्टोअर करावी याबद्दल काही टीप्स देणार आहोत. या टीप्समुळे तुम्हाला देखील अनेक तास मऊ राहणाऱ्या चपात्या करणं शक्य होईल

Kirti Wadkar

भारतातील घराघरांमध्ये जेवणात किंवा नाश्त्याला पोळ्या किंवा चपात्या Chapati खाण्यास पसंती दिली जाते. अनेकांना तर चपातीशिवाय जेवण केल्याचं समाधानच मिळत नाही. ताटामध्ये गरमागरम आणि मऊ चपाती आली की जेवणाची मजा वाढते. Cooking Tips Marathi How to Make Chapati soft

हे झालं चपाती Chapati खाण्याच्या आनंदाचं. मात्र चपाती करताना अनेकांची मोठी तारांबळ उडते. चपात्या करणं हे तसं कौशल्याचं Skill काम म्हणावं लागेल. कारण प्रत्येकालाच अगदी गोल, मऊ आणि तव्यावर टम्म फुलणाऱ्या चपात्या बनवणं जमतचं असं नाही.

अनेकदा चपाती गोल झाली तरी ती तव्यावर चांगली फुलत नाही. चपाती तव्यातून काढताना मऊ दिसत असली तरी काही मिनिटांमध्येच ती कडक होण्यास सुरुवात होते. अशावेळी नेमकं काय करावं आणि काय चुकतंय असा प्रश्न अनेकांना पडतो.

काहीजण मऊ चपात्या करण्यासाठी सतत वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र चपात्या काही मऊसूद आणि फुललेल्या किंवा पदर असलेल्या होत नाहीत. चपाती मऊ होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. यात मुख्य भाग म्हणजे चपातीचं कणीक भिजवणं किंवा पीठ मळणं.

आज आम्ही तुम्हाला चपातीसाठी कणीक कशी भिजवावी, ते कशी स्टोअर करावी याबद्दल काही टीप्स देणार आहोत. या टीप्समुळे तुम्हाला देखील अनेक तास मऊ राहणाऱ्या चपात्या करणं शक्य होईल.

हे देखिल वाचा-

अशी भिजवा चपातीसाठी कणीक

चपात्या मऊ व्हाव्यात तसंच जर तुम्ही जास्त पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवत असाल तर काही काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

- चपात्या मऊ होण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे कणीक भिजवताना कोमट पाण्याचा वापर करा. कोमट पाण्याने पीठ मळल्यास ते लगेचच कडक होण्यास सुरुवात होणार नाही.

- त्यानंतर कणीक १० मिनिटांसाठी झाकून ठेवा.

- त्यानंतर पुन्हा १ चमचा तेल घेऊन कणीक चांगली मळून घ्या.

- कणीक भिजवताना ती जास्त कठीण किंवा जास्त मऊ भिजवू नये.

अशा प्रकारे कणीक भिजवल्यास चपात्या किंवा पराठे अगदी मऊ होतील. Flour Kneading

अशी स्टोर करा भिजवलेली कणीक

भिजवलेली कणीक जर योग्य प्रकारे स्टोर केली तर ती फ्रिजमध्ये २ दिवसही अगदी ताज्या पीठाप्रमाणे राहते.

अॅल्युमिनियम फॉइलचा वापर- फिजवलेली कणीक फ्रिजमध्ये ताजी रहावी यासाठी तुम्ही अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करू शकता. उरलेली कणीक अॅल्युमिनियम फॉइल किंवा बाजारात मिळाऱ्या अॅल्युमिनियम फॉइल बॅगमध्ये ठेवा. Tips For Soft Roti

हवाबंद डब्यात ठेवा कणीक

तसचं भिजवलेली कणीक तुम्ही एअर टाइट कंटेनर म्हणजेच हवाबंद डब्यात ठेवू शकता. यामुळे पीठ कोरडं होत नाही. तसचं तुम्ही काचेचा किंवा स्टीलचा हवाबंद डबा वापरू शकता.

हे देखिल वाचा-

काही महत्वाच्या टीप

- भिजवलेली कणीक फ्रिजमध्ये ठेवायची असल्यास एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे कणीक तेलाने मळू नका. तेल लावलेली कणीक फ्रिजमध्ये काळं पडण्याची शक्यता जास्त असते.

- अशावेळी कणीक फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर पुन्हा तेलाने मळून घ्यावी

- तसंच फ्रिजमधून कणीक काढून लगेचच पोळ्या केल्यास त्या कडक होवू शकतात. यासाठी पोळ्या करण्यापूर्वी किमान २० मिनिटांपूर्वीच पीठ बाहेर काढा.

- पोळ्या करण्यापूर्वी कणीक पुन्हा मळून मगच पोळ्या करा.

या टीप्स वापरून जर तुम्ही चपात्या बनवल्या कर नक्कीच त्या बराचवेळ मऊ राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT